Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील कागाळखोर पोलीसांकडून वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल,
शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या बातमीच्या अनुषंगाने विश्लेषण….

पुण्यातील कागाळखोर पोलीसांकडून वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल

अस्तित्वातील बाबी लपवुन ठेवायच्या आणि नसलेल्या बाबींवर मात्र लक्ष वेधून बुद्धीभेद करायचा

…. त्यामुळेच पुण्यात झिरो पोलीसांचे प्रस्थ वाढले….

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख म्हणायचे, राजसत्तेच्या साटीपटावर सगळंच खरं बोलुन पटावर डाव टाकायचा नसतो. जे दिसतय तेच खरं मानुन कारभार करावा लागतो. वस्तुस्थिती तशी नसली तरीही मन मारून ते करावे लागते.अन्यथा घरी जावे लागेल. अगदी अलिकडे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री दिवंगत आर.आर.पाटील देखील मिडीयासमोर खाजगीत आणि कॅमेऱ्या समोर देखील धाडसाने सांगत की, सगळ्याच गोष्टी खऱ्या बोलायच्या नसतात हे मला उशिराने समजले. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर काय कारस्थाने सुरू असतात हे मला माहिती नाहीये काय अशी टिपण्णी त्यांनी उद्वेगाने केली होती. त्यावेळेस ते बोलत होते. अगदी स्वतःच्या मतदारसंघाबाबत देखील नेहमी मोकळेपणाने बोलत असत. वस्तुस्थिती तशी नसली तरी, ती तशीच आहे असे समजुन, मन मारून कामे करावी लागत असत. थोडक्यात वस्तुस्थिती आहे तशीच आहे हे मनांशी समजुन घेवून कारभार करावा लागतो, अन्यथा बदनामीला तोंड दयावे लागते. तथापी वस्तुस्थिती तशी नसते. मंत्रालयात वार्ताहर म्हणून काम करीत असतांना मंत्री, सचिवांशी सातत्याने संबंध येत असतात. खेळीमेळीच्या वातावरणात काम होत असते. परंतु वरील बाबी ह्या मनांवर कायमच्या बिंबवल्या गेल्या आहेत. पुण्यातील पोलीस विभागातील कारभार देखील आज अशाच पद्धतीने सुरू आहे. एकमेकांचा एकमेकांवर विश्वास राहिला असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच अनेक वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कर्तव्यावरील पोलीसांवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांनी नेमणूक केलेल्या झिरो पोलीसांवर अधिक विश्वास ठेवत आहेत हे त्याचे मुख्य कारण असल्याचे दिसून आले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका बातमीच्या अनुषंगाने उपायुक्त परिमंडळ एक मधील विश्लेषण…

पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक मधील वस्तुस्थिती-
पोलीस उपआयुक्त परिमंडळ एकच्या अधिनस्थ सहा पोलीस स्टेशन असुन, पोलस उपआयुक्तांच्या कार्यालयात अनेक वर्षांपासून कर्मचारी कार्यरत होते. सध्या कार्यरत पोलीस उपायुक्तांनी कार्यालयाची रचना आणि कार्यपद्धती समजुन घेतल्यानंतर आणि गुन्ह्याचा आढावा घेतल्यानंतर, याच कार्यालयात व फरासखाना इमारतीत अनेक पोलीस कार्यालयात मागील 10/12 वर्षांपासून कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू केले. तथापी पुण्याबाहेरून आलेल्या, पोलीस उपआयुक्तांना पुण्याचे पाणी दाखविल्याखेरीज, पुण्यातील पोलीस शांत राहतील तर नवलच.

अगदी शुल्लक कारणांवरून पोलीस उपआयुक्तांची जाणिवपूर्वक बदनामी केली. माध्यमांना खोट्या बातम्या देवून, बदनामीची राळ उठविली. मागाहुन बिर्याणीकांड घडविले. वस्तुतः उपायुक्तांच्या कार्यालयात बसुन मोक्का, तडीपारी, कॉपीराईटच्या केसेस करून कोट्यधीश होवून बांधकाम, हॉटेल, ट्रॅव्हल व अन्य व्यापारी क्षेत्रात याच कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी मोठे उद्योग सुरू केले होते. नावाला पोलीस कर्मचारी परंतु बाहेर मात्र प्रसिद्ध कंपनीचे उद्योगपती अशी त्यांची ओळख होती व आहे. रेड लाईट एरियातील लाल पैसा तर कोण कोणत्या धंदयात कुणी कुणी लावला हे एैकल तर मन सुन्न होईल. लाल पैशाला सोकावलेल्यांनी पोलीस उपायुक्तांची बदनामी केली. वस्तुस्थिती कधीच कोणत्याही उपआयुक्तांसमोर येऊ दिली नाही. मला तर उपआयुक्तांच्या दालनापर्यंतच काय, फरासखाना इमारतीच्या आतही येऊ दिले जात नसायचे... 

