Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ गुन्हे शाखेची धडक कारवाई, 2 कोटी 21 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त, विनायक गायकवाड आणि टीमची मोठ्ठी कारवाई….

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 यांनी चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील खराडी चौकातून अहमदनगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मोठ्ठी कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 2 कोटी 21 लाख 60 हजार रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.


धडक कारवाई –
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड , सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे , पोलिस अंमलदार मनोजकुमार साळुंके, मारूती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, योगेश मोहिते आणि संदेश काकडे हे चंदनगर परिसरात पेट्रोलिंग करीत होते.
यावेळी पोलिस अंमलदार मनोजकुमार साळुंके आणि मारूती पारधी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातील काहीजण हे खराडी चौकातुन रक्षक नगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावरील एका सोसायटी जवळ मेफेड्रॉन या अंमली पदार्थांची विक्री करण्याकरिता येणार आहेत. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सापळा रचला. त्यावेळी त्यांना आजाद खान, नागेश्वर प्रजापती आणि एक अल्पवयीन युवक तेथे आढळुन आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे 1 किलो 108 ग्रॅम मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ आढळून आले.
यावेळी आजाद शेरजमान खान (वय -35 वर्ष, रा. पिपलखेडी, ता. अलोट, जि. रतलाम, मध्यप्रदेश ) आणि नागेश्वर रामेश्वर प्रजापती (वय -35वर्ष, रा. ता. अलोट, जि. रतलाम, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपींविरूध्द चंदनगर पोलिस स्टेशनमध्ये अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयाचा अधिक तपास सपोनि लक्ष्मण ढेंगळे करीत आहेत.