Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

दुभंगलेली काँग्रेस- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- शिवसेना (उबाठा) यांचे… आता वाजले की बारा… 12 दिवस उलटून गेले तरी वंचितच्या 39 मुद्यांवर मौन का बाळगुन आहेत…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
देशातचे पहिले पंतप्रधन जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर व पुढे 1977 पर्यंत देशात काँग्रेसच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणांमुळे सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि काँग्रेस हटावची चळवळ सुरू झाली. इंदिरा हटाव मोहिम सुरू झाली. पुढे कालांतराने आता भाजपाने देखील काँग्रेसचाच भांडवलदार धार्जिणा कार्यक्रम पुढे रेटल्याने, देशात मोदी हटाव, भाजपा हटाव म्हणून विरोधी पक्ष एक होत आहेत. कुणाला तरी विरोध म्हणून किंवा सत्तेसाठी विरोधी पक्ष एकवटत असला तरी यातून जनतेचे कोणतेही हीत होत नाही. त्यामुळेच किमान समान कार्यक्रमावर आधारित सर्व राजकीय पक्षांनी एक होवून देशातील निवडणूकांना सामोरे जावे यासाठी वंचित बहुजन आघाडीने मागील दोन ते अडीच वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक शहर व जिल्ह्यात 8 ते 10 लाखांच्या सभा पार पडत आहेत. दरम्यान वंचित व शिवसेना उबाठा यांनी मागील एक वर्षापूर्वी युतीची घोषणा केली आहे. पुढे दुभंगलेली काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी देखील राज्यात महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. त्या महाविकास आघाडीत मात्र वंचित बरोबर चर्चा सुरू आहेत. परंतु वंचितने दिलेल्या मसुदयावर चर्चा करायला राजकीय पक्ष तयार नाहीत. किंबहुना वंचितला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याविषयी साधी चर्चा देखील केली जात नाहीये. आज किमान समान कार्यक्रमाचा मसुदा देवून 12 दिवस उलटून गेले तरी महाविकास आघाडीतील पक्षांनी मौन बाळगले आहे.

प्रस्तावना-
देशात मोदी हटाव, लोकशाही वाचवा म्हणून सर्व विरोधी पक्ष टाहो फोडत आहेत. लहान मोठ्या प्रसार माध्यमांतुन देखील मोदी हटाव ची घोषणा होत आहे. परंतु देशात हे पहिल्यांदाच होत नाहीये. तर यापूर्वी देखील इंदिरा गांधीच्या आणीबाणीनंतर, देशात असंतोष निर्माण झाला होता. त्यावेळी देखील इंदिरा हटाव, लोकशाही बचाव म्हणून सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहे. जनता पार्टीच्या माध्यमातून देशात सर्व विरोधी पक्ष एक झाले होते. परंतु किमान समान कार्यक्रम नसल्यामुळे व वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आल्यामुळे त्यांच्यात एक वाक्यता राहिली नाही. त्यामुळे जनता पार्टीचे विघटन झाले. चौधरी चरणसिंग देशाचे काही काळ पंतप्रधान राहिले. परंतु पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या. पुढे राजीव गांधी व काँग्रेस विरूद्ध देशात वातावरण निर्माण झाल्यानंतर, पुन्हा देशात विरोधी पक्ष एक झाले व त्यांनी राजीव गांधी हटाव, काँग्रेस हटावची घोषणा केली. त्यात देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पुन्हा जनता दलाची (आघाडीची) स्थापना केली. त्याचेही जनता पार्टीसारखे झाले. किमान समान कार्यक्रम नसल्यामुळे सर्व पक्ष पुन्हा फुटले. असे आता मोदी हटाव, लोकशाही बचाव, संविधान बचावसाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीची स्थापना झाली आहे. परंतु मोदी हटाव- संविधान बचाव म्हणत असतांना, त्यांच्याकडे कुठलाही समान कार्यक्रम नाही. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी किमान समान कार्यक्रम तयार करून तो काँग्रेस, शिवसेना-उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना पाठविला आहे. तसेच त्या त्या पक्षांनी त्यात बदल करून आणखी भर घालावी, त्यांची विचारधारा त्यात मांडावी व एक परीपूर्ण अजेंडा घेवून जनतेमध्ये जावे अशी देखील बाळासाहेब आंबेडकर यांनी भूमिका मांडली आहे.

