Friday, January 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत पुनः पकडले मेफेड्रॉन, पुण्याला अंमली पदार्थांचा विळखा

  • अंमली पदार्थ विरोधी पथक क्र 1 गुन्हे शाखा पुणे यांची कामगिरी
  • चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत दोन वेगवेगळया गुन्हयामध्ये 2,70,000/ – रुपये किंमतीचे 18 ग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ तसेच 2,20,000 / – रुपये किंमतीच्या 5 दुचाकी असा
    एकुण 4,80,000 / – रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहराला अंमली पदार्थांचा विळखा पडला आहे. दाखल गुन्ह्यांचा तपास करीत असतांना देखील नवीन गुन्हेगार पोलीसांच्या हाती लागत आहेत. नव नवीन ठिकाणी अशा प्रकारचे अंमली पदार्थ विक्री करणारे टोळके कार्यरत असल्याचे हे निदर्शक असल्याचे दिसून येत आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेल्यानंतर, पुनः त्याच हद्दीत दुसरा अंमली पदार्थ विक्री करणारा अंमली पदार्थ विभाग गुन्हे युनिट एक च्या हाती लागला आहे.

 दि. 22/07/2022 रोजी व दि.26 / 07 / 2022 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखेने चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये छापा टाकुन 03 नायजेरियन यांना अटक करुन त्यांचेकडुन एकुण 726 ग्रॅम 540 मिलीग्रॅम मेफेड्रॉन ( एम.डी ) व 21 9 ग्रॅम 120 मिलीग्रॅम कोकेन व इतर ऐवज असा एकुण 1.43,48,400 / - किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.त्याप्रमाणे चतुःश्रृंगी पो स्टे येथे गु.र.नं. 32 9/2022 एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 ( क ) . 22 ( क ) व गु.र.नं. 333 /2022. एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 ( क ). 22 (क) . 21 (क).2 9 प्रमाणे नोंद करण्यात आला होता . या  गुन्हयाचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक क्र . 1 गुन्हे शाखेकडील म . सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर व सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण देंगळे हे करीत आहेत.  

दरम्यान दि. 31/07/2022 चतुःश्रृंगी पो स्टे गु.र.नं. 329 /2022 एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 ( क ) , 22 ( क ) हया गुन्हयाचा तपास महिला सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर या करीत असताना त्यांनी दाखल गुन्हयात नायजेरीयन नामे ओकेके इन्फीचिकु जॉन, वय 2 9 वर्षे , रा. लेन नं 2 घर क्रमांक ए 11 किर्तीनगर न्यु सांगवी पुणे मुळ रा . नायजेरिया यास अटक करुन त्याचेकडुन 3,70,000 / - रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला त्यामध्ये 2,70,000 / - रुपये किंमतीचे 18 ग्रॅम कोकेन व 1,00,000 / - रुपये किंमतीच्या गुन्हयामध्ये अमली पदार्थाची विक्री करण्या करीता वापरलेल्या दोन दुचाकी गाडया जप्त केल्या आहेत . तसेच चतुःश्रृंगी पो.स्टे . गु.र.नं. गु.र.नं. 333 /2022. एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 ( क ) . 22 ( क ) , 21 ( क ) .2 9 या गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे हे करीत असताना त्यांनी दाखल गुन्हयातील अटक आरोपी नामे उगुचुकु इम्पॅन्युअल वय 43 वर्षे , रा . नालंदा गार्डन रेसीडन्सी सी विंग फ्लॅट नंब 13 बाणेर पुणे मुळ नायजेरीया देश याचेकडुन त्याने दाखल गुन्हयामध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी वापरण्यात आलेल्या 1,20,000/ - रुपये किमतीच्या 03 दुचाकी गाडया जप्त करण्यात आल्या आहेत . 
पुढील तपास शैलजा जानकर महिला सहा पोलीस निरीक्षक व सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहेत . 
वरील नमुद कारवाई ही  अंमली पदार्थ विरोधी पथक , 1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री . विनायक गायकवाड , सपोनि लक्ष्मण ढेंगळे , शैलजा जानकर , पोलीस अमलदार मारुती पारधी , मनोज साळुंके , संदिप जाधव , सुजीत वाडेकर , राहुल जोशी , पांडुरंग पवार , विशाल दळवी , संदिप शिर्के , प्रविण उत्तेकर , रेहना शेख , सचिन माळवे , संदेश काकडे , नितेश जाधव , योगेश मोहिते यांनी केली आहे