Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

आदिवासी विकासासाठी व्यावसायिक आणि उच्च पदावरील नोकरदारांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दयावे- नामदेव गंभिरे

आदिवासी कृती समिती व आदिवासी स्वप्नदूत संस्थांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,

राजूर (प्रतिनिधी )
एम .एन .देशमुख कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजूर येथे आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र ,पुणे आणि आदिवासी स्वप्नदूत फाउंडेशन महाराष्ट्र ,मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने “ गुणवंत विद्यार्थी सत्कार 2023“ नुकताच संपन्न झाला .
आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजन करून, दीप प्रज्वलन करून आणि वृक्षास जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात अली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस आदरांजली-
स्व .अशोकराव भांगरे जिल्हा परिषद अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत हरी नरके, इर्शाळवाडी येथे डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या आदिवासी बांधवांस त्याच प्रमाणे मणिपूर येथे अमानुष नरसंहार, आदिवासी स्त्रीयांवर झालेला अत्याचार आणि क्रूर हत्या, कुकी व नागा या आदिवासी नागरिकांवर समाज कंटकांनी अमानुष गोळीबार करून, हजारोंची घरे जाळून बळी गेलेल्या व माणुसकीला काळे फासणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध करून मृत्यू पावलेल्या सर्वाना आदरांजली अर्पण करण्यात अली.
प्रथम गंभिरेवाडी (पैठण) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुलांनी ,“इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा “ आदिवासी राणी हाय ! या स्वागत गीताने सुरु करून मृन्मयी बगाड ,गायत्री बांडे ,जागृती मेचकर आणि आराध्या घिगे यांनी सुंदर नृत्याविष्कार दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली, तर मृण्मयी बगाड या दुसरीच्या चिमुरडीने इतिहासावर व स्वतंत्र वीरांवर भेदक असे निर्भीडपणे भाषण केले .तिचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले .यासाठी मुख्याध्यापक आनंदा कदम व उपक्रमशील शिक्षक मधुकर बगाड यांनी विशेष परिश्रम घेतले .

विद्यार्थ्यांकडून लोकगीताचे गायन –
डॉ राजेंद्र प्रसाद माध्यमिक आश्रम शाळा शेणीत येथील मुलींनी “आरती पंच प्राणाची ,माझ्या राघोजी भांगरे वीराची “हे लोकगीत गाऊन उपस्थितांची दाद मिळवली ,या गीतासाठी स्वाती ठोकळ ,अंकिता बरमाडे ,पायल भांगरे ,अश्विनी धांडे ,जनाबाई धोंगडे ,कांचन लोटे ,अलिशा उगले ,कांचन धांडे आदींनी भाग घेतला .नृत्य दिग्दर्शिका श्रीमती भांडणे ,श्री गभाले सर व मुख्याध्यापक संजयकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर नृत्य सादर करण्यात आले .

पुढील विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात अकोले विधानसभेचे आमदार डॉ .किरण लहामटे यांचे हस्ते “ श्री समर्थ विद्यालय मवेशी “ येथील इयत्ता 10 विच्या मुलांना सायकल वाटप करण्यात आले ,या मध्ये तानाजी बांबळे ,सोमनाथ वाळेकर ,तन्मय लोहकरे ,सत्यवान वरे ,विशाल बांडे ,समीर लांघी ,मोहिनी रोंगटे ,अक्षदा भांगरे ,शितल भांगरे ,मोनिका कवठे आणि प्रियंका भांगरे यांचा समावेश आहे .

विद्यार्थ्यांचा सन्मान –
त्याच प्रमाणे इयत्ता 10 वि मधील प्रथम तिन विद्यार्थ्यास सन्मान चिन्ह ,व प्रत्येकी रु 2000/- रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले . त्यामध्ये शुभम गभाले 88.30% ,ज्ञानेश्वर मेंगाळ 88.60%,व वैभव घोडे 87.40% तसेच इयत्ता 12वि मधील पुढील तिन विद्यार्थ्यांना प्रत्येकी सन्मान चिन्ह व 2000/-देऊन गौरविण्यात आले .त्यामध्ये छाया पोटकुले 77.83%, उज्वला भांगरे 76.33 % आणि प्रमिला बुळे 75.33 % इत्यादींना डॉ भाऊसाहेब देशमुख प्राचार्य ,इंजि नामदेव गंभिरे ,इंजि सुनिल भांगरे ,डॉ मयुरा गंभिरे ,श्रद्धा चिखले ,महेंद्र भांगरे ,प्रवीण गभाले ,ऍड अमोल मुठे ,ऍड शशिकला भांगरे ,स्नेहल बांडे ,गंगाराम सांगडे ,भरत तळपाडे ,दूनदा मोरे ,खेवजी भोईर ,लक्समन भालेकर ,किसनराव भोजने ,घोडे गुरुजी ,विठ्ठल गंभिरे ,हभप नानासाहेब गंभिरे ,निशा गंभिरे ,राणीताई घाटकर ,सचिन भांगरे ,दिपक गंभिरे , विकास गंभिरे ,अशोक भवारी ,इंजि सागर गंभिरे ,ज्ञानेश्वर घाटकर आणि वनसंरक्षक ,किसन पडवळे यांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आले .