किमान समान कार्यक्रम का असावा, इतिहासातून आपण काही शिकणार आहोत काय –
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहलाल नेहरू यांचे 1964 साली निधन झाल्यानंतर, देशात अराजकता निर्माण झाली होती. त्यानंतर काँग्रेसने तत्काळ गुलजारीलाल नंद यांना दोन महिन्यांसाठी पंतप्रधान केले. त्यानंतर लाल बहाद्दुर शास्त्री यांनी 9 जुन 1964 ते 11 जानवेरी 1966 या कालावधीत देशाचे प्रंतप्रधानपद भुषविले. त्यांच्या अकाली निधनानंतर, पुन्हा गुलजारीलाल नंदा हे पंतप्रधान झाले, केवळ 13 दिवस पंतप्रधान पद भुषविल्यानंतर, 24 जानेवारी 1966 साली इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान पदावर बसल्या. इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 या कालावधीत पंतप्रधानपद भुषविले. परंतु त्यांच्या या कालावधीत देशात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. तत्कालिन काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून प्रचंड खदखद निर्माण झाली होती. इंदिरा गांधी यांनी देखील अतिशय आक्रमकपणे वागत असल्याचे तत्कालिन नेतृत्वाचे मत होते. त्यामुळेच काँग्रेस पक्षात उभी फुट पडली, त्यात समाजवादी काँग्रेस (मवाळ गट) व काँग्रेस काय (जहाल गट) थोडक्यात इंडिकेट काँग्रेस व सिंडीकेट काँग्रेस अस्तित्वात आली.

25 जुन 1985 चा काळा दिवस- आणीबाणीची घोषणा-
इंदिरा गांधी यांनी घटनेत बदल करण्यात सुरूवात केली. घटना दुरूस्ती करण्यासाठी सुवर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्यातच तत्कालिन राष्ट्रपती फक्रुद्दिन अली यांनी भारतीय संविधानाच्या 352 (1) नुसार देशात 25 जुन 1975 साली देशात आणीबाणी लागु केली. वृत्तपत्रांवर बंदी घालण्यात आली. सर्व विरोधी पक्षांना जेल मध्ये टाकण्याचे काम सुरू झाले. इंदिरा गांधी यांच्या या हेकेखोर वृत्तीमुळे देशात अराजकता निर्माण झाली. त्याविरूद्ध सर्व विरोधी पक्ष एकवटला. जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणी हटाव, काँग्रेस हटाव, इंदिरा हटावचा नारा दिला. बिहार पासून गुजरात पर्यंत आणि महाराष्ट्रातही झंझावात निर्माण केला. त्याची परिणीती आणीबाणी हटल्यानंतर 1977 सालच्या निवडणूकी इंदिरा गांधीचा दाणून पराभव झाला. जनता पार्टीच्या माध्यमातून मोरोरजी देसाई पंतप्रधान झाले. 25 जुन 1975 ते 1977 या काळामध्ये आणीबाणी विरोधी आंदोलने झाली त्याचा हा पारिपाक होता. जवळ जवळ 21 महिने आणीबाणी लागु होती.

