Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

महाराष्ट्र शासनाचा महसुल बुडवून सरकारची फसवणूक करणाऱ्या कोंढवा येथील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचे छापे

Gambling den at Kondhwa police

सुमारे रु. 4.44 लाखाचे मुद्देमालासह, एकुण 27 आरोपींविरुद्ध कारवाई
पुणे/दि/ प्रतिनिधी/
सरकारमान्य लॉटरी सेंटरच्या नावाखाली एक आकडी मटका व ऑनलाईन ॲपद्वारे व पांढऱ्या प्लास्टिक पेपर शीटवर जुगार खेळण्यात येतो. खेळींनी लावलेला आकडा एका पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पेपरवर लिहला जातो. तो नंबर लक्षात ठेवण्यासाठी खेळी हा त्याचा मोबाईल मध्ये फोटो काढून घेतो व काही क्षणातच या जुगाराचा ऑनलाईन निकाल लागतो. या ऑनलाईन जुगार प्रकारात जुगार अड्डा मालक, चालक, बुकीज, ॲपचा मालक व चालक यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून, कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे न वापरता संगणकावर ऑनलाईन व्यवहार करुन शासन महसूल बुडवून, राज्य सरकारची देखील फसवणूक केल्याचा प्रकार कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या छापेमारी कारवाईत आढळुन आले आहे. या सर्व प्रकरणांचा बारकाईने तपास सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी केला आहे. साडेचार लाखाच्या मुद्देमालासह सुमारे 27 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजरोसपणे, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या जुगार अड्डयाची पोलखोल श्री. राजेश पुराणिक यांनी केली आहे.

कोंढवा पोलीस स्टेशन येथील अवैध  मटक्याच्या ऑनलाईन धंद्याबाबत मिळालेल्या बातमीनुसार, कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, खडी मशिन ते कोंढवा रोड दरम्यानचे परीसरात, रीलायन्स मॉलजवळ, सोमाजी बस स्टॉप समोर असलेल्या शिवगंगा कॉम्प्लेक्स, सर्व्हे क्र. 12/2/4/3, कोंढवा बुद्रुक, पुणे 411048 येथील तळमजल्यावरील शॉपींग सेंटरच्या लाईनीत 1) जय हनुमान व्हिडिओ व श्री साई लॉटरी सेंटर, 2) स्वस्तिक लॉटरी सेंटर, तसेच सदर इमारतीस लागुन असलेल्या शिव कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तळमजल्यावरील  जय हनुमान व्हिडिओ व श्री साई लॉटरी सेंटर अशा एकूण तीन  दुकानात व दुकानाबाहेर सार्वजनिक रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनात सुरू असलेल्या ऑनलाइन मटका व इतर प्रकारचे जुगार, पैशावर गैरकायदेशीररीत्या खेळत व खेळवत असलेचे समजलेने, पंच व पोलीस पथकासह जाऊन, सदर ठिकाणी 20. 30 वा. चे सुमारास छापा टाकून, मोबाईल व संगणकाचा वापर करुन ऑनलाईन मटका व इतर जुगार वगैरे खेळणारे, खेळवणारे  व पाहीजे आरोपी असे एकुण 27 इसमांविरुद्ध कलम 420, सह कलम 120 (ब) भा. दं. वि. सह कलम 4 (अ), 5 व 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा तसेच सह कलम 66 (सी) व (डी) इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट अन्वये कोंढवा पोलीस ठाणे येथे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या  ठिकाणी ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स व खेळी अशा अटक/कारवाई केलेल्या आरोपीत इसमांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

