Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

लैंगिक उत्तेजना होणारा दाखविला व्हिडीओ, नग्न होण्यास पडले भाग… मग काय… झाले स्क्रीन रेकॉर्डिंग आणि गमाविले साडेचार लाख…

वकीलाकडून बलात्काराची केस करण्याची धमकी, व्यावसायिकाला 17.50 लाखाला गंडा,
ॲड. विक्रम भाटे व निधी दिक्षित यांच्याविरूद्ध हडपासर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/
व्हॉटसॲप वरून फोन चॅटींग करून ओळख वाढवायची, चॅटींग करायचे, मग अश्लिल व्हिडीओ पाठवायचा, लैंगितक उत्तेजना वाढवायची पुढे नग्न होण्यास भाग पाडायचे, त्याच्याही पुढे स्वतःच्या फ्लॅटवर बोलावून घ्यायचे, फोटोंसह अश्लिलतेचा बाजार मांडायचा पुढे मग ब्लॅकमेलिंगला सुरूवात… घाबरून लाखो रुपयांना चुना… पुढचा रस्ता पोलीस स्टेशनचा… बस्सा बोंबलत…
पुणे शहरात सध्या हनी ट्रॅपचे प्रकार सर्रास वाढले आहेत. दरम्यान सायबर क्राईम करणाऱ्यांचा धंदा अगदी तेजित आला आहे. पोलीसांकडून वारंवार सुचना देऊन देखील नागरीक बळी पडण्याची संख्या काही कमी होताना दिसत नाहीये. चालु सप्ताहात अनेक प्रकरणे समोर आली असून, अजूनही पोलीसात येणारी प्रकरणे किती असु शकतात असाही सवाल निर्माण झाला आहे. चालु सप्ताहात दोन मोठी प्रकरणे झाली आहे. एका प्रकरणांत मॉर्डल कॉलनी कोथरूड येथील एका 64 वर्षीय ज्येष्ठ नागरीकाला व्हॉटसटॅप वरून एक कॉल आला, कॉलला प्रतिसाद दिल्याने चॅटींग सुरू केले… चॅटींग करता, करताच लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ सेंड केला आणि मग काय त्याला देखील नग्न होण्यास भाग पडले. मग काय… झाले स्क्रीन रेकॉर्डिंग आणि गमाविले साडेचार लाख…


दुसऱ्या प्रकरणांत तर हिंदी चित्रपटाला शोभेल अशी स्टोरी घडली आहे. मित्र – मित्राचा घात कसा करतो याची ताजीतवानी घटना घटली आहे. त्यात थेट वकीलाच्या सहभागाने तर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान भाजीवाल्याच्या गाडीवरून पाच दहा गड्डया खाली वर करून मोलभाव करून भाजी घेणारे पुणेकर मंडळी अशा अश्लिल प्रकरणांत नेमके कसे अडकतात यावर पीएचडीच्या एखाद्या विद्यार्थ्याने प्रबंध लिहायला घेतलाच पाहिजे.

व्हॉटसॲप चॅटींग, हनी ट्रॅप मध्ये अडकला, 4 लाख 66 हजाराला लागला चुना,
लैंगिक उत्तेजना होणारा दाखविला व्हिडीओ, नग्न होण्यास पडले भाग… मग काय… झाले स्क्रीन रेकॉर्डिंग आणि गमाविले साडेचार लाख…

गुन्ह्याची हकीकत अशी की,
फिर्यादी हे घरी असताना त्यांना व्हॉटसॲपवर कॉल आला. त्यांच्याशी एका तरुणीने चॅटिंग व व्हिडिओ कॉल करुन त्यांच्या लैगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडिओ दाखविला. व्हिडीओ सुरू असतानाच त्याला नग्न होण्यास भाग पाडले. आणि फिर्यादी यांचा हा व्हिडिओ कॉल स्क्रीन रेकॉर्डिंग केला गेला. पुढे त्या ज्येष्ठाला त्याचा नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. मागणीनुसार पैसे देखील दिले. मात्र लगेच दुसऱ्या इमसाने पोलीस असल्याची बतावणी करून तुमचा हा व्हिडीओ यु-ट्युब वरून काढुन टाकण्यासाठी चार्जेस दयावे लागतील असे सांगितले.
लगेच घाबरून जावून त्या ज्येष्ठाने त्या तोतया पोलीसाच्या मागणीनुसार 4 लाख 66 हजार रुपये दिले. दरम्यान त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन, संबधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुःश्रृंगी पोलीसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेता, संबंधिताविरूद्ध गु. रजि. नं. 238/23) नोंद केला आहे. हा सर्व प्रकार 21 ते 25 मार्च दरम्यान घडला. अधिक तपास चतुःश्रृंगी पोलीस करीत आहेत.

