Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहरातील गुन्हेगारीचे मुळ खाजगी सावकारी आणि फायनांशिअल कंपन्या हेच असल्याचे उघड

पुणे शहरात खाजगी सावकारांचा धुमाकूळ
खंडणी विरोधी पथक एक व दोन कडून धडक कारवाई

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहरात गुन्हेगारी का वाढली आहे… प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या तरुणांच्या हातामध्ये कोयते नेमके कशामुळे आले आहेत… नोकरी नाही… धंदा नाही… व्यापार नाही… तरी या युवकांकडे नवी नवीन गाड्या आणि हातात गळ्यात सोने कसे… याची माहिती घेत असताना खाजगी सावकारी तसेच फायनांशिअल कंपन्या हेच दिसून आले आहे. दरम्यान खाजगी सावकाराने दिलेल्या रकमांची वसुली करण्याकरिता तरुणांच्या हातामध्ये अग्निशस्त्र व धारदार शस्त्र देऊन वसुली करता पाठविले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यातच भाईगिरी, दादागिरीचा छंद भरलेल्या युवकांना स्फुरण चढले आहे. यामुळेच हातात कोयता घेवून मी देखील भाई म्हणत पुढे येत आहेत. कोयता गँग माफीया गप्प बसले असले तरी कारवाया सुरूच राहणार आहेत. त्यामुळे या खाजगी सावकारी व फायनांशिल कंपन्यांच्या एजंटाविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पुणे शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर, पुणे शहरात कोयता माफीयांनी धुमाकूळ घातला होता. याबाबत राज्य विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय जोरदार गाजला होता. दरम्यानच्या काळात पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने कोयता माफियांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली तसेच गुन्हेगारांना आर्थिक रसद मिळवून देणाऱ्या अवैद्य धंद्यांवर कारवाईचा सपाटा सुरू केला. या बेकायदेशिर व्यापारामध्ये राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा, अमली पदार्थ यांच्यावर धडाधड कारवाया सुरू करण्यात आल्या.

महाराष्ट्रात ऊस आणि कापसाला नगदी पीक म्हणून ओळखले जाते तस्सं गुन्हेगारी जगतामध्ये गुटखा, चर्रस, गांजा, कोकेन, मेफेड्रोन यासारख्या खिशात मावणाऱ्या अंमली पदार्थांना बाजारात मोठी मागणी असल्याकारणामुळे अनेक व्यापारी या क्षेत्राकडे वळले असल्याच्या कारणावरून किंवा बाजारात वाढलेल्या मागणीमुळे गुन्हेगारी क्षेत्राचे लक्ष देखील या अमली पदार्थांकडे वळले असल्या कारणामुळे गुटखा अंमलीपदार्थ या बाबी गुन्हेगारांच्या दृष्टिकोनातून नगदी पिक म्हणून ओळखले जात आहेत. दरम्यान या  बेकायदेशिर धंद्यातील सर्व काळा पैसा पुन्हा व्यापाऱ्यांमार्फत गरजूंना मोठ्या व्याजदराने पैसे दिले जात आहेत. वेळेवर पैशांची परतफेड करून देखील जुलमी आणि पठाणी पद्धतीने या खाजगी सावकारांची वसुली सुरू आहे.  फायनान्शिअल कंपन्यांकडे त्यांच्या रकमांची तसेच वाहन व गृहपयोगी साहित्य यांच्यासाठी घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी त्या त्या भागातील नवनवीन गुन्हेगारांकडे वसुलीचे काम दिले असल्याचे काही प्रकरणावरून समोर आले आहे. थोडक्यात खाजगी सावकारी हेच गुन्हेगारी क्षेत्राचे मूळ समोर येत आहे. त्यामुळे पुणे शहरातील खासगी सावकारी मोडून काढण्याचं काम पुणे शहर पोलिसांपुढे आहे.

