अंमली पदार्थ विभागाकडून बाणेरमध्ये कोट्यवधी रुपयांचे कोकेन-एम.डी. जप्त तर
खंडणी विभागाने वानवडीत पाऊन लाखाचा गांजा केला जप्त
पुणे/दि/ प्रतिनिधी/
शिक्षण आणि संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात आयटी सेंटर चा बाजार सुरू झाला आहे. कॉल सेंटर आणि मॉल संस्कृतीमध्ये पुणे शहराची ओळख आता मुंबईसारखी झाली आहे. देश विदेशातील विद्यार्थी आणि पर्यटक पुणे शहरासारख्या ठिकाणी येत असल्यामुळे इथ जागतिक दर्जाचे जिभेचे लाड पुरविणारे देखील निर्माण झाले आहेत. अय्याशीचा ट्रेंड बदलला आहे. त्यातच अय्याशीसाठी देशी विदेशी वारांगणांसह अंमली पदार्थाने पुणे शहर गजबजुन गेले आहे. सगळीकडे नशेखोरी वाढली आहे. पुणे शहर पोलीसांनी धाडसत्र सुरू केले असून, चालुच्या आठवड्यात अंमली पदार्थ विभागाने बाणेरमध्ये नायजेरीन पती पत्नीला कोकेन आणि एम.डी. विक्री करतांना रंगेहाथ पकडले तर वानवडी मध्ये खंडणी विरोधी पथकाने गांजा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थावरून लक्षात येते की, पुणे शहरात नशेखोरीसाठी नेमका अंमली पदार्थांचा साठा किती आहे. …..
बाणेर येथे नायजेरियन पती – पत्नी कडुन कोटयावधी रुपयांचे कोकेन, एम . डी जप्त
अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखे कडे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नालंदा गार्डन रेसीडन्सी , बाणेर पुणे या ठिकाणी एक नायजेरियन पती पत्नी राहत असुन ते रहाते घरातुन कोकेन एम डी असे अंमली पदार्थाची मोठया प्रमाणावर विक्री करीत आहेत.
नमुद प्रमाणे मिळालेले खबरीचे अनुषंगाने, पोलीस अंमलदार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक , विनायक गायकवाड , सहा.पो. निरीक्षक , लक्ष्मण ढेगळे , शैलजा जानकर यांना कळविली असता त्याबाबत मिळालेल्या बातमीचे ठिकाणी छापा कारवाई करुन , नायजेरियन इसम नामे 1 ) उगुचुकु इम्यॅन्युअल वय 43 वर्षे , रा . नालंदा गार्डन रेसीडन्सी सी विंग फ्लॅट नंब 13 बाणेर पुणे . मुळ नायजेरीया देश व महिला नामे 2 ) ऐनीवेली ओमामा व्हिवान वय 30 वर्षे रा . नालंदा गार्डन रेसीडन्सी सी विंग फ्लॅट नं . 13 बाणेर पुणे मुळ नायजेरीया देश हे बेकायदेशीररित्या विक्रीसाठी 644 ग्रॅम ( एम.डी ) मॅफेड्रॉन कि.रु. 9,660,000 / – व 201 ग्रॅम 120 मिलीग्रॅम कोकेन किरु 30,16,800 / – व रोख रुपये 02,16,000 / – मोबाईल फोन , इलेक्ट्रॉनिक वजन काटा , प्लास्टिक पिशव्या व डब्या असा 02.16.000 / – चा असा एकुण 1,31,08,800 / – ( एक कोटी एकतीस लाख आठ हजार आठशे ) चा अंमली पदार्थ व ऐवज ते रहात असलेल्या घरात अनाधिकाराने बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आले .
त्यांचे विरुध्द एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 (क). 21(क) , 22 (क) .2 9 अन्वये म.सहा.पो.निरीक्षक , शैलजा जानकर यांनी फिर्याद दिल्याने आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास लक्ष्मण ढेंगळे , सहा. पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहेत .
वरील उल्लेखनीय कामगिरी ही पोलिस आयुक्त , पुणे शहर , श्री अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त श्री . संदिप कर्णिक , मा. अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे , मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , मा. सहा. पो आयुक्त , गुन्हे 1. श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली
अंमली पदार्थ विरोधी पथक , 1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सपोनिलक्ष्मण देंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, मारुती पारधी, मनोज साळुंके , राहुल जोशी, पांडुरंग पवार, विशाल दळवी , संदिप शिर्के , प्रविण उत्तेकर , रेहना शेख , संदेश काकडे , नितेश जाधव , योगेश मोहिते यांनी केली आहे .
पुणे शहर वानवडी परीसरात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमासांवर कारवाई-
सहा . पोलीस निरीक्षक चांगदेव सजगने, खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे हे पथकातील स्टाफसह वानवडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना महानगरपालिका विलासराव देशमुख क्रिडा प्रबोधनीचे गेट समोर विठ्ठलराव शिवरकर मार्ग वानवडीगाव पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी इसम 1 ) सोहेल मोदीन आसंगी वय 21 रा.हेमी गार्डन सोसायटी दत्तनगर जांभुळवाडी कात्रज पुण 2 ) सोनी रविंद्र हिरे वय 21 रा . शनीनगर 3 चाळ खोली नं . 2 जांभुळवाडी रोड कात्रज पुणे यांनी त्यांच्या ताब्यातील होन्डा ॲक्टीव्हा गाडी क्र.एम.एच 12 आर.सी. 6788 हिचे डिकी मध्ये रु .20,000 / – किमतीचा 2 किलो गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशीर रित्या जवळ बाळगला असताना मिळुन आले .
तसेच दोन मोबाईल हॅन्डसेट , होन्डा ॲक्टीव्हा मोटारसायकल एकुण रक्कम 45,500 / – असा सर्व मिळुन एकुण रु . 65.500 / – किमतीचा ऐवजासह मिळुन आल्याने पो.हवा . 3125 प्रदीप शितोळे यांनी त्याचे विरुध्द फिर्याद दिल्याने वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 2 9 1 / 2022 . एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 ( क) . 20 (ब) ( ब2 9 ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
वरील कारवाई खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे , सहा . पो . निरी . चांगदेव सजगणे , पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण , मोहनदास जाधव , पोलीस अंमलदार विजय गुरव , प्रदिप शितोळे , शैलेश सुर्वे , विनोद साळुंके , राहुल उत्तरकर अनिल मेंगडे , संग्राम शिनगारे सैदोबा भोजराव , सचिन अहिवळे , अमोल पिलाणे , चेतन आपटे , चेतन शिरोळकर , प्रदिप गाडे , किशोर बर्गे , पवन भोसले , रवि सपकाळ , महीला पोलीस अंमलदार आशा कोळेकर , रुपाली कर्णवर यांनी केलेली आहे .