Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राहूल गांधीच्या भारत जोडोचे बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण, पण इंडिया मविआचे नाही

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली असल्याची माहिती प्रबुद्ध भारतने प्रसारित केली आहे.

प्रबुद्ध भारतच्या वृत्तात नमूद केले आहे की, आमच्या सुत्रानुसार हे निमंत्रण फक्त ‘भारत जोडो न्याय यात्रे'साठी आहे, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलेले नाही.

वंचित बहुजन आघाडीने मागील चार महिन्यात तीन वेळा काँग्रेस हायकमांडला पत्र लिहले होते. जर काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित केले, तर राज्यात भाजपाला निवडणूक जिंकणे अवघड होईल असेही त्या वृत्तात नमूद केले आहे.