Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सहकारनगर पो. स्टे. हद्दीतील कुप्रसिद्ध गुन्हेगार सुनिल निर्मळच्या दोन जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची पुन्हा छापा कारवाई; रु.1.56 लाखाचे मुद्देमालासह 35 आरोपींविरुद्ध कारवाई.

पुण्यातील जुगार अड्डा चालकांनो,
तुम्ही कितीही लावा शक्ती, तुम्ही कितीही लढवा युक्ती, तुम्ही कितीही करा रे गल्ला – लय मजबुत पुराणिकांचा किल्ला

पुणे/दि/ प्रतिनिधी/
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाकडून सतत जुगार अड्यांवर धाड सत्र सुरू असल्याने, जुगार चालकांनी नवीन शक्कल लढवून फिरून मटका घेणे व सतत जागा बदलणे, आजूबाजूला सीसीटीव्ही लावून त्याद्वारे पोलीसांवर नजर ठेवणे सुरु केले आहे. पोलीस कारवाईची थोडी जरी खबर लागल्यास पसार होण्याची पद्धत सुरू केली आहे. पण आजच्या कारवाईत सहकारनगर पोलिस स्टेशन हद्दीत फिरून व जागा बदलून घेणाऱ्या जुगार चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे

काल सांयकाळच्या सुमारास अवैध मटक्याच्या धंद्याबाबत मिळालेल्या बातमीनुसार, सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, सर्वे नंबर 37/1, फाईव्ह स्टार सोसायटी, धनकवडी येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील निर्मळ हा त्याचे साथीदारांमार्फत दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबई मटका जुगार, पैशावर गैरकायदेशीररीत्या खेळत व खेळवत असलेचे समजलेने, पंचासमक्ष सदर ठिकाणी 19:15 वा. चे सुमारास छापा टाकून  मटका जुगार वगैरे 13 खेळणारे,6 खेळवणारे  व जुगार अड्डा मालक आरोपी 4  व इतर 12 पळून गेलेले अनोळखी इसम अशा एकुण 35 आरोपीत इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(अ), 5  अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
 जुगार अड्डा चालक व मालक नामे सुनिल नारायण निर्मळ, अभिषेक सुर्वे, किशोर लक्ष्मण कांबळे, हे सहकार नगर पोलीस ठाणेकडील रेकॉर्ड वरील कुप्रसिद्ध गुन्हेगार आहे. सामाजिक सुरक्षा विभागाकडून या जुगार अड्ड्यावर यापुर्वीही दिनांक 1/6/22 रोजी रेड झाली होती. परंतू रेडच्या दुसऱ्या दिवसापासूनच सदरचा जुगार अड्डा पुन्हा बिनदिक्कतपणे सुरु झाला. सदर जुगार अड्डा चालकांनी पोलीसांची माहिती अगोदर मिळावी यासाठी चौफेर सीसीटीव्ही सिस्टीम लाऊन ठेवली आहे. सामाजिक सुरक्षा विभागामार्फत या जुगार अड्ड्याची रेकी करुन, कारवाई करण्यात आली.

सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत अटक/कारवाई केलेल्याआरोपीत इसमांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

रेड पॉईंट क्र. 1 – फाईव्ह स्टार सोसायटी, सर्व्हे नं. 37/1, येथील जुगार अड्डा मालक सुनिल निर्मळ याचे घर, सावरकर चौक, धनकवडी, पुणे.

अ) मुंबई मटका जुगार घेणारे/खेळवणारे/रायटर्स/मॅनेजर्स
1) विजय शामराव खैरनार, वय 69 वर्षे, धंदा – कामगार, रा.ठी. सर्व्हे नं. 36, सावरकर चौक, धनकवडी, पुणे.
2) धनंजय भगवान जरांडे, वय 37 वर्षे,धंदा – कामगार, रा.ठी. संभाजीनगर, धनकवडी गांव, पुणे.
3) अमोल भीमराव मंजुळे, वय 29 वर्षे, धंदा – कामगार, रा.ठी. साई सिद्धी चौक, वैष्णवी अपार्टमेंट, 5 वा मजला, आंबेगाव पठार, धनकवडी, पुणे.
4) राहुल रमेश वाबळे, वय 43 वर्षे, धंदा – कामगार, रा.ठी. वनराई कॉलनी, नितीन दूध डेरीच्या बाजूला, धनकवडी, पुणे.