दोन सपोआ आणि बारा पोनि –
पोलीस उपआयुक्तांच्या अधिनस्थ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त आणि सहा + सहा= असे बारा पोलीस निरीक्षक कार्यरत आहेत. दोन आणि बारा जणांच्या हाताखाली प्रत्येक दोन/दोन आणि कुठे कुठे तीन/ तीन खाजगी वसुलदार नियुक्त आहेत. त्यांच्या हाताखाली पुनः खात्याबाहेरील पाच/पाच झिरो पोलीस कार्यरत आहेत. ते कशासाठी आहेत याचा नंतर मागावा घेवू. अशी ही रचना आहे. गुन्हे रोखणे, प्रतिबंध करणे आणि ते उघडकीस आणणे हे पोलीस कर्तव्य असतांना यातील किती अधिकारी हे कर्तव्य बजावित आहेत हे आता पुणेकर नागरीकांनी माहिती अधिकारात मागुन घ्यावे. कर्मचाऱ्यांनी काय केले याच्यापेक्षा त्यांनी स्वतःहुन काय केले याची माहिती घेणे उचित ठरेल.

सहा पोलीस स्टेशन आणि बारा पोनि-
सहा पोलीस स्टेशन हद्दीत प्रत्येक एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक व एक पोलीस निरीक्षक गुन्हे म्हणून पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या हाताखाली पोलीस उपनिरीक्षक व सहा. पोलीस निरीक्षक असे पदनिर्देशित अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्याही हाताखाली पुनः नियमित वसुलदार आणि खाजगी वसुलदार जमात कार्यरत आहे. हीच ती मंडळी वरीष्ठ अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती न सांगता, बनावट कथन करून वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभुल करण्याचे काम करतात. हद्दीतील सामाजिक, राजकीय व धार्मित वस्तुस्थिती, गुन्हेगारीची वस्तुस्थिती, जातीय ताण तणावासह गुन्हेगारांकडून हद्दीत सुरू असलेले अवैध व बेकायदेशिर धंदे यांची माहिती दिली जात नाही. एक दाखवायचे दुसरे लपवुन ठेवायचे असे यांचे उद्योग सुरू असतात. मी वर नमूद केल्यानुसार 80 टक्के पोलीस प्रमाणिकपणे कर्तव्य बजावित असतात, परंतु 20 टक्के पोलीसांना बसलेली जागाही उचलुन टाकत असते. थोडक्यात कागाळ्या ह्या ठरलेल्या असतात.

शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या निमित्ताने –
काल शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्डयांचे पुनः उघडले महाव्दार मथळ्याखाली बातमी नॅशनल फोरमच्या ऑनलाईन न्यूजमध्ये प्रसारित करण्यात आली आहे. बातमी तातडीची असल्याने प्रसिद्ध करणे आवश्यक होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत अनेक अवैध व बेकायदेशिर धंदे सुरू आहेत. तसेच तत्कालिन सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी ऑनलाईन लॉटरीवर प्रहार करून, ऑनलाईन लॉटरीव्दारे महाराष्ट्र शासनाची फसवणूक व आर्थिक लुट कशी होत आहे याबाबत त्यांनी इन्फ्ररमेशन टॅक्नोलॉजीने सिद्ध करून सुमारे 55 इसमांवर गुन्हे दाखल केले होते. श्री. पुराणिक यांच्या बदली नंतर शिवाजीनगर हद्दीत पुनः धंदे सुरू झाले होते.

त्याचत एका सपोआच्या दरबारातील खाजगी कारभारी कोर्टाजवळ मिळुन आले. त्यांनी पुणे महापालिकेबाहेरील रामसर बेकरी जवळील हेअर कटींगच्याजवळील मनोज शहा या गॅम्बलर बाबत माहिती देवून, त्याबाबत बातमीचा आग्रह धरला. त्याच वेळी, सध्या दिवाळी महोत्सव सुरू आहे. अनेक अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी सध्या काही *** करू नका अशी विनंती केली आहे. त्यामुळे मी बातमी घेवू शकत नाही असे नमूद केलं होतं. परंतु दरबारी कारभाऱ्यांना नाही कसे म्हणावे म्हणून शिवाजीनगर पोलीस स्टेशनची बातमी नाईलाजास्तव प्रसिद्ध करावी लागली. तथापी पोलीस स्टेशनशी संबंधित नसलेल्या वसुलदाराकडून नाहक बदनामीचे लोण उठविले गेले. विषय मनोज शहाचा आहे, फरासखान्याच्या चंदनकडील भगतचा नाही. तरी देखील अहंकारी भूमिका घेतली असल्याचे ऐकिवात आहे. उत्तर दयायचे आहे, परंतु शिवाजीनगर वगळता पुण्यात 31 पोलीसस्टेशन आणि गुन्हा युनिटची कार्यालये आहेत. इतरही वरीष्ठ अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांचाही विचार करावा लागतो. त्यांच्याही शब्दांना मान दयावा लागतो. त्यामुळे शिवाजीनगरच्या दरबारी कारभाऱ्याच्या प्रश्नांना आत्ता उत्तरे देणे उचित ठरणार नाही. दिवाळीनंतर योग्य ती उत्तर देवूच अन्यथा घडलेला सर्व प्रसंग उपआयुक्तांच्या समोर मांडावा लागेल याची नोंद घ्यावी.