Friday, January 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

दिवाळीत सुतळी बॉम्ब फोडाल, तर याद राखा

दिवाळीत सुतळी बॉम्ब फोडाल, तर याद राखा

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून मार्गदर्शक सुचना जारी
पुणे/दि/ नॅशनल फोरम/
दिवाळीच्या सणउत्सवात फटाके वाजविण्याची आपली पंरपरा आहे. दिवाळी सणामध्ये लक्ष्मी बॉम्ब, सुतळी बॉम्ब फोडल्याशिवाय दिवाळी आणि त्यातही लक्ष्मीपुजन साजरी झाल्यासारखे वाटत नाही. परंतु थोड थांबा… पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने काही मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. तसेच दिवाळी सणानिमित्त दरवर्षी तात्पुरते फटाके विक्री परवाने पोलीस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात येतात. फटाके विक्री करतेवेळी व फटाके वाजवितेवेळी कोणताही धोका अथवा अपघात होऊ नये यासाठी कायद्यामध्ये काहेी तरतुदी असुन त्याप्रमाणे नागरीकांनी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन पुणे पोलीसांकडून करण्यात आले आहे.


दरम्यान महाराष्ट्र शस्त्र अधिनियम (154) (3) अन्वये सरकारने कागदात स्फोटक पदार्थठेवलेले व त्याभोवती 42.534 ग्रॅम वजनाचा 5.715 सेंटीमिटर लांबीचा व 3.175 सेंटीमिटर व्यासाचा दोऱ्याने गुंडाळलेला ॲटमबॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादनावर व जवळ बाळगणाऱ्यावर आणि विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तालयाकडून फटाके परवाने दि. 12/10/2022 ते 21/10/2022 पर्यन्त या कालावधीसाठीच देण्यात येणार आहेत. मुदत संपल्यानंतर फटाके अथवा शोभेची दारू यांची विक्री करता येणार नाही तसेच शिल्लक राहिलेले फटाके अथवा साठा हा परवाना असलेल्या गोदामामध्ये किंवा घाऊक परवाना धारण करणा-याकडे परत करणे आवश्यक आहे.
पोलीस आयुक्तालयाचे परिक्षेत्रामध्ये कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्यांपासून 10 मीटर अंतराचे आत मुंबई पोलीस अधिनियम 1951 पोट कलम 33 यु मधील तरतुदी नुसार कोणत्याही प्रकारची शोभेची दारू अगर
कोणत्याही नावाने ओळखले जाणारे फटाके फेकणे, सोडणे, उडविणे, अगर फायर बलून किंवा अग्निबाण उडविणे ही कृत्ये करण्यास मनाई आहे.
सदर कलम 2 चे पोट कलम 15 अन्वये रस्त्यांत कोणत्याही महामार्ग / पूल / सेतू मार्गावर नेमलेले मार्ग, सेतू कमानवजा घाट, धक्का किंवा कोणतीही आळी किंवा चाट मग ती रहदारीची असो अथवा नसो याचा समावेश होतो. या आदेशाचे उल्लंघन जी व्यक्ती करेल ती वरील कायदयान्वये (कलम 131 (ए) सह ()) कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल.
मा. सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्रमांक 72/1998 मध्ये दिनांक 27.9.2001 रोजी सुनावणीच्या दरम्यान दसरा, दिवाळी व इतर सणांच्या वेळी मोठया आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण होणारे ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालणे बाबत अंतरिम आदेश दिलेले आहेत.
एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसीबल आवाज निर्माण करणा या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे.
जर साखळी फटाका 50 से 100 तसेच 100 व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा (फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे 115/110 105 डेसीबल एचडी असावी. यापेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या तसेच 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या सर्व साखळी फटाका उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे.
ज्या ठिकाणी तात्पुरत्या फटाका स्टॉलकरिता परवानगी देण्यात आली आहे त्या ठिकाणी 50 मिटरच्या परिसरात संयुक्त नियंत्रक विस्फोटके, मुंबई यांचेकडील अधिसूचना क्रमांक जीएसआर 687 (इ) दि 1984 मधील परि क्र. 5 अन्वये फटाक्यांची आतिषबाजी करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.
तरी वरील नियमाचे काटेकोरपणे पालन करून कोणताही अपघात अथवा धोका होणार नाही याबाबत कृपया नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.