
सुनिल थोपटे, योगेश मांढरे व दिगंबर चव्हाण यांची अंमली पदार्थ विरोधातील धडक मोहिम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहरात कोयता गँगची दशहत निर्माण झाली आहे. तथापी कोयता, तलवार घेवून नाचणारे नॉर्मल स्थितीतील असल्याचे आढळत नाही. त्यामुळे कोयता किंवा तलवारी हवेत फिरविणारे हे कुठली ना कुठली तरी नशा करीत असल्याचे समोर आले आहे. त्यात अंमली पदार्थांचे सेवन हा महत्वाचा भाग असू शकतो असे काही मानसोपचार तज्ज्ञ व डॉक्टरांनी नॅशनल फोरमशी बोलतांना व्यक्त केले होते. त्यामुळेच संबंधित कोयता व तलवारीची दहशत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करीत असतांना अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई बाबतचे वृत्त नॅशनल फोरममध्ये प्रसारित करण्यात आले होते. दरम्यान अंमली पदार्थ विभाग क्र. 1 व 2 यांच्या थेट कारवाया सुरू होत्या परंतु इतरही पोलीस स्टेशन यांनी पुढे येवून कोयता, तलवार आणि अंमली पदार्थ विरोधाची तलवार अधिक गतिमान करावी असे अपेक्षित होते.
दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 2 यांनी समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील रास्ता पेठ येथे गांजा विक्री करण्यास येणाऱ्यावर मोठ्ठी कारवाई केली असून, त्यात सुमारे 6 लाख 60 हजार रुपयांचा गांजा पकडण्यात आलेला आहे. अंमली पदार्थ विभाग क्र. 2 मधील पोलीस अंमलदार श्री. योगेश मांढरे यांना माहिती मिळाली की, पुण्यातील रास्ता पेठ येथे गांजा विक्रीसाठी आणला जाणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर, अंमली पदार्थ पथक क्र. 2 च्या पोलीसांनी सापळा लावण्यात आला.
यावेळी रास्ता पेठ येथील द क्रिश लॉज समोरील सार्वजनिक रस्त्यावर 1. अक्षय रोकडे वय 21 रा. मु.पो. सालेस, ता. करमाळा जिल्हा सोलापूर व 2. करण सुरवसे वय 19 रा. मु. पो. पारगावं खंडाळा सातारा यांच्याकडून सुमारे 6 लाख 81 हजार 520 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये 6 लाख 50 हजार रुपयांचा रुपयांचा 32 किलो 501 ग्रॅम गांजा, 20 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन व एक हजार रुपयांची लाल सुटकेस 500 रुपये किंमतीची एक हिरवट रंगाची सॅक बॅक व 10 हजार रुपये रोख असा ऐवज अनाधिकाराने व बेकायदेशिररित्या जवळ बाळगतांना मिळून आले आहे.
संबंधित गांजा विक्री करणाऱ्यांविरूद्ध समर्थ पोलीस स्टेशन येथे एनडीपीसी ॲक्ट नुसार गुनहा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतचा अधिक तपास अंमली पदार्थ पथक क0. 2चे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
वरील कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उपनिरीक्षक एस.डी नरके, दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, युवराज कांबळे, दिशा खेवलकर, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे व दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.