Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बिर्याणी चांगली झाली नाही तर तुला किडनॅप करीन- धमकी देवून विनयभंगही केला, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
माकेटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेल मध्ये आरोपीनी प्रवेश करून महिलेसोबत अश्लील गैरकृत्य केले. तसेच बिर्याणी चांगली झाली नाही तर किडनॅप करण्याचीही धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी महिलेचे मार्केटयार्ड येथे हॉटेल आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी लक्ष्मण घाडगे हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी आला होता. त्याने फिर्यादी यांच्या पतीकडे बिर्याणीची मागणी केली असता त्यांनी अर्धातास लागेल असे सांगितले. यानंतर फिर्यादी यांचे पती कंस्ट्रक्शन साईवर गेले. दरम्यान, फिर्यादी हॉटेलच्या किचनमध्ये बिर्याणी तयार करत होत्या. त्यावेळी आरोपी किचनमध्ये आला. त्याने फिर्यादी यांच्या लागावर हात फिरवून गैरवर्तन केले. तसेच बिर्याणी चांगली बनवण्यास सांगून बिर्याणी चांगली झाली नाहीतर तुला किडनॅप करेन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकरणी मार्केटयार्ड परिसरात राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली असुन आरोपी लक्ष्मण अमृत घाडगे, वय-40 याच्यावर भा.द.वी कलम 354, 354अ, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.