पुण्यातील हनीट्रॅपचा असाही प्रकार, एखादया हिंदी चित्रपटाला साजेशी अशी ही भन्नाट स्टोरी
वकीलाकडून बलात्काराची केस करण्याची धमकी, व्यावसायिकाला 17.50 लाखाला गंडा,
ॲड. विक्रम भाटे व निधी दिक्षित यांच्याविरूद्ध हडपासर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

रेस्टॉरंट मध्ये त्याच्या टेबलवर एक मुलगी आली. तिने लायटर मागण्याच्या बहाण्याने त्याच्याशी ओळख करुन घेतली. आपले नाव निधी दीक्षित असून मुंबईहून पुण्यात बिझनेस करण्यासाठी आली असून तुमची मदत लागेल, असे सांगून त्याचा मोबाईल नंबर घेतला. मग पुढे ओळखीचे पर्यवासन व्हॉटसॲप चॅटींगमध्ये सुरू झाले. एके दिवशी तिच्या वाघोली येथील फ्लॅटवर तो आणि ती एकत्र असतांना पारदर्शक नाईट ड्रेस घालून बाहेर आली. त्याच्या शेजारी बसून तिने  क्लोज सेल्फी काढले. पुढे बलात्कारची धमकी, वकीलाची मध्यस्थीची बतावणी... पुढे 17 लाख 50 हजाराला चुना... आणि मग फसवणूक झाल्याचे लक्षात येताच... हडपसर पोलसात धाव... 

गुन्ह्याची हकीकत अशी की,
व्यावसायिक असलेले फिर्यादी हे 3 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचा मित्रांसोबत सिजन मॉल येथील प्लॉयहाय रेस्टारंटमध्ये गेले होते. फिर्यादीच्या टेबलवर एक मुलगी आली. तिने लायटर मागण्याच्या बहाण्याने ओळख करुन घेतली. तिचे नाव निधी दीक्षित असून मुंबईहून पुण्यात आले असून बिझनेस करण्यासाठी तुमची मदत लागेल, असे सांगून फिर्यादीचा मोबाईल नंबर घेतला.

पुढे व्हॉटसॲप कॉलवर फिर्यादी यांच्याशी बोलणे सुरु केले. 7 नोव्हेबर रोजी तिने बिझनेसबाबत बोलायचे आहे, असे म्हणून तिच्या वाघोलीतील फ्लॅटवर फिर्यादी यांना नेले. तेथे निधी दिक्षित स्वतःच्या बेडरुममध्ये गेली व पारदर्शक नाईट ड्रेस घालून बाहेर आली. फिर्यादी यांच्या शेजारी बसून तिने क्लोज सेल्फी काढले. त्यानंतर ती परत बेडरुममध्ये गेली. ड्रेस बदलून बाहेर आली व फिर्यादी यांना तू येथे कशाला आलास, येथे काय काम आहे तुझे, येथून चालता हो, असे निधी दिक्षित बोलली. निधी दिक्षितच्या स्वभावात अचानक  झालेला बदल पाहून फिर्यादी घाबरुन तेथून निघून गेले व  त्यांनी तिचा मोबाईल ब्लॉक केला.

दि. 7 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेने घाबरून गेलेल्या फिर्यादी यांना दि. 15 नोव्हेबर रोजी निशा गुप्ता  हिच्या फोनवरुन तिचा वकील विक्रम भाटे याने फोन करून निधी दिक्षित त्यांनी तुमच्याविरूद्ध तक्रार केली आहे. या सर्व प्रकरणांत तुम्हाला बेल देखील कुठेच मिळणार नाहीये. प्रकरण मिटवायचे असेल तर मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. तुमची केस मिटवून देतो म्हणून विक्रम भाटे याने सुमारे 8 लाख रुपयांची मागणी केली. दरम्यान एवढे माझे माझ्याकडे नाहीत म्हणून  गळ्यातील सोन्याची चैन, लॉकेट असे 6 तोळ्याचे सोने निशा गुप्ता हिच्याकडे देऊन मुथूट फायनान्समध्ये  तारण ठेवले. तसेच ही रक्कम ॲड. विक्रम भाटे याला पैसे दे असे सांगितले. 

तुला सुप्रिम कोर्टातही जामिन मिळणार नाहीये –
दि. 16 नोव्हेबरला निशा गुप्ता हिने 1 लाख 60 हजार रुपये विक्रम भाटे याला दिले. त्यानंतर विक्रम भाटे याने वेळोवेळी फिर्यादी यांना धमकावून फिर्यादी यांना म्हणाले की, तुला सुप्रिम कोर्टातही जामिन मिळणार नाहीये. असे सांगुन ॲड. भाटे हा फिर्यादी यांना लुटत, लुबाडत राहिला. दरम्यान निशा गुप्ता हिने फिर्यादी यांना सांगितले की, विक्रम भाटे, निधी दीक्षित आणि वैभव शिंदे हे लोकांना जाळ्यात ओढुन त्यांच्याकडून पैसे काढतात. तुलाही फसवून पैसे काढण्याकरीता मला सांगितले होते. परंतु फिर्यादी हा माझा चांगला मित्र आहे मी तसे काही करणार नाही, असे सांगितले होते. ही बाब लक्षात येताच. फिर्यादी यांनी हडपसर पोलीसात धाव घेतली.
दरम्यान विक्रम भाटे (वय 35, रा. हडपसर ) निधी दीक्षित (वय 25, रा. वाघोली ) हिच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याविरूद्ध गु. रजि. नं. 493/23 दाखल केला आहे. याबाबतचा तपास हडपसर पोलीस करीत असून हा गुन्ह्याचा प्रकार 3 ऑगस्ट 2022 पासून आतापर्यंत सुरु होता.