Friday, January 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतून जुगार मटका अड्डयांचा सुफडा-साफ

शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतून जुगार मटका अड्डयांचा सुफडा-साफ

पोलीस आयुक्तांनी मनांत आणलं तर काय होऊ शकते हे आज दिसून आले.
शिवाजीनगर पोलीस ः 7 ऑक्टोंबर हा दिवस -जुगार अड्डा मुक्त दिन

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
सामाजिक सुरक्षा विभागाचे तत्कालिन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी पुणे शहरातील अवैध व बेकायदेशिर मटका, जुगार अड्डे, वेश्याव्यवसाय करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करून, संपूर्ण पुणे शहरातून अवैध व बेकायदा धंदयांचे निर्मूलन अवघ्या सहा महिन्यांच्या अवधीत करून दाखविले होते. त्यांच्या सुडबुद्धीने केलेल्या बदलीनंतर, दुसऱ्याच दिवसांपासून पुणे शहरात अवैध धंदेवाल्यांनी दिवाळी साजरी करून, पुनः नव्याने मटका, जुगार अड्डे सुरू केले होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत देखील 2 ऑक्टोंबर पासून मटका जुगार अड्डयांसह वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांनी भरारी घेतली. ऑनलाईन लॉटरी मटका जुगार अड्डेवाल्यांनी तर महापालिकेच्या बाहेरील बाजुस थांबुन लॉटरीचा बाजार मांडला होता. त्यामुळेच पोलीस यंत्रणांचा दिवस-रात्र पाठपुरावा केल्यानंतर, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा आज दि. 7 ऑक्टोंबर 2022 चा संपूर्ण दिवस हा, जुगार मुक्त दिवस म्हणून गणला गेला असल्याचे दिसून आले आहे.

मागील चार दिवसांपासून पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून, अवैध धंदे ज्या ठिकाणी सुरू आहेत, त्याबाबतच्या गुन्ह्याची खबर सातत्याने देत असतांनाच, शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी मागील चार दिवसांत, निव्वळ लुटूपुटूची कारवाई केली. दरम्यान काल गुरूवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भैय्यावाडीतील जुगार अड्डा चालकांनी जुगार सुरू झाल्याचा भोंगा वाजविला. थोडक्यात जुन्या काळात, तंबुतील तमाशा सुरू होण्याच्या अगोदर, ढोलकी आणि कडाकण्यांचा कडकडाट जसा होत होता, अगदी तशाच स्वरूपाचा थयथयाट भैय्यवाडीत आढळुन आला. 

रात्रौ साडेअकारापर्यंत नियंत्रण कक्ष आणि वरीष्ठ पोलीसांबरोबर ई मेल, व्हॉटसॲपच्या माध्यमातून संपर्क ठेवून, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भैय्यावाडीतील बेकायदा जुगार अड्यांना केवळ हुसकावुन लावल्याचे कानोकानी आहे. तथापी कारवाई नेमकी काय केली हे समोर आले नाही. एस.टी स्टँड समोरील मटका जुगार अड्डाचालक, पहिल्या बातमीवेळीच त्यांनी धुम ठोकली आहे. तर मॉडर्न कॉलनी सहित ऑनलाईन लॉटरी, भैय्यावाडीने राणाभिमादेवी थाटात बेकायदेशिर उद्योग एक/दोन पोलिसांच्या भागीदारी माध्यमातून सुरू ठेवले होते. 

शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल, लॉज मधील बैठका संपुष्टात आल्या तरी, दोन तीन ठिकाणी जबरी अवैध धंदे सुरू होते. तथापी पुणे शहर पोलीस आयुक्त यांनी मनांत आणलं तर थेट कारवाई कशी होवू शकते हे त्यांनी आज दि. 7 ऑक्टोंबर 2022 रोजीच्या शिवाजीनगर मधील वातावरणावरून दाखवुन दिले आहे. 
हेच काम वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक करीत होते तेंव्हा त्यांना हटविण्यात आले. आता दुसरे पोलीस काहीच काम करीत नाहीत. त्यामुळे पोलीस आयुक्त आणि नियंत्रण कक्षाला पुढे यावे लागले या सारखे दुसरे दुर्दैव नाही. दरम्यान पोलीसांच्या भागीदारीत सध्या भैयावाडी आणि महापालिका वेगात असल्याचे समजते. पुढे उदया पाहूयात.... थोडक्यात आज बंद आहे पण उद्या काय.... नवा गडी... नवा राज....?