खंडणी विरोधी पथक क्रमांक 1 व 2 कडून खाजगी सावकारांच्या मुसक्या आवडळल्या-
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथक क्रमांक एक यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील कापड व्यापाऱ्यांनी घेतलेल्या व्याजाची मुद्दल व व्याज परत करूनही ज्यादा दराने व्याजाची मागणी करीत असल्याने तसेच ते न दिल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण व शिवीगाळ करीत असल्याचा तक्रार अर्ज खंडणी विरोधी पथक क्रमांक एक यांच्याकडे प्राप्त झाला होता. या अर्जाची चौकशी केली असता रवींद्र कांबळे रा. पर्वती व इतर दोन इसम यांच्याकडून 7 लाख रुपये व्याजाने पैसे घेतले होते त्या बदल्यात संबंधित व्यापाऱ्याने त्यांना एकूण 13 लाख 62 हजार रुपये मुद्दल व व्याजाचे पैसे देऊन सुद्धा ते तिघेही आणखी 13 लाख 50 हजार रुपये एवढ्या व्याजाची मागणी करीत होते.
खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी रवींद्र कांबळे रा. पर्वती व इतर दोन इसमाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाणे येथे भादवि कलम 384, 386, 504, 506, 34 व महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39 व 45 अन्वये गुन्हा नोंद करून या गुन्ह्यातील आरोपी रवींद्र पिरप्पा कांबळे यास विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी खंडणी विरोधी पथक क्रमांक एक शाखेचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सपोनी अभिजीत पाटील, पोलीस अंमलदार मधुकर तुपसुंदर, हेमा ढेबे, रवींद्र फुलपगारे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, अमर पवार, व संभाजी गंगावणे यांनी केली आहे.

खंडणी विरोधी पथक क्रमांक दोनची धडक कारवाई –
पुण्यातील खाजगी सावकार आनंद परशुराम धोत्रे वय-35 वष रा. मराठी शाळेजवळ याच्याकडून अर्जदार यांनी महारुद्र जिम शिवणे पुणे येथे एकूण 8 लाख रुपये दरमहा 10 टक्के व्याजदराने घेतले होते. त्या मोबदल्यात आनंद धोत्रे यांनी अर्जदार यांचे श्रेया रेसिडेन्सी धायरी पुणे येथील फ्लॅट क्रमांक 2 व 24 या दोन फ्लॅटची नोटराईज विसार पावती करून तसेच अर्जदार यांनी आजपर्यंत ऑनलाईन पाच लाख 77 हजार रुपये व 93 हजार रुपये असे एकूण 14 लाख 70 हजार रुपये व्याज व मुद्दल आनंद धोत्रे याला दिलेले आहे. तरी देखील आनंद धोत्रे या खाजगी सावकाराने अर्जदार यांना वारंवार फोन करून आणखी 8 लाख रुपये मुद्दल व 3 लाख रुपये व्याज असे एकूण 11 लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास अर्जदार यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा तक्रार अर्ज खंडणी विरोधी पथक क्रमांक 2 यांना प्राप्त झाला होता.
अर्जाची चौकशी करत असताना खंडणी विरोधक पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना अर्जदार यांनी आणखी पुरावे सादर केलेले. यामध्ये खाजगी सावकार आनंद परशुराम धोत्रे वय 35 वर्ष न्यू कोपरे पुणे यांच्याविरुद्ध उत्तम नगर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 386 व 387 तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39 व 45 अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कामगिरी खंडणी विरोधी पथक क्रमांक दोन गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर पोलीस ,उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंखे, संग्राम शिंगारे, ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे, राहुल उत्तरकर, भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, पवन भोसले, किशोर बर्गे, चेतन शिरोळकर, प्रदीप गाडे व आशा कोळेकर यांनी केलेली आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे नवनियुक्त पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी नवीन गुन्हेगारांना याच खाजगी सावकारांसह खाजगी फायन्शिअल कंपन्यांची आर्थिक रसद मिळत आहे. रिअल इस्टेट व जमिनीचा ताबा या प्रकरणांतून अनेक गुन्हेगार येरवडा कारागृहात आहेत. त्यामुळे आता अंमली पदार्थ, गुटखा त्याच बरोबरीने खाजगी सावकारी पुणे शहरात फोफावली आहे. याविरूद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.