Friday, November 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे पोलीसांना आली लहर…आणि रात्रीत केला कहर…

पोलीसांच्या साध्या अचानक छापामारीत सापडले बंदूका, तलवारी, कोयते, बंदूकीच्या पोतभरून गोळ्या
पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस काही कामच करीत नाहीत, स्थानिक पोलीस गुन्हेगारांवर मेहेरबान आहेत असा आरडा ओरडा सर्व बाजुने होत असल्याने अखेर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने, एका रात्रीत साधी छापामारी केली अन्‌‍ गुन्हेगारांकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत बंदूका, बंदूकीला लागणाऱ्या गोळ्या, कोयते, तलवारी मोठ्या संख्येने पकडले आहेत. त्यातच 14 तडीपार इसम पुणे शहरात वास्तव्य करीत असल्याचे आढळुन आले आहे. ही साधी छापमारी होती. परंतु खरीच मोठी कारवाई केल्यास, दोन/पाच ट्रक भरून शस्त्रसाठी आढळुन येईल यात शंकाच नसल्याचे या कारवाईवरून अनुमान निघत आहे.


पुणे शहरातील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी मागील आठवड्यात भर मध्यरात्री गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशनमधील पथकांनी विशेष मोहिम राबविली. या विशेष मोहिमेत पुणे शहरातील साडेतीन हजार सराईत गुन्हेगारांची झाडझडती घेण्यात आली आहे. साडेतीन हजारापैकी 685 गुन्हेगार मूळ पत्यावर राहत असल्याचे आढळुन आले आहे. त्यातच या गुन्हेगारांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी जप्त करण्यात आला आहे.
पुण्यातील धारावी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकट्या जनता वसाहतीमध्ये गुन्हे शाखा युनिट एक ने 56 जीवंत काडतूसे, 79 खराब काडतुसे, 970 बुलेट लिड जप्त करण्यात आले आहे. तर तिकडे चंदननगर पोलीसांनी एका हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. तसेच 14 तडीपारांवर कारवाई केली आहे.
दरम्यान बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेने तीन जणांना तिनही ठिकाणी कारवाई व अटक केली आहे. बेकायदा तलवारी, कोयते बाळगल्याप्रकाणी 29 जणांना अटक केली असून 2 तलवारी व 21 कायेते जप्त करण्यात आले आहेत.
वरील कारवाई गुन्हेगारांवर जरब बसविण्याच्या उद्देशाने केली असून त्यासाठीच या विशेष मोहिमेचे अचानक नियोजन करण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडील प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. दरम्यान 30 पोलीस स्टेशन व शहराच्या हद्दीजवळील क्षेत्रात जबरी कारवाई केल्यास, यापेक्षा मोठा शस्त्रसाठा आणि खाजगी सावकारांचा तळ सापडू शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे. परंतु पोलीस अशी कारवाई कधी करणार याच प्रतिक्षेत सर्वसामान्य नागरीक आहेत.