Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला फरासखाना पोलीसांनी केली शिताफीने अटक
दगडी नागोबाजवळ ट्रॅप, पोलीसांनी पाठलाग करून पकडले

faraskhana police

पुणे/दि/ प्रतिनिधी/
श्रावण महिना सुरू झाला आणि सर्वधर्मियांचे धार्मिक सण उत्सव सुरू झाले आहेत. मुस्लिम धर्मियांचे नवीन वर्ष सुरू झाले असून मोहरम (ताजिया) सुरू आहेत. हिंदू धर्मियांचा श्रावणमास सुरू असून, नागपंचमी पासून गणपती-नवरात्रौ पर्यंत सण उत्सव सुरू असतात. पुणे शहरातील मंडई मध्ये सर्व प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची दरवर्षी मोठी संख्या असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशनडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत पायी पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार राकेश क्षीरसागर यांना गोपनीय बातमीदार करवी माहीती मिळाली की . दगडीनागोबा मंदिर गणेश पेठ , पुणे येथे एक इसम पिस्तुल घेऊन थांबलेला आहे अशी माहीती मिळाली. सदरची माहीती तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र लांडगे व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) शब्बीर सय्यद यांना सांगितली असता त्यांनी खात्री करून कारावाई करण्याचे तोंडी आदेश दिल्याने सदर ठिकाणी तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार यांच्यासह जावुन बातमी प्रमाणे खात्री करत असताना सदरचा इसम पळुन जाऊ लागला . तेव्हा पोलीस अंमलदार राकेश क्षीरसागर यांनी शिताफीने पाठलाग करुन तात्काळ पकडले .

त्यावेळी त्याचेकडे चौकशी करता त्याने त्याचे नाव ऋषीकेश सुनिल बागुल , वय 24 वर्षे , रा.एस.आर.ए. बिल्डींग , शिंदे वस्ती हडपसर पुणे असे असल्याचे सांगितले . तेव्हा त्याची झडती घेता त्याच्या जवळ देशी बनावटीचे पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे मिळुन आल्याने ती जप्त करण्यात आली आहेत . 

याच्याविरुध्द 1 ) मुंढवा पोलीस स्टेशन गु.रजि . नं 221/2016 भा.दं. विकलम 3 9 4 ( 2 ) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.रजि . नं 261 / 2017 भा.दं.वि कलम 142,143 , 146 , 147,323.504,506 ( 3 ) फरासखाना पोलीस स्टेशन गु.रजि . नं 282/2018 भा.दं.विकलम 143 , 147,148 , 14 9 .506 ( 2 ) 323.504 आर्म ॲक्ट कलम 4 ( 25 ) ( 4 ) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.रजि.नं 103/2018 भा.दं.वि कलम 326 143 , 144 , 147 , 14 9 , 34 ( 5 ) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.रजि . नं 318/2018 भा.दं.वि कलम 326 , 143 , 144 , 148 , 14 9 आर्म ॲक्ट कलम 4 ( 25 ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 ( 1 ) सह 135 ( 6 ) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.रजि . नं 38 9 / 201 9 भा.दं.वि कलम 452.427.323.504 ( 7 ) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.रजि . नं 443 / 201 9 भा.दं.वि कलम 141,142144 , 147 , 148 , 14 9 .267427 आर्म ॲक्ट 4 ( 25 ) ( 8 ) हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि . नं 8 9 / 2022 भा.दं.वि कलम 143 , 147,14 9 .323.504.506 क्रिमीनल लॉ अमेटमेंट कलम 3.7 ( 9 ) फरासखाना पोलीस स्टेशन गु.रजि.नं 130/2022 भा.द.वि कलम 143 , 147 , 14814 9 , 427 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 ( 1 ) सह 135 आर्म ॲक्ट कलम 4 ( 25 ) क्रिमिनल लॉ अमेटमेंट कलम 3.7 प्रमाणे गुन्हे दाखल असुन तो फरासखाना पोलीस स्टेशन गु.रजि . नं . 130/2022 व हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि . नं 8 9 / 2022 मध्ये फरार होता .
ऋषीकेश बागुल यांच्या विरुध्द पोलीस अंमलदार राकेश क्षीरसागर यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक , निलेश मोकाशी हे करत आहेत.

 सदरची कारवाई  मा . अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री . राजेंद्र डहाळे,  मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 पुणे डॉ . प्रियंका नारनवरे , मा . सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री . सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली,

 फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री.राजेंद्र लांडगे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) . श्री . शब्बीर सय्यद , पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी , पोलीस अंमलदार राकेश क्षीरसागर , रिजवान जिनेडी , मेहबुब मोकाशी , प्रविण पासलकर , वैभव स्वामी , मोहन दळवी , महावीर वल्टे , संदीप कांबळे , राकेश क्षीरसागर , समीर माळवदकर , किशोर शिदे , गणेश आटोळे , सुमित खुट्टे , पंकज देशमुख , तुषार खडके , अजित शिंदे , शशिकांत ननावरे यांच्या पथकाने केली आहे .