अ) दुकान क्र.1, जय हनुमान व्हिडिओ व श्री साई लॉटरी सेंटर, शिवगंगा कॉम्प्लेक्स.
1) संजू रामचंद्र केसरवाणी, वय 39
2) अजय श्रीनाथ गुप्ता, वय 39 वर्षे, धंदा – मटका जुगार रायटर,
3) रवी विमल पटेल, वय 29 वर्षे, धंदा – मटका जुगार रायटर,
4) सरोजकुमार संकराप्रसाद यादव (खेळी), वय 25 वर्षे, धंदा – नोकरी,
5) उनुस दावलसाब शेख (खेळी), वय 38 वर्षे,
6) फिरोज हुसेन शेख (खेळी), वय 42 वर्षे, धंदा – नोकरी, रा. ठी. 42, ग्रीन पार्क, कोंढवा, पुणे.
ब ) दुकान क्र. 2, स्वस्तिक ऑनलाईन लॉटरी सेंटर, शिवगंगा कॉम्प्लेक्स.
7) आयुष विलास वारे, वय 23 वर्षे, धंदा – मटका जुगार रायटर, रा.ठी. मालवाडी, हडपसर, पुणे.
8) सागर बाळू थोरवे (खेळी), वय 30 वर्षे,
9) सलीम मैनूद्दीन शेख (खेळी), वय 25 वर्षे,
10) रमेश पांडू विसलावत (खेळी), वय 33 वर्षे,
क) दुकान क्रमांक 3, जय हनुमान व्हिडिओ व श्री साई लॉटरी सेंटर, शिव कॉम्प्लेक्स.
11) आदित्य आनंद कुचेकर, वय 20 वर्षे, धंदा – जुगार मटका रायटर,
12) मोहित घनश्यामदास केसरवानी, वय 25 वर्षे, धंदा मटका जुगार रायटर,
13) राम महादेव दोडमनी (खेळी), वय 36 वर्षे, धंदा – सिक्युरिटी गार्ड, रा. ठी. स. नं. 55, रोनक बिल्डिंग, फ्लॅट नंबर 18, कोंढवा, पुणे.
ड) सार्वजनिक रस्त्यावर मोटारसायकलवर जुगार खेळणारे.
14) सुनील ताराचंद केसरवाणी, वय 42 वर्षे, धंदा – मटका जुगार राईटर, रा.ठी. जिजामाता निवास, कोंढवा खुर्द, पुणे.
15) सैपन अप्पालाल बोरेवाले (खेळी), वय 30 वर्षे, धंदा – हेल्पर, रा. ठी.अश्रफनगर, गल्ली नंबर 5, कोंढवा, पुणे.
16) मनोजकुमार संकटप्रसाद यादव (खेळी), वय 27 वर्षे, रा.ठी. जिजामाता निवास, कोंढवा खुर्द, पुणे.
(ई) घटनास्थळावरुन पळून गेलेले पाहीजे आरोपींची नावे
17) संजय रामरुप केसरवानी, वय 45 वर्षे, धंदा – जय हनुमान व्हिडिओ व श्री साई लॉटरी सेंटर या नावाचे दोन दुकानांचा मालक, रा.ठी. सर्व्हे क्र. 11, लेकटाऊन हौसिंग सोसायटी, इमारत क्र. बी – 7, फ्लॅट क्र. 502, कात्रज, पुणे.
18) विलास शेरला, वय 50 वर्षे, धंदा – स्वस्तिक ऑनलाईन लॉटरी सेंटरचा मालक.रा.ठी. कात्रज,
19) रॉयल 100 व धनलक्ष्मी या ऑनलाईन लॉटरी ॲपचे मालक/चालक
20 ते 27) दुकान नंबर 1, 2 व 3 मधून व सार्वजनिक रस्त्यावरील वाहनातून पळून गेलेले एकुण 8 अनोळखी रायटर्स व खेळी, नांव व पत्ता माहित नाही.
सदर अटक/कारवाई करण्यात आलेल्या आरोपीत इसमांकडून, (जुगार अड्डा मालक, रायटर, खेळी व पाहीजे असलेले अनोळखी इसम (पळून गेलेले ) असे एकुण 27 आरोपी) यांचेकडून व घटनास्थळावरुन एकुण रु.4,44, 100/- रु.चा मुद्देमाल (त्यामध्ये रोख रु. 29, 700/- , तसेच रु. 1,07,000/- किंमतीचे 17 मोबाईल सेट्स व रु. 2, 67,400/- रु चे जुगाराचे साहित्य), रु. 40, 000/- किंमतीच्या 2 मोटार सायकल्स असा हस्तगत करण्यात आला आहे.
सदर अटक/कारवाई केलेल्या आरोपी विरुद्ध कोंढवा पोलिस स्टेशन येथे गु. र. क्र. 763/22, कलम 420 सह 120 (ब) भा.दं.वि. सह कलम 4(अ), 5, 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा तसेच सह कलम इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट कलम 66 (क) व 66 (ड) अ्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खडी मशिन ते कोंढवा रोड दरम्यानचे परीसरात, रीलायन्स मॉलजवळ, सोमाजी बस स्टॉप समोर असलेल्या शिवगंगा कॉम्प्लेक्स, सर्व्हे क्र. 12/2/4/3, कोंढवा बुद्रुक, पुणे 411048 येथील तळमजल्यावरील शॉपींग सेंटरच्या लाईनीत 1) जय हनुमान व श्री साई लॉटरी सेंटर, 2) स्वस्तिक लॉटरी सेंटर व सदर इमारतीस लागूनच असलेल्या शिव कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या जय हनुमान व श्री साई लॉटरी सेंटर
या नावाने हे ऑनलाइन लॉटरीच्या नावाने सर्रासपणे हे जुगार अड्डे सुरू करण्यात आलेले होते.
दरम्यान जुगाराचे अड्डे हे नागरी वसाहतीत उच्चभ्रू परीसरातील दुकानात असून, दुकानाबाहेर मोठे पडदे टाकलेले असल्याने, बाहेरच्या रस्त्यावरुन बघीतले तर सर्व साधारण माणसाला ओळखू न येणारे असे आहेत.
तसेच जुगार अड्ड्यांचे मुख्य प्रवेशद्वारांवर जाड कापडाचे गडद रंगाचे पडदे लावलेले असून, त्यामुळे आत लाईट सुरू असला अथवा कितीही गर्दी झाली तरीही, बाहेरच्या व्यक्तीस आतले काहीच दिसत नाही किंवा ऐकू येत नाही. या जुगार अड्ड्याचे दुकानाबाहेर व आसपास या जुगार अड्ड्यावरचे शुटर्स (इंन्फॉर्मर्स) बसलेले असतात. ते बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीबाबत आतल्या व्यक्तीस मोबाईलवरुन माहिती पुरवत असत. पोलीस येणार असल्याची माहिती मिळाल्यास सर्व जुगारींना पळवून लावले जाते. बाहेरच्या रस्त्यावर सतत प्रचंड वाहतूक असल्याने या जुगार अड्ड्याकडे खेळणारे सोडले तर इतरांचे सहसा लक्ष जात नाही.
कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्ड्यावरील कारवाई श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्री. श्रीनिवास घाटगे, मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनखाली,
सामाजिक सुरक्षा विभागाकडील व.पो.नि. राजेश पुराणिक, म.पो.ह. मोहिते, म.पो.ह. शिंदे, पो.ह. कुमावत, पो.ह. कर्पे, पो.ना. पठाण, पो.ना. कांबळे, पो.ना. मोहीते, पो.शि. जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.
विशेष म्हणजे माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशानुसार सदर कारवाईत परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक यांचे एक पथकही सहभागी झाले होते.