
स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत 25 जुगार अड्डे,
Gambling dens within Swargate police station
सामाजिक सुरक्षा गुन्हे शाखा कारवाई करते, मग स्वारगेट पोलीसांना जुगार अड्ड्याविषयी काहीच माहिती नाहीये काय….स्वारगेट पो. स्टे. हद्दीतील कुप्रसिध्द शब्बीर मोहम्मद शेख उर्फ शाहू याच्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा,दीड लाखाच्या मुद्देमालासह, एकुण 12 आरोपींविरुद्ध कारवाई.
पुणे/दि/ प्रतिनिधी/स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत 25 पेक्षा अधिक जुगार अड्डे कार्यरत असल्याची माहिती समोर आली असून, 25 पैकी 12 धंदे रिक्षा, टू व्हिलर, रस्त्यावर थांबुन जुगार घेतला जात आहे तर, 13/14 ठिकाणी दुकाने, घरातून जुगार अड्डे व रमीचे क्लब चालविले जात असल्याचे गुन्हे शाखेच्या निदर्शनास आले आहे. तसेच याच ठिकाणाहून अंमली पदार्थांची देखील तस्करी होत असल्याचे आढळुन आल्याने, आज स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील 25 पैकी एका जुगार अड्डयावर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली अ...