Friday, December 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

विशिष्ठ हद्दीत कारवाया केल्यानंतर पोलीसांच्या बदल्या होतात तरी कशा ,
पुणे शहर पोलीस दलात खांदेपालट

सामाजिक सुरक्षा मधील 12 ए चे पुरस्कर्ते आता भारती विद्यापीठात.. तर विशेष शाखेच्या भरत जाधवांना सामाजिक सुरक्षेची जबाबदारी… बंडगार्डनचे मानकर खंडणी विरोधी पथकात
हुश्यऽऽ… अखेर विश्रामबागला सहाय्यक पोलीस आयुक्त मिळाले…

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहर पोलीस दलात खांदेपालट करण्यात आला आहे. राज्याच्या गृह विभागाने नुकत्याच बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यात बदलुन आलेल्या पोलीस निरीक्षकांना या बदल्यांत पदस्थापना देण्यात आली आहे. या शिवाय पोलीस आयुक्तालयातील तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. 3 सहाय्यक पोलीस आयुक्त व 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या व पदस्थापना करण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग या पदाला पुर्णवेळ अधिकारी मिळाला आहे. तर राजेश पुराणिक यांच्यानंतर, सामाजिक सुरक्षा विभागाचा भार पेलणारे व 12 ए चे पुरस्कर्ते विजय कुंभार यांची बदली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. तर सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी विशेष शाखेचे भरत जाधव यांची वर्णी लागली आहे.

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या –
बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे

  1. भरत शिवाजी जाधव (विशेष शाखा ते गुन्हे शाखा (सामाजिक सुरक्षा विभाग )
  2. विजय गणपतराव कुंभार (गुन्हे शाखा (सामाजिक सुरक्षा विभाग) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन )
  3. श्रीहरी रामचंद्र बहिरट (वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन (पान 4 पहा)
    (पान 1 वरून) ते गुन्हे शाखा युनिट -3)
  4. प्रताप विठोबा मानकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा (खंडणी विरोधी पथक 2)
  5. ब्रह्मानंद रावसाहेब नाईकवाडी (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन)
  6. संतोष दगडू सोनवणे (वाहतूक शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन )
  7. मनोहर पंढरीनाथ ईडेकर (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)
  8. संदीप पांडुरंग भोसले (गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन)
  9. सुनिल धोंडीराम जाधव (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा)
  10. बालाजी अंगदराव पांढरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतु:श्रृंगी पोलीस स्टेश ते गुन्हे शाखा युनिट 1)
    पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या पोलीस निरीक्षक –
  11. संतोष उत्तमराव पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन)
  12. भाऊसाहेब गोविंद पटारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन )
  13. चंद्रशेखर विठ्ठल सावंत (पोलीस आयुक्त यांचे वाचक)
    बदली झालेले सहायक पोलीस आयुक्त
    1.गजानन बाळासाहेब टोंपे (सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 ते सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग-
  14. सुनिल विष्णू पवार (सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग ते सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 )
  15. राजेंद्र वसंत गलांडे (सहायक पोलीस आयुक्त प्रशासन ते सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग)
    विशिष्ठ हद्दीत कारवाया केल्यानंतर पोलीसांच्या बदल्या होतात तरी कशा –
    पुणे शहरातील काही विशिष्ठ हद्दीत व काही विशिष्ठ ठिकाणी अवैध ठिकाणी कारवाया केल्यानंतर त्यांच्या बदल्या नेमक्या होतात तरी कशा असा प्रश्न निर्माण झाला आहे. उदाहरण दयायचे तर सामाजिक सुरक्षा विभागाने मागील काही महिन्यांत कोरेगाव पार्क येथे रात्रभर धिंगाणा घालणाऱ्या रेस्टोबार आणि मसाज पार्लरवर कारवाई केल्यानंतर श्री. राजेश पुराणिक यांच्या बदनामीचे प्रकरण समोर आले. आता विजय कुंभार यांची बदली झाली. त्यातच राजा बहाद्दुरच्या पब वर कारवाई केल्यानंतर देखील अनेकांच्या बदल्या होत आहेत. विजय कुंभार यांनी धाडसाने राजा बहाद्दुरवर कारवाई केल्यानंतर, त्यांचीही बदली झालीच शिवाय बंडगार्डचे मानकर यांचीही बदली झाली आहे. कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाने केली असली तर गुन्हे दाखल करणे, कोर्ट कामकाजाची सर्व जाबदारी पोलीस स्टेशनची असते. त्यामुळे ह्या सर्व बदल्या किंवा खांदेपालट या कारणामुळे झाले आहेत काय अशीही चर्चा सामाजिक कार्यकर्त्यांत होत आहेत.
    बदल्या ही प्रशासनाची अंतर्गत बाब आहे. परंतु काही विशिष्ठ ठिकाणी व काही विशिष्ठ हद्दीत पोलीस कारवाई केल्यानंतर लगेच बदल्या का होतात हा विषय देखील संशोधनाचा आहे.