Friday, November 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

उद्या मतमोजणी, कलम 144 लागु, वाहतुकीत देखील बदल

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची मतमोजणी उदया गुरूवार दि. 2 मार्च रोजी होत आहे. त्यामुळे पुणे शहर पोलीसांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम 144 प्रमाणे आदेश लागु केले आहेत. तसेच वाहतुक विभागाने देखील कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूक मतमोजणी ही साऊथ मेन रोडवरील धान्य गोडावुन, कोरेगाव पार्क, पुणे येथे असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकाची गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होऊ नये तसेच निवडणूक मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी तसेच वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे चालण्यासाठी वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

कलम 144 लागु – कसबा विधानसभा पोटनिवडणूकीची मतमोजणी कोरेगाव पार्क येथे होणार असल्याने मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे प शांततेत पार पडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक उपद्रव टाळण्यासाठी एफ. सी. आय. गोडाऊन, कोरेगाव पार्क पुणे येथील 200 मीटर परिसरात मतमोजणी सुरू झाल्यापासून ते प्र्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच खालील प्रमाणे आदेश लागु करण्यात आले आहेत.

1) मतमोजणीच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे अधिकृत अनाधिकृत हत्यारे तसेच परवान्यावरील, कोणत्याही प्रकारची हत्यारे घेवुन फिरणेस या आदेशान्वये मनाई करीत आहे. सदरचा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचा-याला (पोलीस दल, संरक्षण दल, तुरंग विभाग, बैंक सुरक्षा विभाग व इतर केंद्रीय तसेच राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना) लागु राहणार नाही. तसेच ज्या परवानाधारकास रुढीप्रमाणे बंदूक प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे. त्यांना हा आदेश लागू राहणार नाही.

2) मतमोजणीच्या परिसरात मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर वापरण्यास अगर घेवून येण्यास मनाई करण्यात येत आहे. (कर्तव्यावर असणा-या शासकिय अधिकारी/कर्मचारी यांना हा आदेश लागू राहणार नाही)

3) मतमोजणीच्या परिसरात खाजगी इसमांना ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे.

4) मतमोजणीच्या परिसरात कोणताही मजकुर लिहीण्यास अगर छापील मजकूर प्रदर्शित करण्यास मनाई करण्यात येत आहे.

5) मतमोजणीच्या परिसरात शासकीय वाहने सोडून कोणत्याही प्रकारचे वाहन आत नेण्यास मनाई करण्यात येत आहे.

6) मतमोजणीच्या परिसरात वैध पासशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.

(7) मतमोजणीचा निकाल जाहिर झाल्यानंतर दि.02/03/2023 रोजी विजय मिरवणुका काढण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे.
दरम्यान या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.वि. कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील. असे सहपोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी आदेश जारी केले आहेत.

कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूक मतमोजणी असल्याने साऊथ मेन रोडवरील धान्य गोडावून, कोरेगाव पार्क पुणे परिसरातील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबत

कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूक मतमोजणी ही साऊथ मेन रोडवरील धान्य गोडावुन, कोरेगाव पार्क, पुणे येथे असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकाची गर्दी होणार आहे. त्यामुळे नागरिकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होऊ नये तसेच निवडणूक मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सदर ठिकाणी वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे चालण्यासाठी खालील प्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे.
परिसरातील वाहतूक दिनांक 01/03/2023 रोजी सकाळी 11/00वा ते दिनांक 02/03/2023 रोजी मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत आवश्यकतेनुसार तात्पुरती खालीलप्रमाणे वाहतुकीस बंद रस्ते व वाहतुक वळविण्या बाबत तसेच नो व्हेईकल झोन बाबतचे आदेश निर्गमित करीत आहे.
1) सेंट मिरा कॉलेज व अतुर पार्क सोसायटीकडुन साऊथ मेन रोडकडे येणा-या वाहनांना लेन नं. 1 पर्यंत प्रवेश देण्यात येईल. लेन नं. 1 येथे डावीकडे वळुन इच्छीत स्थळी जावे याठिकाणी बॅरिकेटींग करण्यात येईल.
2) साऊथ मेन रोड लेन नं. 5, 6 व 7 कडुन साऊथ मेन रोडवर येणा-या वाहनांना लेन नं. 4ङ्गङ्गपर्यंतच प्रवेश देण्यात येईल लेन नं. 4 येथे उजवीकडे वळुन इच्छीत स्थळी जावे.
3) आवश्यकते प्रमाणे सेंट मिरा कॉलेज समोर, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन समोर व साऊथ मेनङ्गङ्गरोड लेन नं. 5 येथे बॅरिकेटींग करण्यात येईल.
4) साऊथ मेन रोड लेन नं. 2 येथे प्लॉट नं. 38 जैन प्रॉपर्टी समोर बॅरिकेटींग करून सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ मेन रोडकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.
5) साऊथ मेन रोड लेन नं. 3 येथे बंगला नं. 67 व 68 या दरम्यान बॅरिकेटींग करून सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ मेन रोडकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.
6) दरोडे पथ (कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन) ते लेन नं. 5 साऊथ मेन रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजुस दिनाक 01/03/2023 रोजी सकाळी 11/00 वा ते दि.02/03/2023 रोजी मतमोजणी प्रक्रीया पुर्ण होई पर्यंत नो व्हेईकल झोन करण्यात येत आहे.
7) वाहनपार्कींग ठिकाणे- 1. मतमोजणी प्रक्रियेशी सबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दुचाकी वाहनांचे पार्कींग संत गाडगे महाराज शाळेच्या आवारात करावी 2. मतमोजणी करता येणारे उमेदवार, त्यांचे प्रतीनिधी व इतर नागरिक यांच्या सर्व प्रकारच्या वाहनांना संत गाडगे महाराज शाळेच्या आवारात पार्कंग करावे. तरी वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून होणारी गैरसोय टाळावी व पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगरे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.