Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहर पोलीस दलातील जुगार अड्ड्यावरील आजपर्यंतची सर्वाधिक मोठ्ठी कारवाई, पुणे शहर पोलीसातील पुराणिक पॅटर्न,

s s cell pune police

शिवाजीनगर पो. स्टे. हद्दीत एकाच वेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचे छापे, सुमारे रु.4.55 लाखाचे मुद्देमालासह, एकुण 55 आरोपींविरुद्ध कारवाई.

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/नॅशनल फोरम/
पुणे शहर पोलीसांनी मागील 30 वर्षात शेकडोंनी गुन्हेगारांवर व जुगार अड्ड्यावर कारवाया केल्याही असतील, परंतु सामाजिक सुरक्षा विभागाने आजपर्यंतचा इतिहास मोडीत काढीत, गुन्हेगारांसह जुगार अड्डे चालविणाऱ्यांवर चांगलीच जबर बसविली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील लॉटरीच्या जुगार अड्डयांवर कारवाई करून सुमारे साडेचार लाखाच्या मुद्देमालासह 55 आरोपींना अटक केली आहे. आज पर्यंतच्या इतिहासात जुगार अड्डयांवरून एवढा मुद्देमाल आणि एवढे आरोपी कधीच अटक केले नव्हते. परंतु सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी इतिहास घडविला आहे. पुणे शहर पोलीस दलात एक आदर्श निर्माण करून राजेश पुराणिक यांचा पुराणिक पॅटर्न पुणे शहरात प्रसिद्ध झालेला आहे. राजेश पुराणिक यांच्या सारखे काही मोजके अधिकारी जरी असले तरी शहरातील गुन्हेगारीसह अवैध धंदे व बेकायदेशिर कृत्यांना पायबंद बसू शकतो हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने दाखवुन दिले आहे.

काल सायंकाळच्या सुमारास अवैध  मटक्याच्या ऑनलाईन धंद्याबाबत मिळालेल्या बातमीनुसार, शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, पुणे महापालिका कार्यालयालगत असलेल्या मंगला टॉकीज चौक, शिवाजी नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील, रामसर बेकरी कॉर्नर शेजारच्या अनुक्रमे स्वस्तिक लॉटरी सेंटर, स्टार लॉटरी सेंटर, सवेरा लॉटरी सेंटर, साई प्रतिक लॉटरी सेंटर, शहा लॉटरी सेंटर, जीपीएस लॉटरी सेंटर अशा एकूण सहा दुकानात सुरू असलेल्या ऑनलाइन मटका व इतर प्रकारचे जुगार, पैशावर गैरकायदेशीररीत्या खेळत व खेळवत असलेचे समजलेने, पंच, बनावट ग्राहक व पोलीस पथकासह जाऊन, सदर ठिकाणी   16.05 वा. चे सुमारास छापा टाकून मोबाईल व संगणकाचा वापर करुन ऑनलाईन मटका व इतर जुगार वगैरे खेळणारे, खेळवणारे  व पाहीजे आरोपी असे एकुण 55 इसमांविरुद्ध भा. दं. वि. कलम 420, सह कलम 120 (ब), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(अ) व 5 तसेच इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट कलम 66 (सी) व (डी) अन्वये शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जुगार अड्ड्यावर अटक/कारवाई केलेल्याआरोपीत इसमांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

