पुणे महापालिका आयुक्त कार्यालय झिंगझिंग झिंगाट, बांधकाम खात्ते- चिंगचिंग सुस्साटऽऽऽ
pune pmc susat
पुणे महापालिका मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी, कार्यालये बिल्डरांना फुकटात आंदण - आरक्षणाच्या जमिनीवर बिनधास्त बांधकामे.
भर पावसाळ्यात पुणे ठप्प- अधिकारी गप्प्पऽऽ
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
शासनातील अधिकारी आणि कर्मचारी क्रिम पोस्ट आणि क्रिम एरियासाठी जीवाचा आकांत करून धावा धाव, करून ते पदरात पाडून घेत असतांना सर्वांनीच पाहीले आहे. गृह मंत्रालयाकडील सर्वच विभाग, त्यातल्या त्यात पोलीस खात्यात चढाओढ सुरू असल्याचे ज्ञात आहे. अंमलदार ते पो.उप.निरी.पर्यंत आणि पोलीस ठाण्यासहित गुन्हे शाखेत साठमारी सुरू असते. त्यानंतर महसुल, कृषी, सहकार ही ओघाने येणारी साठमारी- तुंबळ हाणामारीची खाती. परंतु पुणे महापालिकेतही क्रिम पोस्ट आणि क्रिम एरियासाठी एवढी मोठ्ठी रस्सीखेच असेल अस्सं कधी वाटलच नाही. कधी दिसूनही आले नाही. परंतु एक सारख्या विभागात( जुना आणि नवा, खु...









