Wednesday, December 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

आंतरजिल्हा सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीला पर्वती पोलीसांनी केले जेरबंद, सोनसाखळी चोरांकडून सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, अकोला, पुणे अमरावती शहरासह पुण्यातील पर्वती, भारती विद्यापीठ, सहाकरनगर, बिबवेवाडी व विश्रामबाग या पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचिंगचे सुमारे 30 च्या वर गुन्हे केल्याचे उघड

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
जळगाव जिल्ह्यात राहणाऱ्या टोळीने जळगावसह अकोला, अमरावती व पुणे शहरातील भारती विद्यापीठ, सहाकरनगर, बिबवेवाडी व विश्रामबाग या पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचिंगचे सुमारे 30 च्या वर गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. पर्वती पोलीसांच्या तपास पथकाने ही कारवाई करून सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
दि. 24 ऑगस्ट 2023 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ई-लर्निंग चौक पर्वती दर्शन पुणे येथून रिक्षातुन जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चैन स्नॅचिंग करून दुचाकीवरील दोघे चोरटे पसार झाले. त्याबाबत पर्वती पो.स्टे. येथे गु.र.नं 246/2023 भा.द.वि. कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल होता. तसेच त्याच दिवशी विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे रात्री 9 वाजच्याच्या सुमारास गुन्हा रजि नं 184/2023 भादवि कलम 392,34 प्रमाणे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल होता. दाखल दोन्ही गुन्हयांची अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेवुन, आरोपींचा शोध तात्काळ घेण्याकामी पर्वती पोलीसांना आदेशीत केले होते.

त्यानुसार सहा. पोलीस आयुक्त श्री. आप्पासाहेब शेवाळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पर्वती पोलीस ठाणे यांना तात्काळ तपास पथकातील अंमलदारांची चार पथके तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीकोनातुन कारवाई करण्यास सांगितल. त्याप्रमाणे पर्वती पोलीस ठाणेचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सुनिल जगदाळे, चंद्रकात कामठे व तपास पथक अमलदार हे घटनास्थळापासुन विविध प्रकारे आरोपींचा सी.सी.टी.व्हि पाहुन शोध घेत असताना, पोलीस नाईक प्रकाश मरगजे व पोलीस अमलदार किशोर वळे यांना सी.सी.टी.व्हि फुटेज पाहुन आरोपीच्या गाडीची व आरोपींची माहिती मिळाली. 

अधिक माहिती घेतली असता, आरोपी गुन्हा करून संगम ब्रिज, पुणे येथुन त्यांचे मुळ गाव जळगाव येथे ट्रॅव्हल्सने जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याचे वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचुन आरोपी पळून जाण्यापुर्वी त्यांना ताब्यात घेतले. यात 1) आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी, वय 25 वर्षे, रा. सध्या राहणार- फ्लॅट नं 401 गुरुकृपा अपार्टमेंट, टेल्को कॉलनी, दत्तनगर, कात्रज, पुणे, मुळगाव- सात खोल्यांजवळ प्रजापतनगर, मंदुराबाद रोड, जळगाव, 2) लोकेश मुकुंदा महाजन, वय 24 वर्षे, रा सध्या राहणार- सदर मुळगाव- प्लॉट नं 07, गट नं 12. समर्थनगर, खेडी बुद्रुक, जळगाव अशी असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडे पोलीस पध्दतीने तपास करता, त्यांनी वरील चैन स्नॅचिंग केल्याचे कबुल केल्याने त्यांना अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी घेतली. 

पोलीस खाक्या आणि गुन्हेगार पटापट बोलू लागले-
जळगाव येथुन येऊन पुणे शहरातील भारती विद्यापीठ बिबवेवाडी, सहकारनगर, विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत त्यांचे साथीदार मित्र यांच्यासह व मदतीने चैन स्नॅचिंग केल्याचे कबुल केल्याने तात्काळ पोलीसांनी तपासकामी जळगाव येथे जावुन धाडसाने त्यांचे मुळ गावातून आरोपी 1) प्रसाद उर्फ परेश संजय महाजन वय 25 वर्षे, रा. प्लॉट नं. 1 ज्ञानदेव नगर जळगाव महाराष्ट्र 2) संदीप अरविंद पाटील वय 28 वर्षे, रा. कांचननगर, स्वामी समर्थ केंद्राचे मागे, जळगाव महाराष्ट्र 3) दिपक रमेश शिरसाठ वय 25 वर्षे, रा. मु/पो. वरखेडी, ता- पाचोरा, जि- जळगाव महाराष्ट्र यांना सुध्दा ताब्यात घेतले व त्यांनी सुध्दा जळगाव येथून पुण्यात येऊन चैनस्नॅचिंग केल्याचे उघड झाले आहे.

आंतरजिल्हा टोळीच्या कारवाया –
यातील आरोपीनी जळगाव येथुन येऊन दत्तनगर कात्रज भागात राहुन पुणे शहरात 5 ठिकाणी चैन स्नॅचिंग केल्याचे निष्पन्न झाले असुन पर्वती, भारती विद्यापीठ, सहाकरनगर, बिबवेवाडी व विश्रामबाग या पोलीस स्टेशनमधील 05 गुन्हे आतापर्यंत उघडकीस आले आहेत. आरोपींवर यापुर्वी देखील जळगाव, अकोला, पुणे अमरावती शहरात चैन स्नॅचिंगचे सुमारे 30 च्या वर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी गुन्हा कबुल केल्याने त्यांचेकडुन सुमारे 7,00,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना गुन्हयांत अटक करण्यात आली आहे.

 आरोपी हे अकोला, जळगाव, अमरावती पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्या भागातुन येवुन त्यांनी पुण्यात येवुन चैन स्नॅचिंग सुरु केल्या होत्या. मात्र पर्वती पोलीसांच्या सतर्कतेमुळे सोनसाखळी चोरांचे जळगाव कनेक्शन उघड झाले असुन त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत काय आणि अटक आरोपींनी आणखी यापुर्वी पुणे शहरात चैन स्नॅचिंग केली अगर कसे याचा सखोल तपास पर्वती पोलीस ठाणे कडील पोलीस उप निरीक्षक सुनिल जगदाळे हे करीत आहेत. तसेच सोनसाखळी चोरांना जरब बसावी म्हणुन पर्वती पोलीसांकडुन सदर आरोपींवर कठोरात कठोर कायद्यान्वये कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे.

ही दमदार कारवाई ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री.प्रविण पाटील, पोलीस उप- आयुक्त परि 3 श्री. सुहैल शर्मा, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग श्री.आप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.जयराम पायगुडे व पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक सुनिल जगदाळे, चंद्रकांत कामठे पो. हवा. कुंदन शिंदे, पो. अं. प्रकाश मरगजे, किशोर वळे, अमित सुर्वे, अनिस तांबोळी, प्रशांत शिंदे, अमित चिव्हे, सद्दाम शेख, दयानंद तेलंगे-पाटील, नवनाथ भोसले, अमोल दबडे, प्रमोद भोसले, ज्ञानेश्वर शिंदे व पुरुषोत्तम गुन्ला यांनी केली आहे.