दुकान क्रमांक 1.
स्वस्तिक लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी अशा आरोपींची नांवे
1) अब्दुल रशीद हबीब मोहम्मद मेमन, वय- 52 रा- शिवाजीनगर, तोफखाना 21/23, पुणे.
2) विजय श्रीरंग बनकर, वय 52 वर्षे, रा.225 शिवाजीनगर गावठाण, पुणे
3) राजेंद्र हरिभाऊ माने, वय-53 वर्षे, रा. सर्वे नंबर 7, तळजाई पठार, धनकवडी, पुणे.
4) सतीश किसन बोगार, वय – 48 वर्षे, रा. साठे वस्ती, महादेव मंदिराजवळ, चाळ नंबर 4, घर नंबर 4, लोहगाव पुणे
5) किशोर रमेश देवकुळे, वय – 30 वर्षे, रा- दीप बंगला चौक, महाले नगर, म्हसोबा मंदिर समोर, वडारवाडी, पुणे
6) बच्चेलाल भगवती गौड, वय – 48 वर्षे, रा. मस्तानी आईस्क्रीमसमोरची बिल्डिंग, बुधवार पेठ, पुणे
7) श्रावणसिंग दौलतसिंग नाथावत, वय- 40 वर्षे, रा.सभा भवनसमोर, रोहित लॉटरी, बुधवार पेठ, पुणे.
8) संदीप यशवंत राजपूत, वय 39 वर्षे, रा. शिवनगर, तापकीर चाळ, सुतारवाडी, पुणे.
दुकान क्रमांक – 2.
स्टार लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी यांची नांवे.
9) प्रविण गुलाबराव शेळके, वय-52 वर्षे,
10) रियाज बादशा हणुरे, वय 38 वर्षे,
11) रफिक अहमद शेख, वय- 40 वर्षे, धंदा जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. गोसावी वस्ती, वैधवाडी, हडपसर, पुणे – 13.
12) बाळासाहेब गणेश जेधे, वय-35, धंदा -जुगार मालक, रा. स.नं 382, बरके आळी, सोमवार पेठ, पुणे.
13) मंगेश आबासाहेब शितोळे, वय-34 वर्षे, जुगार खेळणारा, रा. शितोळे बिल्डींग, जुनी सांगवी शेवट बस स्टॉप, पिंपरी चिंचवड, पुणे.
14) किसन प्रकाश तेलोरे,वय-38 वर्षै, धंदा जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा.ठी. स.नं.13/14, पुष्पक गॅस गोडाऊनचे मागे, बिबवेवाडी, पुणे.
15) अजय बाबुराव शिवमोरे, वय – 29 वर्षे, धंदा – जुगार खेळणारा, रा.ठी. शिवशंकर कॉलनी, थेरगांव, पिंपरी चिंचवड, पुणे.
दुकान क्रमांक 3.
सवेरा लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स व खेळी यांची नांवे.
16) राजेश प्रेमचंद यादव, वय – 35 वर्षे, धंदा – जुगार घेणारा मालक, रा. दुगदचाळ, संतोष नगर, कात्रज, पुणे.
17) दिपक मथुरावाला ओझा, वय – 21 वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. 309, सोमवार पेठ, जोशीवाडा, पुणे.
18) किशोर गणपती नगराळे, वय 30 वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. आयान हॉस्टेल, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे.
19) विजय रामफल भिल्लोड, वय – 46 वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. फारशी चाळ, देहूरोड रेल्वे स्टेशन, पुणे.
20) सुरेश गणपत गारडे, वय-54 वर्षे, धंदा – जुगार मालक, रा. गणेश नगर, पोकळे चाळ, धायरी, पुणे.
21) राहुल प्रकाश जगधने, वय- 34 वर्षे, धंदा जुगार खेळणारा, रा. ठी. शितोळे बिल्डींग, 2389, न्यू मोदीखाना, पूना कॉलेज समोर, कॅम्प, पुणे.
22) बापू कारभारी भोसले, वय 52 वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा.ठी. सोमेश्वरवाडी, दळवी वीट भट्टी, औंध, पाषाण, पुणे.
23) सुभाष श्रावण देवरे, वय – 43 वर्षे, धंदा – जुगार खेळणारा, रा. ठी. अमृततुल्य हॉटेलचे मागे, पाटील इस्टेट, पुणे.

