Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पुणे शहर पोलीस रस्त्यावर उतरले…. वाड्या-वस्त्या, गल्ली-बोळातून पोलीसांचे लेफ्ट- राईट…

पोलीस उपआयुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडील सर्व पोलीस ठाण्यांची धडक कारवाई….

पुणे/दि/ प्रतिनिधी/natioanl forum
दुसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार तिसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीत येऊन राडा करतात, वाहनांची जाळपोळ, तोडफोड करतात, चौथ्या पोलीस स्टेशन हद्दीत कोयते, तलवारी हवेत फिरवून मस्तवाल गुन्हेगार पोलीसांना आव्हान देत लुटालूट करतात, पुनः हॉटेल फोडले, पेट्रोलपंप लुटला असे गुन्हे देखील कमी नाहीत, तोच अंमली पदार्थांची विक्री, देशी विदेशी दारूची तस्करी, रोजच्या रोज शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना घडत असल्याने, पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्या त्या पोलीस स्टेशन हद्दीत कोंम्बिग ऑपरेशन आणि पेट्रोलिंग वाढविण्याच्या सुचना दिल्यानंतर, आज संपूर्ण पुणे शहरातील पोलीस अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत. मध्यवर्ती पुणे शहरातील लहान मोठ्या रस्त्यावर, गल्लीबोळात पोलीसांनी गस्त वाढविली. यामुळे अनेक गुन्हेगार जेरबंद झाले आहेत. यात पोलीस उपआयुक्त संदीपसिंह गिल परिमंडळ एक यांच्याकडील सर्वच पोलीस ठाण्यांच्या धडक कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

मोक्यातील फरार आरोपीस फरासखाना पोलीसांकडून अटक –
चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुरजि. नं 273/2023 भा.दं.वि कलम 307, 120 (ब),427, 323, 504, 506 (2), 143, 147, 148, 149 आर्म ॲक्ट 4 (25) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3 (1)(2), 3(2), 3(4) मधील पाहीजे आरोपी गणेश मधुकर लोखंडे, रा-मंगळवार पेठ पुणे हा भिमनगर कमानीजवळ थांबला आहे अशी बातमी मिळाल्याने तात्काळ तपास पथकाचे व सर्वेलन्स पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी बातमीप्रमाणे सापळा लावुन पाहीजे आरोपी गणेश लोखडे हा पळुन जात असताना शिताफीने पकडुन ताब्यात घेऊन पुढील तपासकामी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

फरासखाना पोलीस स्टेशनच्या उत्कृष्ठ कामगिरीबाबत पोलीस उप-आयुक्त संदीपसिंह गिल यांनी अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार केला आहे. ही कारवाई फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. दादासाहेब चुडाप्पा, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मंगेश जगताप, पोलीस निरीक्षक, रविंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, तुषार खडके, अजित शिंदे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, मोहन दळवी, पंकज देशमुख, किशोर शिंदे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, गणेश आटोळे, सुमित खुट्टे यांच्या पथकाने केली आहे.

जिवघेणे हत्यारे बाळगणाऱ्या अरबाज शेख वर एमपीडीए कारवाई –
पुणे शहरातील खडक रोड पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे अरबाज उर्फ बबन इक्बाल शेख वय 24 वर्षे, रा. 386, भवानी पेठ, चुडामन तालीम समोर, पुणे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह खडक, समर्थ, लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरा, पालघन, तलवार, कोयता या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी. दिवसा व रात्री घरफोडी, विनयभंग, चोरी, दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील 05 वर्षांमध्ये त्याचेविरूध्द 11 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन श्री. रितेश कुमार. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे 01 वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री. सुनिल माने. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन पुणे व श्रीमती वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.

