Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील,सेंट मेरी शाळेतील विद्यार्थींनींचा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे हस्ते सत्कार

पुणे/दि/ प्रतिनिधी/ national forum/
लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर हद्दीतील सेन्ट मेरी स्कुल, कॅम्प, पुणे येथील विद्यार्थीनी यांनी आय.सी.एस.सी बोर्ड 10 वी च्या परिक्षेत भारतात अ.क्र .01 कु . हरगुणकौर मथारु यांनी 99 .8 टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला व अ.क्र.02 कु . शिवाणी देव यांनी 99 .6 टक्के घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला . त्यांचा सत्काराचा व इतर मुलीना त्यांच्यापासून प्रोत्साहन मिळावे या करीता लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक कदम व सेन्ट मेरी स्कुलचे मुख्याध्यापीका श्रीमती सुजाता मल्लीक कुमार यांच्या संयुक्तीक रित्या आज दि . 03/08/2022 रोजी पोलीस आयुक्त पुणे शहर श्री . अमिताभ गुप्ता, याच्या हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला .


तसेच सदर विद्यार्थीनी सेन्ट मेरी स्कुलचे मुख्याध्यापीका श्रीमती सुजाता मल्लीक कुमार , उपमुख्याध्यापीका श्रीमती ओहोळ व क्लास टिचर श्रीमती बल्लाळ , शाळेचे व्यवस्थापक श्री . सॅम सर यांचा देखील मा.पोलीस आयुक्त सो . पुणे शहर यांनी सत्कार केला . तसेच मुलांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले व उच्च शिक्षण शक्य झाल्यास आय.आय.टी. ए.आय. एम . एस . आय . आय . एम . एस व इतर भारतातील विद्यापिठे येथे घ्यावे असे मार्गदर्शन केले. इतर विद्यार्थीनी यांनी या दोघी सारखे प्रयत्न करुन आपण देखील टॉपर मध्ये येण्याचे प्रयत्न करावेत असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे .
या कार्यक्रमास पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री.अमिताभ गुप्ता मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक , लष्कर पोलीस स्टेशन , पुणे शहर , श्री . अशोक कदम मुख्याध्यापीका श्रीमती सुजाता मल्लीक कुमार , उप मुख्याध्यापीका श्रीमती ओहोळ , श्रेणी पोलीस उप निरी प्रविण शिर्के , पो . अमंलदार दत्तात्रय तेलंगे म.पो. अमंलदार रहिशा शेख लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर व सुमारे 200 ते 250 विद्यार्थीनी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम राष्ट्रगीत गायना नंतर संपन्न झाला आहे.