24) गणेश विजयसिंग परदेशी, वय – 45 वर्षे, धंदा – जुगार घेणारा, रा.ठी. ओमकार कॉलनी, विजय नगर, काळेवाडी, पिंपरी, पुणे.
25) गोपाळ कुमार पारेकर, वय – 22 वर्षे, धंदा – जुगार घेणारा, कामगार/ रायटर, रा.ठी. ग्रीनफिल्ड सोसायटी, ए वींग, दुसरा मजला, साई मंदिर, कात्रज
दुकान क्रमांक – 4.
साई प्रतिक लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स व खेळी यांची नांवे.
26) नितीन विठ्ठल डोंगरे, वय – 52 वर्षे, धंदा – जुगार मालक, रा.ठी. नागपूर चाळ, सर्व्हे नंबर 191, अशोक जनरल स्टोअरचे शेजारी, येरवडा, पुणे-
27) महेंद्र बाबू बेरी, वय 32 वर्षे, धंदा – रायटर, रा. ठी. सर्व्हे नंबर 10, पर्णकुटी, येरवडा, पुणे –
28) रामदास दत्तात्रय खैरे, वय – 57 वर्षे, धंदा- ऑनलाईन मटका रायटर, रा. ठी. 1056/57, भवानी पेठ, पुणे- 42.
29) सलीम रशीद शेख, वय-25 वर्षे, धंदा – ऑनलाईन मटका रायटर, रा. ठी. ग्रीन हिल पार्क, कात्रज, पुणे.
30) दर्शन गोलूराम साहू, वय-43 वर्षे, धंदा – गवंडी, रा. ठी. नांदेड फाटा, नाल्याशेजारी, पुणे.
31) सुशिल प्रेमानंद पवार, वय 41 वर्षे, धंदा- नोकरी, जुगार खेळणारा, रा. ठी. 432, रास्ता पेठ, पुणे-11.
32) धनंजय बाळासाहेब कानगुडे, वय- 32 वर्षे, धंदा – ड्रायव्हर, जुगार खेळणारा, रा.ठी. हिंजवडी फेज वन, साखरे वस्ती, विठ्ठल मंदिरा शेजारी, चिंतामणी निवास, बी – 65, पुणे.
33) राजकुमार रामअजर सरोज, वय- 21 धंदा – कुक, जुगार खेळणारा, रा. ठी. बांबू हाऊस हॉटेल, शिवाजीनगर, पुणे.
34) प्रकाश सारंधर कंकाळ, वय – 55 वर्षे, धंदा- हमाली, जुगार खेळणारा, रा. ठी. रहाटणी, रामनगर, पुणे.
35) राजेंद्र जगन्नाथ बेल्हेकर, वय-53 वर्षे, धंदा- नोकरी व जुगार खेळणारा रा. ठी. नवी सांगवी, तालुका हवेली, जिल्हा पुणे.
36) विलास मरीबुवा सरजे, वय- 31 वर्षे, धंदा- नोकरी, जुगार खेळणारा, रा. ठी. बालाजी नगर, भोसरी पुणे.
दुकान क्रमांक 6.
जीपीएस लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स व खेळी यांची नांवे
37) प्रवीण महादेव नगराळे, वय- 31 वर्षे, धंदा – जीपीएस लॉटरी मालक, रा.ठी. शिक्षक सोसायटी, इंगोले नगर, पिंपळे निलख, पुणे.

38) सिद्धू दत्तू गायकवाड, वय 37 वर्षे, धंदा जुगार घेणारा कामगार/ रायटर. रा.ठी. मनोभूषण अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 04, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, पुणे.
घटनास्थळावरुन पळून गेलेले पाहीजे आरोपींची नावे
39) साई प्रतिक लॉटरी सेंटर, दुकान नंबर 4 चा मालक नामे ज्ञानेश्वर बबन भगत, वय 58 वर्षे, रा.ठी. मुंढवा, पुणे. (पुर्ण पत्ता माहीत नाही)
40) शहा लॉटरी सेंटर, दुकान नंबर 5 चा मालक नामे मनोज शहा, (पुर्ण पत्ता माहीत नाही),
41). व . या ऑनलाईन लॉटरीचे मालक व बुकीज.
42 ते 55) दुकान नंबर 5 व 6 मधून पळून गेलेले एकुण 14 अनोळखी रायटर्स व खेळी, नांव व पत्ता माहित नाही.
अटक/कारवाई करण्यात आलेल्या आरोपीत इसमांकडून, (जुगार अड्डा मालक, रायटर, खेळी व पाहीजे असलेले अनोळखी इसम (पळून गेलेले ) असे एकुण 55 आरोपी) यांचेकडून व घटनास्थळावरुन एकुण रु.4,55, 580/- रु.चा मुद्देमाल (त्यामध्ये रोख रु. 66, 980/- , तसेच रु. 1,83,500/- किंमतीचे 36 मोबाईल सेट्स व रु. 2, 05,100/- रु चे जुगाराचे साहित्य) हस्तगत करण्यात आला आहे.
जुगार अड्ड्यावरील अटक/कारवाई केलेल्या आरोपी विरुद्ध शिवाजी नगर पोलिस स्टेशन येथे गु. र. क्र. 107/2022, भा.दं.वि. कलम 420 सह 120 (ब), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 अ, 5 तसेच इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट कलम 66 (क) व 66 (ड) अ्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


