Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

अखेर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या विजय कुंभारांची विशेष शाखेत बदली,देशी विदेशी दारूचा महापुर अजुनही थांबेना, विनायक गायकवाड दारूच्या महापुराचा बंदोबस्त करणार काय?

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ (वृत्तविश्लेषण)
राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट या आशयाची बातमी चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्यानंतर, राज्य उत्पादन शुल्क विभागाने कात्रज भागात पाहणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार यांची बदली केली आहे, त्यांच्या जागी आता अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सुपर हीरो श्री. विनायक गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. श्री. कुंभार यांची बदली विशेष शाखेत करण्यात आली आहे. त्याच बरोबर बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी अनिल सातपुते यांची अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 मध्ये बदली करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभाग तीन महिने, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन 7 महिने अशी कारकिर्द गाजविणाऱ्या श्री. कुंभार यांची बदली आता थेट विशेष शाखेत करण्यात आली आहे. दारूचा महापुर थांबविण्यात अपयश आल्याने अखेर बदली झाली असल्याचे समजते.

भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत देशी विदेशी दारूची विक्री, भेसळयुक्त बनावट दारूचीही अधिक विक्री – नवनियुक्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड दारूचा महापुर रोखणार काय….
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत विनापरवाना 40 ते 45 ढाबा, हॉटेल मधुन होत असून या ठिकाणी देशी विदेशी दारूची तस्करी, विक्री होत असली तरीही त्यामध्ये कंपन्यांची मुळ दारू 30ते 40 टक्के असून, इतर 60 ते 70 टक्के दारू ही भेसळयुक्त व बनावट असल्याचे नियमितपणे ढाब्यावर जाणाऱ्यांचे म्हणणे ठरत आहे. एक दोन घोटातच किक बसून नशा तर्रपणे येत असल्याने बहुतांश जण पहिल्या धारेची मिळते म्हणून या भागात येत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. दरम्यान यानंतर डोकं दुखणं, अंग दुखणे यासाह वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. याबाबत पुणे महापालिकेकडील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे वरील लक्षणांबाबत विचारणा केली असता, मद्यपान करणाऱ्यांना अशा प्रकारची लक्षणे येऊ शकतात, त्यात नवीन काहीच नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. परंतु अतिअल्कहोल प्राशन केल्यामुळे असे होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान काही नियमित चवीच्या ग्राहकांनी मात्र दारूमध्ये भेसळ होत असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान शासनाच्या महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या हॉटेल व ढाबा चालकांवर कारवाई होणार आहे काय, तसेच देशी विदेशी दारूची तस्करी करणाऱ्यांविरूद्ध श्री. विनायक गायकवाड सिंघम स्टाईल कारवाई करणार आहेत काय हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
दरम्यान राज्य शासनाचे आर्थिक नुकसान, नागरिकांच्या आरोग्याची हेडसांड होत असताना देखील त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांच्यामुळेच हॉटेल व ढाबेचालकांचे मनोधैर्य वाढले असल्याची बाबही दिसून येत आहे. राज्य शासनाचे दोन्ही विभाग देशी-विदेशी दारूच्या तस्करी संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे गांभीर्य बाळगत नसून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणून दुसऱ्या बाजूने राज्य शासनाचा महसुल देखील बुडविला जात आहे. या सर्व प्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी याप्रकरणी अधिक लक्ष देण्याची मागणी होत आहे.

दारूची नशा आणि ऑनलाईन गेमिंग लॉटरी जुगाराचे अड्डे-
चार दिवसांपूर्वी प्रसारित झालेल्या बातमीत नमूद केले होते की, एकीकडे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत दारूचा महापुर आलेला असतांना, दुसरीकडे मात्र ऑनलाईन लॉटरी, व्हिडीओ गेम सारख्या माध्यमातून जुगार अड्डे वेगात सुरू आहेत. ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डे चालु ठेवून, तरूणांना जुगारी बनविले जात आहे. त्यातूनच पुढे गुन्हेगारीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
भारतीच्या हद्दीत मध्यवर्गीयांची मोठी संख्या आहे. मजुरांची देखील तेवढीच संख्या आहे. साडेपाच लाख लोकसंख्येच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत लाखाच्या आसपास बाहेरून आलेले विद्यार्थी व कामगार अधिक आहेत. त्यामुळे साडेपाच लाख नव्हे तर सहा लाख लोकसंख्या असलेल्या भारती विद्यापीठातील अंमलदार मात्र रस्त्यावर पेट्रोलिंग करतांना मात्र कधीच दिसत नाहीत. बेकायदेशिर प्रवासी वाहतुकदार आणि भारती विद्यापीठ पोलीसांची जुनी ओळख आहेच आता त्यात नव नवीन बेकायदेशिर व गैरकायदयाच्या मंडळींची अधिक भर पडत आहे. हा मोठा विषय असून नवी नियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड कोणती कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.