नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या पाचही परिमंडळातील पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असणारे दरोडा, चेन चोरी, घरफोडी, चोरी व इतर गुन्हयातील चोरीस गेलेले सोने / चांदीचे दागिने फिर्यादी यांना पुनः प्रदानाचा कार्यक्रम पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सुमारे पाच कोटी 31 लाख रुपयांपेक्षा अधिक असलेले सोने चांदीचे दागिने व चोरीचा मुद्देमाल संबंधित फिर्यादीस दिले असल्याचे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
पोलीसांना 100 कोटींचा निधी देणार –
अलीकडच्या काळात गुन्हेगार अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत. त्या तुलनेत पोलीस अत्यंत मर्यादित साधनांसह आपले काम चांगल्या प्रकारे करतात. पोलीसांना अद्ययावत शस्त्रे व साधने उपलब्ध करून देण्यासाठी आणि पोलीस वसाहतीच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती आणि समाजातील उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून 100 कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री त्यांनी कार्यक्रमा दरम्यान दिली.
पोलीस आयुक्तांचे मनोगत –
चोरीचा मुद्देमाल हस्तांतर कार्यक्रमाच्या प्रास्तविकात पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी गुन्हे उघडकीस आणल्यावर मुद्देमाल हस्तगत करणे कठीण असते व पोलीस अधिकारी परिश्रमपुर्वक काम करतात आणि कायदेशीर बाबी पुर्ण करून मुद्देमाल फिर्यादींना हस्तांतरित केला जातो. असा सुमारे 5 कोटी 31 लाख रूपयांचा मुद्देमाल कार्यक्रमात हस्तांतरित करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान पालकमंत्र्यांचे हस्ते 58 फिर्यादींना मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला तसेच गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्याची चांगली कामगिरी करणाऱ्या 14 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच चांगली कामगिरी करणारे पोलीस अधिकारी अंमलदार यांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाची सांगता पोलीस सह आयुक्त श्री. सदीप कर्णिक यांनी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथी, पोलीस अधिकारी व अंमलदार आणि नागरिक / फिर्यादी यांचे आभार मानुन केली. परिमंडळीय निहाय 1) परिमंडळ- 01 – एकुण 24 लाख 31 हजार 887/- 2) परिमंडळ 02- एकुण 25 लाख 29 हजार 800/- 3) परिमंडळ-03- एकुण 38 लाख 92 हजार 060/- 4) परिमंडळ-4- एकुण 3 कोटी 19 लाख 43 हजार 305/- व 5) परिमंडळ-5- एकुण 23 लाख 50 हजार रुपये फिर्यादी यांना मुद्देमाल परत करण्यात आला आहे. मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाची सांगता पोलीस सह आयुक्त श्री. सदीप कर्णिक यांनी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथी पोलीस अधिकारी व अंमलदार आणि नागरिक / फिर्यादी यांचे आभार मानून केली.
पुणे शहर पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथे पुणे शहर पोलीस दलातर्फे आयोजित मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्यात, पोलीस आयुक्त पुणे शहर. श्री. रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे.श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ - 1. श्री. संदिप गिल्ल, पोलीस उपायुक्त परिमंडळ- 2. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ - 3, श्री. सुहेल शर्मा, पोलीस उपायुक्त, परिमंडळ- 4. श्री. शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ -5, श्री. विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त, पोलीस मुख्यालय, पुणे,श्री.रोहिदास पवार आणि सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि गुन्हयाचे तपासी अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच फिर्यादी हजर होते.