 तसेच वनहक्क ,पेसा कायदा ,इंग्लिश डिक्शनरी ,जागतिक दर्जाची थोर लेखक आणि महान नेते आणि थोर शास्रज्ञ ,प्रशासकीय अधिकारी ,कविता संग्रह अशी 40 पुस्तकांचा अनमोल खजिना राजूर कॉलेज ला भेट देण्यात आला . या सर्व कार्यक्रमाचा खर्च आदिवासी कृती समिती ,स्वप्नदूत फाउंडेशन ,इंजि विलास नवाळी ,उद्यान अधिकारी बाळासाहेब डोळस आणि मा सुदाम चपटे सर ,मा प्रविण क्षीरसागर सर यांच्या वतीने करण्यात आला .

आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन –
या भरगच्च सोहळ्यास मार्गदर्शन करताना आमदार डॉ किरण लहामटे यांनी सर्व विद्यार्थी ,त्यांचे पालक आणि गुरुजनांना मार्गदर्शन केले व खूप कौतुक केले . आजकाल आदिवासी मुले लहान वयात व्यसनाधीन होत असून त्यापासून परावृत्त होऊन शासना च्या सोई सुविधांचा योग्य वापर करून स्वतःची तसेच समाजाची सेवा करावी असे आश्वासित केले .मोबाईलचा योग्य वापर करा ,शेतात काबाड कष्ट करणाऱ्या आई वडिलांचा विश्वास घात करू नका .शिक्षणाच्या वयात शिक्षणच घ्या ,करिअर करा ,शारीरिक संपदा जोपासा ,देवाने लाख मोलाचे अवयव दिले आहेत त्यांचा आदर बाळगा आणि एक आदर्श कुटुंब व्यवस्था तयार करा असा संदेश दिला .

आदिवासी विकासासाठी नोकरदारांनी योगदान द्यावे – इंजि. नामदेव गंभिरे –
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आदिवासी समाज कृती समितीचे अध्यक्ष इंजि नामदेव गंभिरे म्हणाले ,गेली 38 वर्ष कृती समिती आणि 12 वर्ष आदी देवराम गंभिरे “ उत्कृष्ट आश्रम शाळा पुरस्कार “ देण्यात येत होता .गेल्या तीन वर्षात स्वप्नदूत संस्थेची स्थापना करून त्यांच्या वतीने आता गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात येत आहेत . त्याच प्रमाणे आरोग्य शिबीर ,पेसा व वनहक्क कायदा ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,सरपंच यांच्या गाव विकासाच्या कार्यशाळा ,आदी कार्यक्रम राबविले आहेत .आदिवासी विकासासाठी डॉ .इंजि, व्यावसायिक आणि उच्च पदावरील नोकरदारांनी समाजाच्या सर्वांगीण विकासा साठी योगदान देणे अपेक्षित आहे किंबहुना भारतीय राज्य घटनेने दिलेलं आरक्षण हे प्रतिनिधित्व असून आपण ते समाजाचे देणे लागतो यासाठी पुन्हा मागे वळून पाहीले पाहिजे .

मागील दोन वर्षात नाशिक येथील बिरसा मुंडा मेडिकल हब आणि भीमाशंकरयेथील महाविद्यालयाची उभारणी समाजाच्या संघटित शक्तीचे यश आहे असे वाटते . पुढील काळात किमान एक  अधिकारी ,एक न्यायाधीश ,एक इंजि कॉलेज ,ट्रायबल मुझियम आणि ट्रायबल व्हिलेजअग्रीकलचर टुरिझम उभारून आदिवासी युवकांसाठी रोजगार निर्माण करणे हे मुख्य उदिष्ष्ट्या असल्याचे नमूद केले. सध्या आदिवासी समाजासमोर बोगस लोकांची घुसखोरी ,बेरोजगारी ,आश्रम शाळेतील शिक्षणाचा दर्जा ढासळ ला असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे . मुलांना दारू ,गुटका आदी व्यसनांनी ग्रासले आहे ,मुलांना संस्काराचे धडे घरातून मिळत नसल्याने आजची पिढी भरकटत आहे .त्यामुळे आजही शिक्षनाचे महत्व महात्मा फुले यांनी त्यांच्या “ शेतकऱ्यांचा आसूड “ या पुस्तकातून गुलामगिरी चे कारण शूद्रांच्या “आविदेणे “ केल्याचे स्पस्ट होत आहे.

