Friday, January 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील गुन्हे युनिट दोन व दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीत शोधुन गुन्हेगार सापडतात म्हणे….

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस स्टेशन मधील पोलीस गुन्हयाचा शोध घेणे, प्रतिबंध करणे आणि गुन्हेगारीचे निर्मूलन करण्याच्या कर्तव्यावर कार्यरत आहेत. गुन्हेगारांचा अनेक वर्ष शोध घेवून देखील गुन्हेगार मिळून येत नसल्याचे शेकडो रिपोर्ट वरीष्ठ पोलीस अधिकारी व न्यायालयापुढे सादर केले जातात. तथापी पुणे शहरातील गुन्हे युनिट क्र. 2 आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पेट्रोलिंगला जातात आणि पाहिजे गुन्हेगार लगेच शोधून आणतात असे प्रकार समोर आले आहेत. तसेच काही विशिष्ठ पोलीसांनाच संबंधित पाहिजे असलेले गुन्हेगार मिळुन येतात असे का होते, वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे तपासून पाहणे आवश्यक आहे.

काल दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार प्रविण उर्फ घाऱ्या चंद्रकांत खांबे, कृष्णकुमार चांदणे आदि गुन्हेगारांना पोलीसांनी शिताफीने पकडले असल्याचे वृत्त पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील प्रसारमाध्यम विभागाकडून देण्यात आले आहे. याबाबत इतर पोलीसांनी याबाबत शंका उपस्थित करून नवीनच  मुद्दा समोर आला आहे. दरम्यान गुन्हे युनिट क्र. 2 आणि दत्तवाडी पोलीस स्टेशन हे अव्वल दर्जाचे असुन, इतर पोलीस स्टेशनचे पोलीस काहीच काम करीत नाहीत असाच त्यातून सुर दिसून येत असल्याची चर्चा आहे. याच दोन विभागांना पेट्रोलिंग करतांना गुन्हेगार कसे आढळुन येतात याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालयाने याची योग्य ती पाहणी करावी असे मत काही पोलीसांनी व्यक्त केले आहे.