ब) जुगार खेळणारे खेळी आरोपी.
5) चंद्रकांत दामू चव्हाण, वय 65 वर्षे, धंदा – आचारी काम, रा.ठी. बिबवेचाळ, दत्त मंदिरा समोर, आंबेगाव खु., पुणे.
6) काशिनाथ नामदेव वाघमारे, वय 55 वर्षे, धंदा – मजूरी, रा.ठी. सर्व्हे नं. 17/18, अष्टविनायक कॉलनी, गणपती मंदिराजवळ, आंबेगाव बुद्रुक, धनकवडी, पुणे.
7) पोपी साधू ननावरे, वय 48 वर्षे, धंदा – नोकरी, रा.ठी. घर नं.644, रामचंद्र नगर, धनकवडी, पुणे.
8) यशवंत नारायण चिप्नील, वय 62 वर्षे, धंदा – मजूरी, रा.ठी. श्रीनगर, श्री. भिमराव तापकीर अण्णांच्या ऑफिस शेजारी, धनकवडी, पुणे
9) मुंजा बबनराव कोरडे, वय 33 वर्षे, धंदा – मजुरी रा. जिजामाता चौक, आंबेगाव पठार, पुणे.
10) धुरंदर ब्रिजबिहारी सिंग, वय 32 वर्षे, धंदा – मजुरी, रा. ठी. तानाजी नगर, धनकवडी, पुणे.
11) केतन सुनील पासलकर, वय 30 वर्षे, धंदा- इलेक्ट्रिशन, रा. ठी. विकास चव्हाण बिल्डिंग, धनकवडी, घर नंबर 6, पुणे.
12) भिमाशंकर श्रीमंत जमादार, वय 50 वर्षे, धंदा – ड्रायव्हर, रा.ठी. गांव नारायणपुर, तालुका बसवा कल्याण, जिल्हा बिदर, कर्नाटक.
13) नारायण मारुती पासलकर, वय 40 वर्षे, धंदा – नोकरी, रा.ठी. दर्शन सोसायटी, तळमजला, राम मंदिर मागे, आंबेगाव पठार, धनकवडी, पुणे.
14) सुभाष समाधान साळुंके, वय 38 वर्षे, धंदा – नोकरी, रा.ठी. सद्गुरू कृपा सोसायटी, दत्त मंदिराच्या बाजूला, श्रीराम नगर, धनकवडी, पुणे.
15) रोनक सुरेश रणदिवे, वय 30 वर्षे, रा. राजमुद्रा सोसायटी, फ्लॅट नंबर 51, 4था मजला, राघवनगर, धनकवडी, पुणे.

क) जुगार अड्डा मालक व पळून गेलेले पाहिजे आरोपी.
16) सुनील निर्मळ, धंदा – जुगार अड्डा मालक. रा. ठी. फाईव्ह स्टार सोसायटी, सर्वे नंबर 37/1, सावरकर चौक धनकवडी, पुणे.
17) किशोर कांबळे वय 42 वर्षे, धंदा – जुगार अड्डा मालक, रा.ठी. स.न.65 तळजाई माता वसाहत, पद्मावती, पुणे.
18) अभिषेक सुर्वे, धंदा – जुगार अड्डा मालक, रा.ठी. फाइव्ह स्टार सोसायटी, सर्वे नंबर 37/1, सावरकर चौक, धनकवडी, पुणे.
19) विशाल पडवळ, धंदा – जुगार अड्डा दुकान मालक, रा. ठी. फाइव्ह स्टार सोसायटी, स.नं.37/1, सावरकर चौक, धनकवडी, पुणे.
20 ते 28) पोलीस रेड दरम्यान घटनास्थळावरुन पळून गेलेले 9 अनोळखी आरोपीत इसम.

रेड पॉईंट क्र.2 – फाईव्ह स्टार सोसायटी, सर्व्हे नं. 37/1, येथील जुगार अड्डा मालक नामे विशाल पडवळ याचे विश्वगुरु एंटरप्रायझेस नावाचे दुकान, सावरकर चौक, धनकवडी, पुणे.

अ) मुंबई मटका जुगार घेणारे/ राईटर /मॅनेजर आरोपींची नावे.
29) नंदू भिमाशंकर खर्डेकर, वय 64 वर्षे, धंदा – वेल्डिंग, रा. ठी. सावरकर चौक, धनकवडी, पुणे.
30) सुरेश सर्जेराव चव्हाण, वय 58 वर्षे, धंदा – कामगार, रा. ठी. घर नं. 1161, तुळजाभवानी मंदिरा जवळ धनकवडी, पुणे.

ब) जुगार खेळणारे खेळी आरोपी.
31) अशोक बारकु रिठे, वय 53 वर्षे, धंदा – वॉचमन, रा.ठी. यशोदा अपार्टमेंन्ट सोसायटी, प्लॉट क्र. 103, वडगाव बु., पुणे.
32) राजू गोपाल तमंग, वय 41 वर्षे,धंदा – सिक्युरिटी गार्ड, रा.ठी. नारायण नगर, आंबेगाव पठार, पुणे.
33) विशाल पडवळ, धंदा – जुगार अड्डा मालक, रा.ठी. फाईव्ह स्टार सोसायटी, सावरकर चौक, धनकवडी,पुणे (पाहिजे आरोपी)
34 ते 35) पोलीस रेड दरम्यान घटनास्थळावरुन पळून गेलेले 2 पाहिजे आरोपीत इसम.
ही अटक/कारवाई करण्यात आलेल्या आरोपीत इसमांकडून, तसेच घटना स्थळावरुन सुमारे रु.1,52,270/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये रोख रक्कम रु. 9,070/-, व रु. 1,20,800/- किमतीचे 16 मोबाईल हँडसेट व 22,400/- रु. किमतीचे जुगाराचे साहित्याचा समावेश आहे.
( 6 रायटर,13 खेळी, 4 जुगार अड्डा मालक पाहिजे आरोपी + 12 अनोळखी इसम ( पळून गेलेले ) असे एकूण 35 आरोपी विरुद्ध सहकारनगर पोलिस स्टेशन येथे गु.र.क्र.171/2022, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 अ, 5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाकडील वपोनि राजेश पुराणिक मपोउनि पंधरकर, पोउनि चव्हाण, पोह राणे, पोह चव्हाण, पोना पठाण, पोना माने, पोना साबळे, पोना कांबळे, पोशि जमदाडे, पोशि पवार यांच्या पथकाने केली आहे.