Friday, January 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहरात गुन्हेगारांचा नंगानाच, कायदा आणि सुव्यवस्था दिसते तरी कुठे….
खडक – हडपसर पोलीस ठाणे हद्दीत हवेत कोयते फिरविले, खडकीत अडीज लाखाचा दरोडा

पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल फोरम/
श्रावण महिना संपत आलेला आहे. पुण्यात गणेशोत्सवाची तयारी धुमधडाक्यात सुरू आहे. घरोघरी गौरी गणपतीच्या सजावटीसाठी पुणेकर मंडळी रस्त्यावर उतरली आहेत. घरांच्या साफसफाईसह रंगरंगोटी जोरदार सुरू असतांना, पुण्यात गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वीच गुहेगारांनी डोके वर काढले आहे. खडक पोलीस स्टेशन हद्दीत एका मोठ्या टोळक्याने भर रस्त्यावर धारदार व घातक शस्त्रे हवेत फिरवुन दशहत माजविली आहे. हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत देखील लोखंडी पट्टया आणि दगडाने ठेचून मारहाण करण्यात आली आहे. तर खडकी पोलीस स्टेशन हद्दीत तर एका डेअरीवर दरोडा टाकुन अडीज लाख रुपये लुटून नेले आहेत. थोडक्यात संपूर्ण पुणे शहरात गुन्हेगारांनी उच्छाद मांडलेला असल्याचे दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था ही फक्त पोलीसांच्या बैठकीत कागदावर मांडली जातेय की काय अशी शंका आता पुणेकर व्यक्त करू लागले आहेत.

खडक पोलीस स्टेशन –
खडक पोलीस स्टेशन हद्दीत 8/10 टोळक्यांनी एकत्र येऊन सार्वजनिक रस्त्यावर नंगानाच केल्याचा प्रकार समोरआला आहे. अहमद शेख वय 28 फिर्यादी हे कुर्ला मुंबई येथुन काशेवाडी भवानीपेठ पुणे येथे राहणाऱ्या बहीणीस भेटण्यासाठी आले होते. दि. 23/08/2022 रोजी 00/30 वा. चे सुमारास जुना मोटार स्टॅन्ड भवानीपेठ पुणे येथे फिर्यादी व त्यांचे ओळखीचे इसम असे बोलत थांबले असताना, 1 ) रेहान इलाईस बागवान वय 23 वर्ष 2 ) रशीद अनुबुखार कुरेशी वय 23 वर्ष 3 ) आरिफ नबी शेख य 22 वर्ष 4 ) मुख्तार सलीम पठाण वय 24 वर्ष 5 ) अलताफ शेख वय 21 वर्ष 6 ) वाहीद अनुबखार कुरेशी वय 22 वर्ष 7 ) बिलाल फारूख सय्यद वय 1 9 वर्ष 8 ) सोहेल अफझल पटेल वय 21 वर्ष सर्व राहणार कासेवाडी पुणे ( अटक ) व इतर एक ( अटक नाही ) या इसमांनी एकत्र येवून पूर्वी झालेल्या वादाचे कारणावरून यातील अलताफ शेख याने त्याचे हातातील कोयत्याने फिर्यादी अहमद शेख यांच्या डोक्यावर व डाव्या हातावर मारुन फिर्यादीस जखमी केले व मुख्तार पठाण याने त्याचे हातातील पालघनने फिर्यादीचे दोन्ही पायावर व उजव्या हातावर माराहाण करुन गंभीर जखमी केले . तसेच रेहान बागवान राशिद कुरेशी , आरिफ शेख , वाहीद कुरेशी , बिलाल सय्यद , गफार शेख , सोहेल पटेल यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . तसेच मोठमोठ्याने ओरडुन हातातील कोयते हवेत फिरवुन परीसरात दहशत निर्माण केली आहे .
खडक पोलीस स्टेशन येथे 252/2022 नुसार गुन्हा केला असून आरोपींविरूद्ध भादविक 307,323.504,506 , 143 , 147 , 148 , 14 9 , क्रिमीनल लॉ ॲमेंटमेंट ॲक्ट कलम 7 भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 , महा . पोलीस अधि . कलम 37 ( 1 ) ( 3 ) सह 135 नुसार गुन्हे दाखल केले आहे. अधिक तपास पो.उप निरी , प्रल्हाद डोंगळे करीत आहेत.

हडपसर पोलीस स्टेशन –
दिनांक 22/08/2022 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हडपसर वाहतुक विभागाच्या पाठीमागे कॉलीटि बेकरी जवळील कॅनल जवळ वैदवाडी हडपसर पुणे, वर नमुद केले ता . वेळी व ठिकाणी यातील 17 वर्षांचा एक बालक हा फिर्यादी यांच्या ओळखीचे त्यांच्या परीसरात राहणारे इरफान गुलाब महमंद शेख उर्फ टिल्ली वय 18 वर्ष रा . रामटेकडी हडपसर पुणे अज्ञात ( अटक ) व इतर तीन इसमांनी फिर्यादी यांच्याशी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनामध्ये धरून फिर्यादी यांना दगडाने व लोखंडी धातुच्या पट्टीने डोक्या मध्ये जिवे ठार मारण्याच्या उददेशाने मारुन तसेच त्यांना लाथाबुक्कयांनी तोंडावर व डाव्या डोळ्यावर माराहाण करुन शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली आहे. हडपसर पोलीस स्टेशन येथे 105 9 / 2022 नुसार गुन्हा नोंद करून आरोपींविरूद्ध भादविक 307.323.504,506.34 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. अधिक तपास सहा.पो. निरी. संतोष डांगे करीत आहेत.

खडकी पोलीस स्टेशन –
खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील रवीराज हॅरिटेज, बिल्डीमध्ये शॉप नं . 14 भाऊ पाटील रोड, बापोडी पुणे येथे वर्मा डेअरी ॲन्ड एंटरप्रायजेस नावाची डेअरी, दि. 22/08/2022 रोजी रात्री साडेदहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शटर व कुलुप लावुन बंद असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने सदर शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करुन डेअरीचे गल्यामध्ये ठेवलेली 2.51,200 / – रु रोख रक्कम घरफोडी चोरी करून नेली आहे.
चोरीची फिर्याद अमित वर्मा, वय 46 वर्षे, रा. बोपोडी, यांनी दिली असून खडकी पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यावरिद्ध 223/2022 नुसार गुन्हा नोंद करून अज्ञात चोरट्यावर भादविक 454,457,380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.उप निरी मोहन साळवी करीत आहेत.