Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींविरूद्ध पुणे शहर पोलीस सरसावले,
चंदननगर, भारती व गुन्हे युनिट दोन कडून आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहरात कोयता गँग आणि अल्पवयीन मुलांकडून शहरात जबरी गुन्हे घडविले जात असल्याचे पुणे पोलीसांच्या निदर्शनास आले आहे. त्यातच पोलीस स्टेशन स्तरावरून फरार आरोपींचा शोध लागत नसल्याची सततची ओरड वरीष्ठांकडून होत होती. पोलीस स्टेशन स्तरावरून गुन्ह्यांचे अन्वेषण होऊन फरार व रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेवून कायदेशिर कारवाई करण्याबाबत अधिकचे पाऊल उचलले गेल्यामुळे आज पुणे शहरातील जबरी गुन्ह्यातील फरार आरोपी मिळून आले आहेत. पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट 2 यांच्याकडून प्रत्येक एक फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

चंदननगर पोलीस स्टेशन कडून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या –
चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस अंमलदार सचिन रणदिवे यांना गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंदननगर येथील मातोश्री सोसायटीच्या मोकळ्या मैदानामध्ये नागपाल रोडवर एक इसम संशयास्पदरित्या थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी धाव घेताच, आरोपीने धुम ठोकली. परंतु पोलीसांनी अतिशय शिताफीने हुसेन युनोस शेख वय 19 रा. लक्ष्मीनगर येरवडा याला अटक केली आहे. अंगझडतीमध्ये त्याच्या कंबरेला मागील बाजुस पँन्टचे आतमध्ये लोखंडी कोयता मिळून आला आहे. त्याच्या विरूद्ध विमानतळ व चंदननगर पोलीस स्टेशन येथे यापूर्वी गुन्हे दाखल असून तो अद्यापपर्यंत फरार होता.
ही कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार सुहास निगडे, सचिन रणदिवे, अविनाश संकपाळ, महेश नाणेकर, नामदेव गडदरे, शेखर शिंदे, सुभाष आव्हाड, विकास कदम, गणेश हांडगर, श्रीकांत शेंडे, शिवा धांडे, श्रीकांत कोद्रे व सुरज जाधव यांनी केली आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने पकडले खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला-
आंबेगाव पुणे येथील गायमुख येथे फिर्यादी यांना आरोपी नाना दळवी, प्रेम शिंदे व आकाश काटकर यांनी पानशेत येथे झालेल्या भांडणे मिळवल्याचा राग मनात धरून फिर्यादी व साक्षीदार यांना हाताने व लोखंडी कोयता फिर्यादी यांच्या पाठीवर व किरण भांडरी यांच्या मानेवर मारून जखमी केले होते. त्याच्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. तथापी त्यातील फरारी आरोपींचा शोध लागत नव्हता.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपासी अंमलदार आरोपी प्रेम अंकुश शिंदे रा. दत्तनगर याचा शोध घेत असतांना, आरोपी शिंदे हा शिवापुर वाडा नवकार पार्क येथे कुटूंबियांसह राहण्यास असल्याचे पोलीस अंमलदार चेतन गोरे व निलेश ढमढेरे यांना खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून फरार आरोपी प्रेम शिंदे हा खेड शिवापुर येथे मिळून आला आहे.
ही कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहापोलीस निरीक्षक् अमलोल रसाळ, सचिन धामणे, पोउनि धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, निलेश ढमढेरे, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, अभिजित जाधव, हर्षल शिंदे, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, व विक्रम सावंत यांनी केली आहे.

भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला युनिट दोनकडून जेरबंद-
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील दरोड्याच्या गुन्ह्यातील पहिजे आरोपी सुरज गुप्ता याचा पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट यांच्या मदतीने शोख घैत असतांना तो भोसरी पुणे येथे मिळून आला आहे. आरोपी सुरेश उर्फ सुरज हरिव्दार गुप्ता वय 31 वर्ष रा. भोसरी यास ताब्यात घेवून भारती विद्यापीठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील युनिट क्र. 1 व पोउनिरी नितीन कांबळे, यांनी केली आहे.