Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

काँग्रेस,भाजपा, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेससह मनसे या पक्षाकडून पुण्यातील वृत्तपत्रे व टिव्ही चॅनेलला कोट्यवधी रुपयांच्या जाहीराती, यांचे उमेदवारही कोट्याधीश-अब्जाधीश…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण-
पुण्यातील नामांकित असलेल्या सकाळ, लोकमत, लोकसत्ता, सामना या बिग बजेट वृत्तपत्रांमध्ये काँग्रेस, भाजपा, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच्यासह राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षांने कोट्यवधी रुपयांच्या जाहीराती दिल्या असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणूकीची रंगत वाढत चालली आहे. त्यात टिव्ही चॅनेलवर दर दोन पाच मिनटांनी ह्याच पक्षांच्या जाहीराती सुरू आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या राज्यातील सर्वच मोठ्या वृत्तपत्रांमध्ये व टिव्ही चॅनेलवर जाहीराती सुरू आहेत. त्यातच वृत्तपत्रांच्या ऑनलाईन न्युजवर देखील याच राजकीय पक्षांच्या जाहीराती सुरू आहेत. बहुतांश यु-ट्युब वरील एंटरटेन्मेंट व बातम्यां मध्ये ह्यांच्या जाहीरातील सुरू आहेत. ह्या जाहीराती फुकट दिल्या जात नाहीत. जाहीरात हे टिव्ही चॅनेल, वृत्तपत्रे, युट्युब चॅनेल यांचे आर्थिक साधन आहे. त्यातच मोठ्या वृत्तपत्रांचे जाहीरात दरही मोठे आहेत. त्यातच पहिल्या पानांवर, सेकंड पहिल्या पानांवर किंवा शेवटच्या पानांवर जाहीरात लावायची असल्यास त्यासाठी जास्तीचा दर दयावा लागतो. हे जास्तीचे दर देवून प्रस्थापित पक्षांचे निवडणूकीत कॅम्पेन सुरू आहे. अर्थात मार्केटींग सुरू आहे. दरम्यान पुण्यासारख्या शहरातील पाच सहा मोठ्या वृत्तपत्रांत कोट्यवधी रुपयांच्या जाहीराती प्रसारित होत आहेत. तर राज्यातील 35/36 जिल्ह्यांतील मोठ मोठ्या वृत्तपत्रांत देखील ह्याच जाहीराती सुरू आहेत. या वृत्तपत्रांना व टिव्ही चॅनेलला जाहीरात देण्यासाठी कोट्यवधी रुपये या पक्षांकडे नक्की
येतात तरी कुठून… कोट्यवधी, अब्जावधी रुपयांचे फंडीत होते तरी कुठून हा अती गोपनिय प्रश्न सध्या मतदारांना पडला आहे.

वृत्तपत्रांत मोठ मोठ्या जाहीराती, खाजगी टिव्ही चॅनेलवर देखील सेकंदा सेकंदाला जाहीराती- एवढे मार्केटींग कशासाठी –
पुणे शहरासह संपूर्ण राज्यातील मोठ मोठ्या वृत्तपत्रांत महायुती व महाविकास आघाडीच्या जाहीराती सुरू आहेत. त्यातच या आघाडी युतीतील घटक पक्षही स्वतंत्रपणे जाहीराती करीत आहेत. टिव्ही चॅनेलवर देखील सेकंदा सेंकदाला जाहीराती सुरू आहेत. हा निवडणूकीचा प्रचार आहे हे खरेच आहे. परंतु जाहीराती देण्यासाठी एवढे कोट्यवधी रुपये, अब्जावधी रुपये या पक्षांकडे येतात तरी कुठून हा प्रश्न निर्माण होत असतांनाच, एवढी मार्केटींग कशासाठी… हा प्रश्नही निर्माण होत आहे.