सराईत मोबाईल चोरास समर्थ पोलीसांनी केली अटक –
आऊट ऑपरेशच्या अनुषंगाने समर्थ पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक कारवाई व गुन्हेगार चेकींग करीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार रोहिदास वाघीरे व पोलीस हवालदार जितेंद्र पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम हातामध्ये पांढऱ्या रंगाची पिशवी घेवून नाना पेठ, मच्छी मार्केट येथे संशयास्पद उभा आहे. त्यावरुन त्यांनी तपास पथकातील अधिकारी सुनिल रणदिवे यांना बातमीचा आशय कळविल्याने तपास पथक अधिकारी व अंमलदार तात्काळ नाना पेठ, मच्छी मार्केट येथे पोहचुन प्राप्त बातमी प्रमाणे एक इसम संशयीतरित्या हातामध्ये सफेद रंगाची पिशवी त्यामध्ये काहीतरी समान घेवून जात असताना दिसुन आला. त्यास हाटकले असता तो पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यास शिताफीने पकडुन त्याचे हातातील पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये मोबाईल असल्याचे आढळुन आल्याने त्यास नाव व पत्ता विचारता कुंदनकुमार अर्जुन माहातो, वय 25 वर्षे, रा. झारखंड सध्या राह. मुंबई अंधेरी चकाला मरुग पाईपलाईन साईबाबा मंदिराजवळ, मुंबई असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक तपास करता तो मुंबई येथुन पुण्यात येवून मच्छी मार्केटमध्ये मच्छी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरीकांचे मोबाईल चोरुन परराज्यात नेवून विकत असतो. त्याचे अंगझडती व घरझडतीतुन चोरीस गेलेले एकुण 5 लाख 9 हजार रुपये किंमतीचे एकुण 29 स्मार्ट फोन / मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे. श्री.सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सुनिल रणदिवे, सपोफी दत्तात्रय भोसले, पोलीस हवा. रोहिदास वाघिरे, जितेंद्र पवार, गणेश वायकर, प्रमोद जगताप, पोलीस नाईक रहिम शेख, पोशि कल्याण बोराडे, अमोल शिंदे, शरद घोरपडे, संदिप पवार ज्ञानेश्वर सुर्यवंशी. हेमंत पेरणे यांनी केली आहे.

रात्री-अपरात्री हत्यारांसह दरोडा घालणाऱ्यांना शिवाजीनगर-डेक्कन पोलीसांनी केले जेरबंद –
काँग्रेस भवना समोरील वृद्धेश्वर घाट शिवाजीनगर, येथे नदीपात्रालगत असलेल्या गोठ्याजवळ 8-9 मुले ही हातामध्ये धारदार शस्त्रे घेवुन काही योजना आखत असलेबाबत सहा पोलिस निरिक्षक भोलेनाथ अहिवळे यांना गोपनीय माहिती मिळाली. लागलीच सपोनि अहिवळे यांनी सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना कळविले.
बातमीच्या अनुषंगाने वृध्देश्वर घाट, शिवाजीनगर पुणे येथे नदीपात्रालगत असलेल्या गोठ्याजवळ 8-9 मुले ही हातामध्ये धारदार शस्त्रे घेवुन उभे असल्याचे दिसून आले. दरम्यान नदीपात्रातील अंधाराचा व मोकळ्या मैदानाचा फायदा घेवुन पळुन जावु नये याकरीता भोलेनाथ अहिवळे यांनी त्याठिकाणी अंधारामध्ये दबा धरून, डेक्कन पोलिस ठाणे कडील राजगस्तीवर असलेल्या महिला पोलिस उप निरिक्षक मिरा कवटीकवार आणि त्यांच्या पोलिस स्टाफची मदत मागितली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन डेक्कन पोलिस ठाणे कडील राजगस्तीवर असलेल्या महिला पोलिस उप निरिक्षक मिरा कवटीकवार आणि त्याचा पोलिस स्टाफ हा तात्काळ त्याठिकाणी हजर झाला. यावेळी सापळा रचुन, मुलांना पोलीस आल्याचे समजल्यावर ते पळून जात असताना त्यांचा काही अंतरावर पळत जावुन पाठलाग करुन त्या सर्वांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

यावेळी त्यांना त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांची नावे - 1) गौतम ऊर्फ लखन अंबादास बनसोडे वय 29 वर्ष राहणार पीएमसी कॉलनी, बिल्डिंग नंबर 3 राजेंद्रनगर पुणे 2) राम विलास लोखंडे वय 23 वर्ष.नवी पेठ पुणे 3) सुनिल बाबासाहेब कांबळे, वय 20 वर्ष, रा. गल्ली नंबर 10. पाटील इस्टेट. शिवाजीनगर पुणे 4) अश्रु बंदु गवळी, वय 19 वर्ष, रा. दांडेकर पुल, पुणे 5) रोहन किरण गायकवाड वय 19 वर्ष, रा. गल्ली नंबर 5 पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे 6) रोहित चांदा कांबळे, वय 19 वर्ष. रा. गल्ली नंबर 10. पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे 7) किरण सिताप्पा कांबळे वय 19 वर्ष, रा. गल्ली नंबर 5. पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे 8) ओंकार बाळु ननावरे वय 21 वर्ष, रा. राजेंद्रनगर, नवी पेठ पुणे 9) श्याम विलास लोखंडे, वय 20 वर्ष, रा. राजेंद्रनगर, नवी पेठ पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेवुन त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी हत्यारासह साई पेट्रोलपंप, जंगली महाराज रोड येथे जावुन लुटमार करणार होतो असे सांगितले.

