Friday, January 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर यांचे पालखी सोहळयात श्रध्देने आलेल्या भाविकांचे दागिने चोरणारी टोळी गुन्हेशाखा यनिट -6 ने केली जेरबंद

पुणे/दि/ प्रतिनिधी/
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर यांचे पालखी सोहळयात श्रध्देने आलेल्या भाविकांचे दागिने चोरणारी टोळी विरूद्ध विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं 173/2022.भा.द.वि . कलम 392, 34 प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करित असताना युनिट 6 कडील अधिकारी व अंमलदार यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पुण्यातुन श्री क्षेत्र पंढरपुरकडे जात असताना पालखी मार्गावर तसेच विसावा ठिकाणी दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात त्यामुळे तेथे झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेवुन लोकांचे गळयातील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरणारे इसम नामे 1 ) शंकर पवार 2 ) महेंद्र अरगडे हे आळंदी पुणे रोडवर थांबलेले आहेत, अशी बातमी मिळताच युनिट 6 चे पथकाने लगेच सापळा लावुन त्यांना ताब्यात घेतले.

1 ) शंकर शिवाजी पवार वय -23 वर्षे रा - पाथर्डी अहमदनगर 2 ) महेंद्र सुरेश अरगडे वय 26 वर्षे रा- पाथर्डी अहमदनगर असल्याचे तपासात आढळुन आले. तेव्हा त्यांच्याकडे  कसुन तपास करता त्यांनी त्यांचे सहकारी नामे 3 ) नितीन छगन काकडे वय -22 वर्षे , रा . पाथर्डी अहमदनगर असे मिळुन देहु आळंदी व पुणे परिसरात संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पंढरपुरकडे जाणाऱ्या पालखी मार्गावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत त्यांचे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरलेले आहेत व ते चोरलेले दागिने इसम नामे
तसेच  4 ) प्रशांत छगन टाक वय -26 वर्षे , रा - पाथर्डी अहमदनगर यांस विकलेले आहेत, अशी कबुली दिल्याने युनिट 6 च्या पथकाने चोरीचे दागिने विकत घेणारा आरोपी नामे प्रशांत टाक यास ताब्यात घेवून त्याचे कडुन चोरीचे एकुन 24 तोळे वजनाचे 12,24,000 / - रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करून त्यास नमुद गुन्हयात अटक करुन गुन्हयात भा.द.वि. कलम 411 हे कलम वाढ केले आहे.
 तसेच अटक आरोपींचे 1,30,000 / - रुपये किंमतीचे महागडे 2 मोबाईल जप्त केलेले आहेत , अटक आरोपीकडुन पुणे शहरात व पिंपरी चिंचवड परिसरात 16 चैन जबरी चोरीचे गुन्हे व 2 चैन चोरीचे गुन्हे असे एकुण 18 गुन्हे उघडकिस आलेले आहेत. 
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा . पोलीस आयुक्त श्री . अभिताभ गुप्ता पुणे शहर . मा . पोलीस सह आयुक्त श्री.संदीप कर्णिक , मा . अपर पोलीस आयुक्त गुन्हे , श्री . रामनाथ पोकळे , मा . पोलीस उप - आयुक्त गुन्हे शाखा , श्री . श्रीनिवास घाडगे , मा . सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे -2 . 

श्री . नारायण शिरगांवकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , गुन्हे शाखा युनिट 6.श्री . गणेश माने , पोलिस उप निरीक्षक भैरवनाथ शेळके , पोलीस अंमलदार वाळके , विठठल खेडकर , रमेश मेमाने , कानिफनाथ सकटे प्रतिक मच्छिंद्र कारखेले , बाळासाहेब लाहीगुडे , ऋषिकेश ताकवणे , सचिन पवार , ऋषिकेश व्यवहारे , ऋषिकेश टिळेकर , शेखर काटे अश्पाक मुलाणी , ज्योती काळे , सुहास तांबेकर यांनी केली आहे .