ह्या प्रस्थापित पक्षांना काहीही करून सत्ता त्यांच्याच हातात पाहिजे, आमदारकी घराणेशाहीच्या बाहेर जाता कामा नये, दुसरा कुणी आमदार म्हणून निवडूण आला तर मागील 25 वर्षांचा हिशोब मागेल. सगळ्या फाईल्स बाहेर येतील. सहकारी बँका, सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्था, मेडिकल कॉलेज, हॉस्पीटल्स, मधील भ्रष्टाचार बाहेर येतील. आमदार फंडातील गैरव्यवहार बाहेर येतील. त्यामुळे प्रस्थापित पक्ष असलेले काँग्रेस,भाजपा, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस मधीलच कुणीही निवडूण आले तरी आमदारकी घर परिवारातच राहणार आहे. याच पक्षातील सगे सोयरे एकमेकांचे नातेवाईक आहेत. जर वंचित किंवा बहुजन समाजातील उमेदवार, आमदार झाला तर चौकशी होवू शकते. त्यामुळे काहीही करून सत्ता यांच्याच घरात ठेवायची असल्याने वरील सर्व आटापीटा, मार्केटींग सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

प्रस्थापित पक्षांचे उमेदवारही कोट्यवधी- अब्जाधीश-
प्रस्थापित पक्ष असलेले काँग्रेस, भाजपा, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ह्या पक्षांच्या उमेदवारांनी त्यांच्या अधिकृत संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. तसेच त्यांच्यवरील गुन्हे, कोर्ट खटले यांचीही माहिती निवडणूक आयोगाकडे शपथपत्राव्दारे सादर केली आहे. या सर्व प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांनी संपत्तीची दिलेली आकडेवारी कोट्यवधी व अब्जावधी रुपयांची आहे. त्यामुळे हे उमेदवार लोकसेवक आहेत की, व्यापारी, उद्योगपत्ती आहेत त्याचाच बोध होत नाही. त्यामुळे अशा व्यापारी वृत्तीचे उमेदवारांनी मागील 25 वर्षात काय केले हे आपण पाहिले आहेच. त्यामुळे पुढील 5 वर्षात तरी काय करणार हे त्यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवरून समजुन घ्यायला पाहिजे. सत्ता केवळ यांच्याच घरात पाहिजे. महायुती असो की महाविकास आघाडीतील घटक पक्ष…. हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे कुणीजरी निवडूण आले तरी सत्ता ही त्यांच्याच घर परिवारात राहणार आहे एवढे नक्की.

वंचित बहुजन आघाडीला वृत्तपत्रांनी अस्पृश्य ठरविले-
वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण राज्यात 288 पैकी 200 ठिकाणी उमेदवार उभे केले आहे. त्यात 50 ठिकाणी मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली आहे. ओबीसी मधील 450 जाहीपैकी मायक्रो ओबीसींना 100 ठिकाणी उमेदवारी दिली आहे, तर एससी, एसटींना देखील पुरेशा प्रमाणात जागा दिल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मोठ्या वृत्तपत्रांत सर्वच पक्षांना समान संधी दयावी असे धोरण आहे. परंतु मोठ्या वृत्तपत्रांतून वंचित बहुजन आघाडीच्या बातम्या देखील प्रसारित केल्या जात नाहीत. याबाबत वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रे व टिव्ही चॅनेल यांना एक खुले पत्र प्रसारित केले आहे. ते वंचितच्या एक्स हँडलवर झळकत आहे.
त्यात वंचितने नमूद केले आहे की, मोठ्या वृत्तपत्रांनी आमच्या बातम्या देत असतांना दुजाभाव दाखविणे योग्य ठरत नाही. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सर्वच पक्षांच्या समान बातम्या प्रसारित करण्याचे निर्देश आहेत. तथापी मोठ्या वृत्तपत्रांत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या बातम्या प्रसारित करीत नसल्याबाबत त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
वरील सर्वच पक्ष प्रस्थापित आहेत. त्यांचे पक्षही कोट्यधीश आहेत, तर त्यांचे उमेदवारही कोट्यधीश आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांना आता विचार करण्याची वेळ आली आहे. आपले नेमकं कोण आहे हे शोधण्याची वेळ आली आहे. ओबीसींचे आरक्षणत धोक्यात असले तरी एससी व एसटीचे आरक्षण देखील आता धोक्यात आले आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर हाच एकमेव पर्याय आहे एवढं मात्र नक्की.