Wednesday, December 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

लोकसभा निवडणूकाः पुणे पोलीसातील 6 सहायक पोलीस आयुक्तांच्या शहरांतर्गत बदल्या, रुक्मिणी गलंडे- फरासखाना तर नंदा पाराजे- स्वारगेट विभागात…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
केंद्रीय निवडणूक आयोग व पोलीस महासंचावलक यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयातील 6 सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश मंगळवारी दि.16 जानेवारी रोजी काढले आहेत. दरम्यान रूक्मिणी गलंडे यांची फरासखाना विभागात तर नंदा पाराजे यांची स्वारगेट विभागात पदस्थाना करण्यात आली आहे.

बदली करण्यात आलेल्या सहायक पोलीस आयुक्तांची नावे आणि त्यापुढील कंसात कुठून कोठे बदली या प्रमाणे –
1.रुक्मिणी मनोहर गलंडे (एसीपी, अभियान ते एसीपी, फरासखाना विभाग)
2. नंदा राजेंद्र पाराजे (मंदीनी वग्यानी) (एसीपी, प्रशासन ते एसीपी, स्वारगेट विभाग)
3. अजय सुभाष चांदखेडे (नव्याने हजर ते एसीपी, प्रशासन)
4. मच्छिंद्र रामचंद्र खाडे (एसीपी, वाहतूक शाखा (प्रशासन) ते एसीपी, वाहतूक शाखा (परिमंडळ-1)
5. नारायण देवदास शिरगावकर (एसीपी, स्वारगेट विभाग ते एसीपी, वाहतूक शाखा (प्रशासन)
6. अशोक विश्वासराव धुमाळ (एसीपी, फरासखाना विभाग ते एसीपी, अभियान)
दरम्यान सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) आस्थापना रंगनाथ बापू उंडे यांच्याकडे सहायक पोलीस आयुक्त, अभियान या पदाचा अतिरिक्त पदभार पुढील आदेश होईपर्यंत सोपवण्यात आला आहे.