जुगार अड्डा मालकांची चलाखी पहा –
शिवाजीनगर परिसरातील मंगला चित्रपट गृहासमोरील चौकात (पुणे महापालिका चौकात) रामसर बेकरी ते आलोक रेस्टॉरंट ॲंड बारचे दरम्यान असलेल्या व सध्या बंद पडलेल्या सिंध पंजाब हॉटेलच्या एकाच लाईनीतील एकुण सहा गाळ्यात स्वस्तिक लॉटरी सेंटर, स्टार लॉटरी सेंटर, सवेरा लॉटरी सेंटर, साई प्रतिक लॉटरी सेंटर, शहा लॉटरी सेंटर, जीपीएस लॉटरी सेंटर अशा वेगवेगळ्या नावाने सदरचा ऑनलाईन लॉटरीचे नावाखाली हे ऑनलाइन जुगार अड्डे सुरू करण्यात आलेले होते. सदर जुगाराचे अड्डे बाहेरुन बघीतले तर सर्व साधारण माणसाला ओळखू न येणारे असे आहेत.
सदर जुगार अड्ड्यांचे मुख्य प्रवेशद्वारांवर जाड कापडाचे गडद रंगाचे मळके पडदे लावलेले असून, त्यामुळे आत लाईट सुरू असला अथवा कितीही गर्दी झाली तरीही, बाहेरच्या व्यक्तीस आतले काहीच दिसत नाही किंवा ऐकू येत नाही. या जुगार अड्ड्याचे दुकानाबाहेर व आसपास या जुगार अड्ड्यावरचे शुटर्स (इंन्फॉर्मर्स) बसलेले असतात. ते बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीबाबत आतल्या व्यक्तीस मोबाईल वरुन माहिती पुरवत असत. पोलीस येणार असल्याची माहिती मिळाल्यास सर्व जुगारींना मागच्या दाराने पळवून लावून, शेजारच्या दुकानातून दिलेला विद्युत पुरवठा खंडित केला जातो. बाहेरच्या रस्त्यावर सतत प्रचंड वाहतूक असल्याने या जुगार अड्ड्याकडे खेळणारे सोडले तर इतरांचे सहसा लक्ष जात नाही.

याठिकाणी ऑनलाईन ॲपद्वारे व पांढऱ्या प्लास्टिक पेपर शीटवर जुगार खेळण्यात येतो. खेळींनी लावलेला आकडा एका पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक पेपरवर लिहला जातो. तो नंबर लक्षात ठेवण्यासाठी खेळी हा त्याचा मोबाईल मध्ये फोटो काढून घेतो. व काही क्षणातच या जुगाराचा ऑनलाईन निकाल लागतो. या ऑनलाईन जुगार प्रकारात जुगार अड्डा मालक, चालक, बुकीज, ॲपचा मालक व चालक यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून, कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे न वापरता संगणकावर ऑनलाईन व्यवहार करुन शासन महसूल बुडवून, राज्य सरकारची देखील फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आले आहे.
वरील कारवाई श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्री. श्रीनिवास घाटगे, मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनखाली,


सामाजिक सुरक्षा विभागाकडील व. पो. नि. राजेश पुराणिक, मपोउनि पंधरकर, मपोह मोहिते, मपोह शिंदे, मपोह पुकाळे, पोह कुमावत, पोना पोटे, पोशि भोसले, पोशि जमदाडे, पोना पठाण, पोना कांबळे, यांच्या पथकाने केली आहे.
विशेष म्हणजे माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशानुसार सदर कारवाईत परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक यांचे एक पथकही सहभागी झाले होते.