सबब गुणवंत विद्यार्थ्यांनी कस्त ,जिद्द आणि चिकाटीने यशाची शिखरे पादाक्रांत करावी . याबाबतची काही उदाहरणे उपस्तितांसमोर नावासह दाखवून दिली .यामध्ये दोन डझन इंजिनिर्स ,एक डझन डॉक्टर्स आदी युवकांचा भरणा झाल्याचे इंजि गंभिरे यांनी विनम्र पूर्वक नमूद केले .त्याच प्रमाणे आर्थिक नियोजन आणि संघटन योग्य पद्धतीने केल्यामुळे एक गरीब इंजि स्वप्नील नोकरीसाठी परदेशात गेला असून सुमारे 25 गरीब मुला मुलींना पुणे शहरात प्रधान मंत्री आवास योजनेतून घरे मिळवून दिली आहेत .त्यामध्ये अशोक भवारी ,प्रियंका भांगरे ,रावसाहेब गंभिरे ,सोमनाथ गंभिरे ,विकास गंभिरे अशा गरीब व गरजू युवकांचा समावेश आहे .त्यामुळे आजच्या गुणवंत विदयार्थ्यांनी संकटावर मात करून आपला व समाजाचा विकास साधावा असे आवाहन केले.

डॉ. मयुरा गंभिरे यांच्याकडून मार्गदर्शन-
त्या नंतर डॉ मयुरा गंभिरे यांनी वैदकीय शिक्षणाबद्दल सविस्तर माहिती दिली .महेंद्र भांगरे यांनी विद्यार्थ्यांच्या विकासात जिद्द ,चिकाटी आणि मेहनत आवश्यक आहे ,त्याच बरोबर शिक्षक आणि शिक्षण संस्थेचा महत्वाचा वाटा असल्याचे नमूद केले . मुलांनी आरक्षणाचा पुरेपूर लाभ घ्यावा . सर्वच विद्यार्थी ,गुरुजन आणि पालक यांनी व्यवस्थापन तत्वातील ,“ ताकद ,कमकुवत पणा ,संधी आणि आपल्यासमोरील धोके काय आहेत “ हे वेळीच समजून घेतले तर आयुष्यात सहजप्रगती करता येते हे त्यांनी त्यांच्या यशाचे गमक असल्याचे सांगितले . त्याच प्रमाणे श्रद्धा चिखले यांनी कृषी संचालक पदा पर्यंत कशी मजल मारली याबद्दल सांगितले . प्रविण गभाले ,पल्लवी बांडे ,ऍड अमोल मुठे ,ऍड शशिकला भांगरे यांनी कायदेविषयक माहिती सांगितली .मा पल्लवी बांडे ,मा गंगाराम सांगडे ,मा गभाले सर शेणित आणि वनाधिकारी किसन पडवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्राचार्य भाऊसाहेब देशमुख यांनी आपल्या भाषणात सर्व गुणवंतांचे विशेष कौतुक केले . त्याच प्रमाणे आदिवासी समाजाने त्यांच्या चालीरीती ,कला आणि संस्कृती जपली पाहिजे त्यासाठी महाविद्यालयात आदिवासी सांस्कृतिक भवन बांधून त्या ठिकाणी आदिवासी समाजाचे मुझियम उभारणे बाबत समाज बांधवानी एकत्र येण्याचे आवाहन केले .

कार्यक्रम सांगता समारंभ-
किसन पडवळे आणि इंजि सुनिल भांगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य मा भाऊसाहेब देशमुख यांनी विद्यार्थी ,पालक आणि उपस्थितांना शिक्षणाचे महत्व विषद करून सर्वाचे कौतुक आणि अभिनंदन केले . त्याच बरोबर आदिवासी समाजाने त्यांच्या कला ,रूढी ,परंपरा आणि संस्कृतीचे जतन केले पाहिजे असे आवर्जून सांगितले .त्यासाठी राजूर महाविद्यालय परिसरामध्ये जागा उपलब्ध करून “आदिवासी भवन “ बांधून त्या मध्ये आदिवासी मुझियम उभारले पाहिजे असे आग्रही प्रति पादन करून समाजाची नव्याने उभारणी करण्यासाठी तरुण युवकांनी मोठे योगदान देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले .
विकास गंभिरे आणि प्रियंका भांगरे यांनी सुश्राव्य सूत्र संचालन केले तर आदिवासी कृती समितीचे कार्याध्यक्ष किसनराव भोजने यांनी उपस्थितांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून आभार मानले.स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली .