पुणे/दि/ नॅशनल फोरम/
आज दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजीपर्यंत पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा देण्यात आला आहे. आजचे पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशन,वानवडी पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, पोलीस भरती यांचा समोवश आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाँटेड आरोपीस पकडले
23 लाख 26 हजाराचा “कोकेन“ ड्रग्ज हस्तगत
पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार व पोलीस सह आयुक्त, पुणे शहर. श्री. संदिप कर्णिक यांनी पुणे शहरामध्ये फेब्रुवारी मध्ये साजरा होणा-या महाशिवरात्री शिवजयंती. संभाव्य व्हि.व्हि.आय.पी. व्यक्तींचे दौरे तसेच कसबा विधानसभा पोट निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 15/02/2023 रोजी 21/00 वा ते दि. 16/02/2023 रोजी 02/00 वा पर्यंत ऑलआऊट / कोंबिंग ऑपरेशन राबविणे बाबत आदेश दिलेले होते. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडील अधिकारी व अंमलदारांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत वेगवेगळया टिम करुन पाठविण्यात आले होते. या कोंम्बिग ऑपरेशन दरम्यान कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा र.नं. 1017/2020, एन.डी.पि.एस ॲक्ट कलम 8 (क), 21 (ब), 22 (ब) 29 या दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी जेम्स डार्लिंगटन लायमो मुळ देश टांझानिया हा कालावधीत दिल्लीत वास्तव्यास असल्याची व सुमारे 2 महिन्यांपासुन लोणीकाळभोर पो.ठाणे हद्दीतील जाधवनगर, हांडेवाडी याठिकाणी वास्तव्यास असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने हांडेवाडी भागात शोध घेत असतांना आरोपी मिळुन आला आहे.
आरोपीची झडती घेता त्यांचे ताव्यात एकुण 23 लाख 93,200 /- रु. चा ऐवज त्यामध्ये कि.रु. 23,26,000/- चा 116 ग्रॅम 300 मिलीग्रॅम “कोकेन“ कि रु 10,000/- चे तीन मोबाईल हॅण्डसेट, किं.रु. 200/- किंमतीच्या रंगीबेरंगी प्लॅस्टिकच्या छोटया डब्या कि रु 50,000/- पल्सर मोटार सायकल व रोख रुपये 6,000/- चा असा ऐवज व “कोकेन“ हा अंमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आला.
त्यामुळे त्याचेविरुध्द दि. 16/02/2023 रोजी लोणीकाळभोर पो, ठाणे, पुणे गुरनं 143 / 2023 एन.डी.पि.एस ॲक्ट कलम 8 (क). 21 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आलेली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सपोनि शैलजा जानकर अंमली पदार्थ विरोधी पथक -1 पुणे हे करीत आहोत.
ही कामगिरी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा.पो.निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर तसेच पोलीस अंमलदार सहा पोलीस फौज. ज्ञानेश्वर घोरपडे, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी विशाल दळवी, राहुल जोशी प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, विशाल शिंदे, संदेश काकडे, सचिन माळवे रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते या पथकाने केलेली आहे
पोलीस शिपाई चालक भरती-2021 जाहीर, आक्षेप असल्यास तक्रार करण्याची संधी
पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पदाची भरतीसाठी दि. 03/01/2023 ते 17/01/2023 कालावधीत उमेदवारांची मैदानी चाचणी प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. या मैदानी चाचणी मध्ये 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात सामाजीक / समांतर प्रवर्ग/आरक्षणनिहाय वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या एकूण 870 उमेदवारांची तात्पुरती निवडसूची पुणे शहर पोलीसच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
तसेच सदरची यादी पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे नोटीस बोर्डवर डकविण्यात आलेली आहे. तरी चालक पोलीस शिपाई पदाचे उमेदवारांनी तात्पुरती निवडसुची पाहून सामाजीक समांतर प्रवर्ग आरक्षण व गुणांबाबत काही तक्रार / आक्षेप असल्यास दि. 19/02/2023 रोजी सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत पोलीस नियंत्रण कक्ष, पुणे शहर येथील ई मेल आयडीवर लेखी अर्जाद्वारे सादर करावेत. दि. 12/02/2023 रोजी सायंकाळी 18.00 वाजल्यानंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही असे सह पोलीस आयुक्त श्री. संदीपक कर्णिक यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
पुण्यातील पोटनिवडणूकीमुळे पोलीस भरती प्रक्रिया बंद
पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता दि. 03/01/2023 पासून पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तथापी, पुणे शहरातील विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दि. 18/02/2023 ते 27/02/2023 या कालावधीत या पुणे शहर घटकातील पोलीस भरती प्रक्रिया बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री. रोहितदास पवार पोलीस उपआयुक्त मुख्यालय यांनी कळविले आहे.
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत एक लाखाचे मंगळसुत्राची जबरी चोरी
सिंहगड रोड पोलीस स्टेशन /
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हददीतील आनंदी डायनिंग हॉल लगत चालु असलेल्या बांधकामाच्या कॉर्नरवर माणिकबाग येथे एक 50 वर्षीय महिला रा. आनंदनगर सिंहगड रोड या सार्वजनिक रस्त्याने पायी पुढे जात असतांना मोटारसायकलवरील एक अनोळखी इसम दुचाकीवरून फिर्यादी यांच्याजवळ येऊन त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किंमतीचे मंगळसुत्र जबरी चोरी करून नेले आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. निकम करीत आहेत.
वानवडीत गुन्हेगारी टोळीचा धुडगूस
वानवडी पोलीस स्टेशन/
वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत पुनः गुन्हेगारी टोळक्यांनी डोके वर काढले आहे. फिर्यादी यश ससाणे वय 22 वर्ष रा. सय्यद नगर हडपसर पुणे हे भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ससाणे याचा मित्र गुफरान उर्फ गुफ्या उर्फ मतीने खान याच्याशी असलेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून एकुण पाच इसमांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन यश ससाणे याच्या हातावर, पोटावर, पाठीवर व खांदयावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून, जखमी करून पुन्हा मारहाण करण्याच्या उद्देशाने पाठलाग केला आहे.
एकुण पाच इसमांविरूद्ध भादविक व भारतीय शस्त्र अधिनियम सह महाराष्ट्र पोलस अधिनियम कायदयाने गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक जयवंत जाधव करीत आहेत.
कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील उंड्री येथे 2 लाख 37 हजारांची घरफोडी
कोंढवा पोलीस स्टेशन/
रामंचद्र बळुनावर वय 58 यांचा शांतीकुंज सोसायटी उंड्री येथील फ्लॅट कुलूप लावुन बंद असतांना कुणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचे बाहेर शु रॅक मध्ये ठेवलेली कुलपाची चावी व सेंटर लॉकची चावी घेवून फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलपू उघडून बेडरूम मधील कपाटातील सोन्याचे दागिने व कॉईन असा एकुण 2 लाख 37 हजार रुपयांची घरफोडी केली आहे. अज्ञात इसमाविरूद्ध भादवि 454 व 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहा पोलस निरीक्षक गणेश तोरगल करीत आहेत.