Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गुन्हे युनिट 1 च्या शब्बीर सय्यदांची जब्बर कारवाई,
समर्थ हद्दीत 47 लाखांचा दरोडा घालणाऱ्यांना केले जेरबंद

crime unite1

गाडीच्या नंबरप्लेटला चिखल फासला, तोंडावर मास्क, डोक्यावर टोपी आणि डोळ्यांना गॉगल सांगा आता तपास तरी कसा करायचा…

नॅशनल फोरम/पुणे/दि/
समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील सुमा पन्ना या नाना पेठेतील सिगारेट- बडीशेपच्या डिलरशिप असलेल्या दुकानातून मालाच्या विक्रीचे पैसे बँकेत भरण्यासाठी जात असतांना, सरावलेल्या दोन गुन्हेगारांनी त्यांच्या गाडीस मागून धक्का देवून, तुला गाडी निट चालवीता येत नाही का? असे म्हणुन त्यांचा रस्ता अडवून दोघांपैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने मारहाण करून त्यांच्याकडील रोख 47 लाख 26 हजार रुपये व एकुण 14 चेक असलेली बॅग जबरीने चोरून नेली होती. दरम्यान आरोपींनी वापरलेल्या काळ्या रंगाचे मोपेडचा नंबर आरोपींनी दोन्ही बाजुचे नंबरप्लेटवर चिखल लावल्याने नंबर प्राप्त झाला नव्हता व तोंडास मास्क, डोक्यावर टोपी, डोळ्यास गॉगल लावल्याने त्यांची ओळख पटविणे व त्यांचा छडा लावणे हे पोलीस समोर एक आव्हान होते. तथापी गुन्हे युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद यांनी प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून तपास अधिक गतीमान केला. युनिट एक चे वेगवेगळ्या टिम करून तपास कार्य सुरू झाले.

गाडीच्या नंबरप्लेटला चिखल फासला, तोंडावर मास्क, डोक्यावर टोपी आणि डोळ्यांना गॉगल सांगा आता तपास तरी कसा करायचा… पोलीसांपुढे आव्हान…
दरम्यान पुणे शहरातील भरवस्तीमध्ये घडलेल्या गंभीर गुन्ह्यामुळे दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांनी आदेशीत केले होते. आरोपींनी वापरलेल्या काळ्या रंगाचे मोपेडचा नंबर आरोपींनी दोन्ही बाजुचे नंबरप्लेटवर चिखल लावल्याने नंबर प्राप्त झाला नव्हता व तोंडास मास्क, डोक्यास टोपी, डोळ्यास गॉगल लावल्याने त्यांची ओळख पटविणे व त्यांचा छडा लावणे हे पोलीस समोर एक आव्हान होते. गुन्हे शाखा 1 चे सहा पोलीस आयुक्त श्री सुनिल पवार तसेच युनिट-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद तसेच युनिट 1 कडील पथक असे दाखल गुन्ह्याचा समर्थ पोलीस ठाणेसह समांतर तपास करीत होते.

पोलीस अंमलदारांची कमाल-
निलेश साबळे, दत्ता सोनवणे यांच्या टिमने असे केले जेरबंद –

दरम्यान गुन्हा घडलेल्या ठिकाणापासून पुणे शहरातील बाणेर, हिंजवडी, गहुंजे असे ठिक ठिकाणचे एकूण 200 ते 250 सी सी टी व्ही फुटेज आहोरात्र तपासण्यात आले. दि. 28 मार्च रोजी बातमी प्राप्त झाली की दाखल गुन्हा हा किरण पवार व त्याचा साथीदार आकाश गोरड यांनी केला असून किरण पवार हा वाघोली परिसरात लपुन बसला असून त्याचा साथीदार आकाश गोरड हा पवना डॅम कोथुरणेगाव येथे पळून गेला असून त्यांचेकडे लुटलेली रक्कम आहे. लागलीच गुन्हे शाखा युनिट-1 कडील अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके तयार करून वाघोली व पवना डॅम, कोथुरणे, ता मावळ, जि पुणे येथे रवाना करण्यात आले होते.
आरोपींबाबत काहीएक मागोवा नसताना त्यांचा रात्रभर शोध घेत वरील ठिकाणी राहणाऱ्या रहिवाश्यांकडे कौशल्यापुर्ण चौकशी करून, संशयावरून आरोपी आकाश कपिल गोरड वय 21 वर्ष (रा. बी / 37, रूम नं 2 अप्पर बिबवेवाडी, व्हिआयटी कॉलेजजवळ, पुणे) यास पवणा डॅम कोथुरणे येथून ताब्यात घेतले असता, आरोपीने स्वतःचे नाव खोटे सांगीतले तसेच केस बारीक करून स्वतःची ओळख लपवीण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याच्याकडे कसून चौकशी करता त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्याचेकडून लुटलेल्या रकमेतील रोख एक लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
तसेच मिळालेल्या बातमीच्या आधारे ताब्यातील आरोपीचा साथीदार किरण अशोक पवार वय- 25 वर्ष (रा. बी / 24 /11, अप्पर बिबवेवाडी, व्हिआयटी कॉलेजसमोर, पुणे) यास वाघेश्वर मंदीर वाघोली, जि पुणे येथून ताब्यात घेवून त्याचेकडून लुटलेल्या रकमेतील रोख 4 लाख रुपये असे एकुण 5 लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचे विरुद्ध भारती विद्यापीठ, बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे बेकायदेशीर हत्यार बाळगणे,असे गंभिर गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना समर्थ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही धाडसी कारवाई पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलिस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलिस अंमलदार निलेश साबळे, दत्ता सोनवणे, शुभम देसाई, राहुल मखरे, अभिनव लडकत,  महेश बामगुडे, आय्याज दड्डीकर, विठ्ठल साळुंखे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर यांच्या पथकाने र् केली आहे.