Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सामाजिक सुरक्षा विभागाची 12 अ ची कारवाई आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांचं आर्थिक पुर्नवसन करणारी अर्थनिती

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात मटका जुगार अड्डयांवर कारवाया होत असल्याच्या बातम्या नियमित येत असतांना, ज्यांच्यावर कारवाई झाले ते धंदे देखील पुनः तासा/दोन तासात सुरू होत आहेत. तर नवीन पोलीस आयुक्तांच्या भीतीने बंद पडलेले अवैध मटका जुगार अड्डे देखील पुनः नव्याने सुरू झाले आहेत. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगाराचं आर्थिक पुर्नवसन करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. दरम्यासन पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुमारे 12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका दाखल करण्यात आला आहे. तसेच 4 गुन्हेगार स्थानबद्ध केले असून 43 सराईत गुन्हेगारांना तडीपार करून पुणे शहरात दशहत निर्माण करणाऱ्या व सक्रिय गुन्हेगारांवर कडक प्रतिबंध कारवाई करण्याचे धोरण पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी अवलंबविले असतांना, विश्रांतवाडी सारख्या दलित बहुजन समाजाची अधिक लोकसंख्या असलेल्या अनुसूचित क्षेत्रात मटकार जुगार अड्ड्यासह हातभट्टी सह देशी विदेशी दारूची विक्री खुलेआम करून गोरगरीबांना लुटून तो पैसा गुन्हेगार पोसण्यासाठी होत असल्याचेही दिसून येत आहे.


पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मागील चार महिन्यात जेवढ्या कारवाया केल्या आहेत, त्यातील खेळणारे व खेळविणाऱ्यांवर जुप्रका तील 12 अ ह्या कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. याबाबत मागील नॅशनल फोरमच्या लेखात याबाबतचा उहापोह केला होता. तसेच पुण्यातील पेठांमधील कारवाईबाबत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिलेली होती. दरम्यान चालुच्या आठवड्यात जेवढ्या पोलीस कारवाया झाल्या त्यापैकी बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्डे पुनः सुरू झाले आहेत. जुगार अड्डे म्हणजे गरीबांना लुटायचे आणि गुन्हेगारांना पोसायचे अशा प्रकाचा हा धंदा आहे. त्यामुळे कारवाई करतांना कायदयातील तरतुदीनुसार नियमान्वित होणे अपेक्षित आहे एवढीची माफक अपेक्षा होत असते.


विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सध्या मटका, जुगार अड्डे, सोरट, पणती पाकोळी सारखे धंदे सुरू असून, त्याच बरोबरीने हातभट्टी, देशी विदेशी दारूची भर रस्त्यावर खुलेआम विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीक अतिशय गरीब व मध्यमवर्गीय समाजघटकातील आहेत. विशेषतः बौद्ध व वडार समाज संख्येने जास्त असून इतर समाज त्यांच्या खोलोखाल आहे. शांतीनगर, राजीव गांधी नगर, एकता नगर, भिमनगर, वडारवाडी, फुले नगर, पंचशिल नगर या मोठ्या घनतेच्या लोकसंख्या असलेल्या स्लम विभागात अवैध धंदे सुरू असतांना, सामाजिक सुरक्षा विभाग कारवाई करीत नाही. वस्तुतः ह्या राजरोसपणे सुरू असलेल्या धंदयावर प्रथम विश्रांतवाडी पोलीस स्टेशन यांनी कारवाई करणे अपेक्षित असतांना, ते कारवाई करीत नाहीत. एवढंच कशाला.. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोरच मटका जुगार अड्डा सुरू असतांना, पोलीस काहीच कारवाई करीत नाहीत हे विशेष म्हणावे लागेल.


गुंड्या नामक गॅम्बलरवर तत्कालिन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी कठोर कारवाई करून त्याचे साम्राज्य पुर्णपणे उध्वस्त केले होते. आता मात्र हाच उध्वस्त गुंड्या पुनः उभारी घेत आहे. गुप्ता, मिश्रासह पाटील, डुकरे सारखी मंडळी विश्रांवाडी पोलीस स्टेशन हद्दीत दलित बहुजन समाजाचे लचके तोडत असल्याचे स्थानिक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले आहे. शिवाय स्थानिक पोलीस स्टेशन म्हणते आमच्या हद्दीत काहीच नाही असे ऐकण्यात आले आहे.
पोलीस स्टेशन कारवाई करण्यास कसुरी करीत असतील तर गुन्हे शाखा युनिट, सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. तसेच बहुतांश ठिकाणचे धंदे हे बंदिस्त ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे कठोर कारवाई करून, दलित बहुजन समाजाचे लचके तोडणाऱ्या अवैध धंदे चालविणाऱ्यांवर कारवाई करून, गुन्हेगारांना पोसणाऱ्या अर्थात त्यांना साथ देणाऱ्या समाजविघातक शक्तींना वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे.
विश्रांतवाडीतील अवैध धंदे सुरू राहण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील एक धंदेवाईक पोलीस वसुलदार अति उत्साही असल्याचे समोर आले आहे. साहेबांचे एक लाख, मोठ्या साहेबांचे एक लाख आणि माझे एक लाख असे तीन लाख रुपये दे तरच धंदा चालु ठेवीन नाहीतर कारवाई करेन अशी धमकी दिली जात असल्याचेही ऐकिवात आहे. एकाच धंदा चालु रहावा म्हणून दुसऱ्या धंदयावर कारवाई केली जाते परंतु ती कारवाई आजपर्यंत पोलीस रेकॉर्डव्र दिसून आली हे मात्र विशेष आहे.
नुतन पोलीस आयुक्तांनी प्रकरणी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विश्रांतवाडीच्या शेजारीच विमानतळ पोलीस स्टेशन आहे तिथे देखील याच प्रकारची बेदिली सुरू आहे. पुढील काळात त्याचीही उपलब्ध असलेली माहिती पोलीस आयुक्तांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.