Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे अनाधिकृत फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई

नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/
पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील मुंबई बेंगलोर महामार्गावर गेले अनेक दिवस नागरिकांना पथारी व्यावसायिकांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होत्या. परंतु संबंधित व्यवसाय धारक हे खाजगी जागेत असल्याचे भासऊन अनधिकृतरित्या महामार्गावर व्यवसाय करीत असल्याचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांनी निदर्शनास आणून दिल्याने त्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली.

या धडक कारवाईत साधारण 06 बिगर टप हातगाडी, 1 लोखंडी काउंटर, 14 मोठे टायर, 2 टेंथ, 1 वजन काटा, 6 कॅरेट फळ पथारी, 1 गॉगल स्टॅन्ड, 25 टेडी, 20 चादरी,  5 गाद्या व 40 रजया  जप्त करण्यात आल्या व 5 कच्चे शेड पाडून टाकण्यात आले.
 सदर ठिकाणी व्यावसायिकांनी कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात विरोध केला, परंतु विरोधाला न जुमानता ही करावाई चालू ठेवली. वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयातील नवनियुक्त अतिक्रमण निरीक्षक श्री. अजय गोळे यांनी मुख्य रस्त्यांच्या साईड मार्जिन मध्ये असलेल्या अनधिकृत स्टॉल धारकांवर धडक कारवाई चालू केली. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक आयुब शेख यांनी कारवाई साठी सहकार्य केले.

कारवाई मध्ये 3 ट्रक व 25 बिगारी सेवक यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली-
अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली , महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल, अतिक्रमण निरीक्षक, अजय गोळे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, श्रीमती किरण डवरी यांनी यशस्वीरित्या कारवाई पार पाडली.

श्री. अजय गोळे, सहा.अतिक्रमण निरीक्षक यांचे आवाहन-
श्री अजय गोळे यांनी अनधिकृत व्यवसाय धारकांना आव्हान केले आहे की, रस्त्याच्या बाजूला असलेल्या सोसायटीच्या साईड मार्जिन मध्ये केलेल्या अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल आपण होऊन काढून घ्या अन्यथा येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे. रस्ता व पदपथावर सुद्धा कोणीही अतिक्रमण करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आवाहन श्री. गोळे यांनी केले आहे.