या आरोपीकडून एक लोखंडी कोयता, एक स्टिलचा रॉड, दोन चाकु, 9 मास्क, एक मिरचेची प्लास्टिकची पुड आणि नायलॉनची रस्सी असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे. याबाबत सदर आरोपींवर डेक्कन पोलिस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं 107/2023 भादवि कलम 399 व  402 अन्वये गुन्हा नोंद करणेत आलेला आहे.

ही कामगिरी  डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विपीन हसबनीस, शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने,  श्री विक्रम गौड पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री शंकर साळुंखे, सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, महिला पोलिस उप निरिक्षक मिरा कवटीकवार, पोलीस अंमलदार सिध्देश्वर वाघोले. रामकृष्ण काकड, श्रीकृष्ण सांगवे, विकास सराफ आणि डेक्कन पोलिस ठाणेकडील पोलीस अंमलदार अशोक इनामदार, गणेश तरंगे, शेखर कौटकर, निलेश सोनवणे, नागनाथ बागुले, जगदीश तळोले, मिलींद कदम यांनी केलेली आहे. यावेळी पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी कामगिरी करणाऱ्या पोलीसांचा सन्मान केला आहे. 

नागरी वस्त्यांमध्ये गुन्हेगारी वाढण्याचे प्रमाण अधिक –
पुणे शहरात सुमारे 577 झोपडपट्ट्या आहेत. चिटकुन घरे आणि लोकसंख्येची घटता अधिक असते. त्यात मोठ्यांचे अनुकरण करण्याची सवय अधिक लागते. चौथी पाचवीत असतांनाच गुटखा आणि तंबाखुशी मैत्री होते. पुढे बिअर …. आणि त्याच्याही पुढे नंतर विदेशी वाईन व पुढे देशी आणि हातभट्टी असा चढता आणि उतरता क्रम सुरू असतो. व्यसन करण्यासाठी मग घरफोडी, पाकीटमारी सुरू होते. पुढे येरवडा अमंगळ कार्यालयाच्या मांडवाखालुन एक दोन वर्षानंतर बाहेर आल्यानंतर, कुठल्यातरी टोळीत सहभागी होतात. पुढे गुन्हेगारी वाढत जाते. मध्यवर्ती पेठांमध्ये देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे मुख्य गुन्हेगारांना प्रथम झोडपून काढणे आवश्यक आहे. आता बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत मुख्य आरोपीची वरात काढल्या जात आहेत. ही अतिशय उत्तम बाब असून, पोलीसांनी गस्ती बरोबरच, आरोपींची वरात काढल्यास निदान काही वर्ष तरी ही जरब कायम राहिल यात शंकाच नाही.

या विषयाने आठवण झाली की, कुण्या एकेकाळी पुण्यातील प्रतिष्ठीत अशा वाडीया कॉलेज मध्ये  जवळच्या झोपडपट्टीतील मुले येवून विद्यार्थ्यानींची छेडछाड करायचे. त्याकाळी येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शामराव धुळूबुळू होते. श्री. धुळूबुळू यांनी छेडछाड करणाऱ्या मुलांना पकडून अर्धनग्न करून संपूर्ण येरवड्यात वरात काढली होती. त्याचा त्या काळात परिणाम इतका झाला की, वाडीया कॉलेजकडे अनेक वर्ष डोळे वर करून कधीच कुणी पाहिले नाही. दुर्देव.. असे की, कुण्या मानवाधिकार बहाद्दराने तक्रार केल्याने, त्यांची बदली पुढे सीआयडीमध्ये झाली. मागाहून 10/12 वर्षांनी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे त्यांना पोस्टींग देण्यात आली. खात्याने देखील पोलीसांचा सन्मान ठेवणं आवश्यक आहे. आज ते हयात नाहीत... पण सहज आठवण झाली...

कालपरवा देखील सहकारनगर पोलीस स्टेशनवर करण्यात आलेली कारवाई देखील अनावश्यक म्हणावी लागेल. आरोपींवर कारवाई करून देखील साळगावकरांची अपमानास्पद बदली करणे योग्य ठरत नाही. स्वतःच्या पोलीस स्टेशनवर नियंत्रण होतेच, परंतु शेजारच्या पोलीस स्टेशन मधील गुन्हेगारांनी सहकारनगरमध्ये येऊन धुडगुस घातला आहे. त्यात त्यांना दोषी ठरवणं योग्य ठरत नव्हते. खात्याने देखील पोलीसांच्या धाडस आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे असे कायदयाचा आणि मानवाधिकाराचा अभ्यासक म्हणून मला वाटते.