Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

अकोल्यात दंगल व्हावी असे अनेकांचे प्रयत्न होते – बाळासाहेब आंबेडकर

दोन्ही समाजांना शांतता राखण्याचे आवाहन
सोशल मीडियाचा वापर करत दंगल भडकवण्याचा काम सुरू

अकोला/दि/ प्रतिनिधी/
अकोल्यात दंगल व्हावी असे अनेकांचे प्रयत्न होते असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे.

आज झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, मी स्वतः दोन्ही समाज घटकांशी बोलण्याचा मी दिवसभर प्रयत्न करीत होतो. शहरात शांतता राहिली पाहिजे. दरम्यान अकोला शहरात शांतता आली आहे असे दिसत असले तरीही वातावरण तापते आहे असे मला दिसत आहे.
हिंदू व मुस्लिम या दोन्ही समुदयांना मी शांततेचे आवाहन करीत आहे. शेवटी या दंगलीतून काहीही निष्पन्न होत नाही, नुकसान हेोते. त्याच्यामुळे यापुढे दंगल होणार नाही याचे दक्षता दोन्ही समाजाने घ्यावी असे आवाहन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.