Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बुधवार पेठेतील देशद्रोही कारवायात फरासखाना पोलीसांचे योगदान?
जुगार-चमडीचा पैसा- पोलीस व सावकारांमार्फत बांधकाम उद्योगात….?

बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, थायलंड मधील बंधकांना भारतीय आधार कार्ड, पॅनकार्ड..?

पुणे/दि/ प्रतिनिधी/
राजकारणी आणि सत्ताधारी पक्षांच्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवकारांच्या बातम्या नित्याच्याच झाल्या आहेत. आता आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या देखिल रोज येत आहेत.हे कशामुळे झाले…. पुण्याच्या तत्कालिन पोलीस आयुक्त रश्मीबाई शुक्ला या सत्ताधारी पक्षासाठी कशा खबरेगिरी करीत होत्या हे आता सिद्ध झालं आहे. झारखंड या गरीब राज्यातील एक महिला अधिकारी पुजा सिंघल यांची 300 कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली आहे. परमबिरसिंग, सत्यपालसिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आणि नंतर राज्याचे पोलीस महासंचालक पदावरील व्यक्ती कुणासाठी काम करीत होते हे आता सर्व जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे.

  • त्यांना नाव पत्ता विचारा, ते सध्या कुठे राहत आहेत हे देखील माहिती नाही, आई वडीलांचे नाव… एवढंच काय …. पुण्यातील सारसबाग, पर्वती कुठे आहे…. धानोरी- धनकवडी कोणत्या दिशेला आहेत… काही म्हणजे काहीच माहिती नाही…. तरीही त्यांच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र…सेक्स वर्कर असल्याचे ओळखपत्र…. ड्रायव्हींग लायसन….
    एवढे सगळे डॉक्युमेंट आहेत…. ?
    ** कारवाई कोण करणार….? सगळेच भ्रष्ट …? कोणत्याही गुन्हे युनिटकडे जा…. सगळ्यांच माहिती आहे….
    *** जुगाराचा 24 तास दणदणाट…. गांजा- एमडीचा धुराळा….गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रस्ते, ना… रस्ते…
    आणि भिंतीही रंगलेल्या… क्रांतीवीर पोलीसांची हजेरी निव्वळ नावालाच…. दालगोश आणि बिर्याणीपुरती….
    *** एक चहावाला … पुढे जाऊन पंटर…. मग… सावकारी वसुली….. आता थैटच…. खाजगी सावकार… आंतरराज्य दलाल….?
  • आयएएस आणि आयपीएस मंडळी रातोरात सात पिढ्यांना पुरेल एवढं घबाड कसे मिळवित आहेत हे पाहिल्यानंतर, देशविघातक कारवाया करणाऱ्यांना, देशाचे दरवाजे कसे खुले केले आहेत हे दिसून येत आहे. त्यातूनच एवढी मोठी कमाई होत आहे. पुण्या- मुंबईतील जागेचे भाव कसे वाढले…. एका फ्लॅटची किंमत पाच लाख रुपयांवरून 50 लाख रुपये कशी झाली…. शिपाई पदाची भरती… मग ती राज्य सरकारमधील असो की, महापालिका किंवा पोलीस खात्यातील…. पाच लाखाचा दर ठरलेला आहे..
    क्लार्क पदासाठी आता 15 लाख रुपये मोजावे लागत आहेत…. नोकरीत आल्यानंतर पोस्टींगसाठी वेगळे दर द्यावे लागत आहेत. एवढंच कशाला पोलीस स्टेशन किंवा पोलीस चौकीमधील दरही निश्चित केले आहेत. सगळीकडे भ्रष्टाचार आणि दलदल माजली आहे… मेरिटच्या गप्पा मारणाऱ्यांनी पोस्टींगचा धंदा सुरू केला.
    आरक्षण हे नामशेष केले आहे. संविधानाचा अंमल नावाला राहिला आहे. आता हेच संस्थानिक झाले आहेत. त्यामुळे जनतेने उठाव करणे गरजेचे झाले आहे. (पान 3 सह क्रमशः)