
पुणे/दि/ नॅशनल फोरम/
अमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी असे वानवडी पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दोन इसम लुल्लानगर येथील कलश प्युअर व्हेज हॉटेल समोरील सार्वजनिक रोडवर संशयितरीत्या मिळुन आल्याने, पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी सराईत इसमांना ताब्यात घेतले असता इसम नामे मतीन हुसेन मेमन वय 21 वर्षे रा. स.नं.42 कोंढवा, पुणे 2. शाहरूख कादीर खान वय 22 वर्षे, रा. फ्लॅट नं. 302. सी-विंग युनिटी पार्क, कोंढवा, पुणे यांपैकी इसम नामे तीन हुसेन मेमन त्याचे ताब्यात कि.रु. 1 लाख 52 हजार 100/- रु किमतीचा 10 ग्रॅम 140 मिलीग्रॅम एम.डी. हा अमली पदार्थ व शाहरुख कादीर खान याचे ताब्यात 1लाख 51 हजार 800/- रु किचा 10 ग्रॅम 120 मिलीग्रॅम एम. डी. हा अंमली पदार्थ व एक मोबाईल फोन 10,000/- रु किची एक दुचाकी मोटार सायकल कि.रु. 50,000/- अत्ता एकूण 3,63,900/- रु किचा ऐवज अनाधिकाराने बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.
तसेच सदरचा एम. डी. हा अंमली पदार्थ त्यांनी इसम नामे अनमोलसिंग मनचंदा सिंग, वय-33 वर्षे रा विंग. ए-406, साई व्दाराकायम सोसायटी, एनआयबीएम रोड पुणे याचेकडुन विक्रीकरीता आणला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन इसम नामे 1 मतीन हुसेन मेमन. 2 शाहरुख कादीर खान 3. अनमोलसिंग मनचंदासिंग यांचेविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 431 / 2022. एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 (क). 22 (च), 29 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.