Friday, February 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शिवभोजन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली बाळासाहेब आंबेडकर यांची भेट

नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/
शिवभोजन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली. सरकारने ही योजना बंद करू नये अशी या समितीची मुख्य मागणी आहे.

दरम्यान राज्य शासनाकडून शिवभोजन थाळी बंद करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना सांगितले. तसेच या या योजनेमुळे दररोज दोन लक्ष लोकांना याचा लाभ होतो.
यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की, संबंधित खात्याच्या मंत्र्याशी आणि राज्य सरकारशी या संदर्भात चर्चा करू असे यावेही शिष्टमंडळाला आश्वासित केले आहे.