जनता पार्टीचा उदय व अस्त-
दरम्यान जनता पार्टीत अनेक विराधी पक्ष एक झाले होते. परंतु त्यांच्यात एकवाक्यता नव्हती. समान कार्यक्रम नव्हता. मतभिन्नता होती. वेगवेगळी मतमतांतरे होती. त्यामुळे 1977 ते 1979 या दोन वर्षाच्या काळात जनता पार्टीचे सरकार कोसळले. मोरारजी देसाई नंतर जनता पार्टीतच चौधरी चरणसिंग यांना पंतप्रधान करण्यात आले. चौधरी चरणसिंग यांनी 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 एवढ्या कालावधी पर्यंत ते पंतप्रधान राहिले. झालेल्या निवडणूकी पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली. इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोंबर 1984 पर्यंत त्यांनी पंतप्रधानपद भुषविले. पुढे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली. राजीव गांधी हे पंतप्रधान झाले. राजीव गांधी यांनी 31 ऑक्टोंबर 1984 ते 2 डिसेंबर 1989 पर्यंत राजीव गांधी हे पंतप्रधान पदावर राहिले.

जनता दलाचा उदय व अस्त-
दरम्यानच्या काळात काँग्रेसच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरूद्ध पुन्हा देशात विरोधी पक्ष एकवटला. त्यांनी जनता दल नावाची आघाडी स्थापन केली. सर्व विरोधी पक्षांनी जनता दल या नावाने एकत्रित निवडणूका लढविल्या. काँग्रेस पुन्हा हरली व जनता दल सत्तेवर आली. 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990 या काळात व्ही.पी.सिंग यांनी पंतप्रधानपद भुषविले. व्ही.पी. सिंग यांच्या विरूद्ध जनता दलात वातावरण निर्माण झाल्याने चंद्रशेखर यांना काँग्रेसने पाठींबा देवून सरकार स्थापन केले. परंतु ते सरकार देखील काँग्रेसने पाडले. झालेल्या निवडणूकीत पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली. जनता पार्टी व जनता दल यामध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. परंतु त्यांच्याकडे कोणताही समान कार्यक्रम नव्हता. त्यामुळेच काँग्रेस विरूद्ध कोणताही पक्ष किंवा आघाडीने फारकाळ देशात सत्ता राबविली नाही. त्यामुळे आता देखील देशात मोदी हटाव चा नारा दिला गेला आहे. सर्व विरोधी पक्ष एकवटत आहे. परंतु ईडी, सीबीआय, आयटीच्या धाकामुळे विरोधी पक्ष एक होत नसला तरी काँग्रेसने इंडिया आघाडी स्थापन केली आहे.

आता महाराष्ट्राविषयी बोलूयात –
महाराष्ट्रात देखील भाजपा व मोदी विरोधी वातावरण निर्माण झाले आहे. एकटे बाळासाहेब आंबेडकर सोडले तर मोदी व भाजपा विरोधात एकही सत्ताधारी व विरोधी पक्ष आवाक्षरही काढत नसल्याचे दिसून येत आहे. लहान मोठ्या वृत्तपत्र व प्रसार माध्यमांतून मोदींविरूद्ध राळ उठविली आहे. काही सामाजिक संघटना निर्भय बनो या बॅनरखाली एक होवून महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. थोडक्यात बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह ॲड. आसिम सरोदे, निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, राजु परूळेकर सारखे मंडळी रस्त्यावर उतरली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीसह शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी कांॅग्रेस शरद पवार गट व काँग्रेस या महाविकास आघाडीचे घटक आहेत. त्यातील शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस यांनी यापूर्वी अनेकदा सत्ता उपभोगली आहे. तथापी मोदी हटाव साठी एकत्र आल्याचे दिसत असले तरी त्यांच्यात समान कार्यक्रम नाही. त्यामुळेच मोदी विरोधी आघाडी स्थापन केल्यानंतर, आपण एकत्र का आलो आहोत हे जनतेला सांगणे आवश्यक आहे, त्यासाठी वंचित बहुजन आघाडीने किमान समान कार्यक्रम तयार करून तो महाविकास आघाडीतील पक्षांना पाठविला आहे. त्या त्या पक्षांनी देखील त्या समान कार्यक्रमात आणखी भर घालुन अधिक लोकाभिमुख किमान समान कार्यक्रम घेवून जनतेत जाण्याबाबत सर्व पक्षांना कळविले आहे.
काय आहे किमान समान कार्यक्रम – तो जसा आहे तसा पुढील भागात देत आहोत.patr-01