पुणे महापालिकेत मुदतपूर्व बदल्यांचा धडाका आर्थिक हितसंबंध उघड होण्याच्या व चौकशी प्रकरणांत अडकण्याच्या भितीने श्रीधरपंत येवलेकर, विलास फड यांच्या मुदतपूर्व बदल्या!
पुणे/दि/ प्रतिनिधी/
एकाच पदावर ४/४ पाच वर्षे पदधारण करण्याची सवय जडलेल्या व एका कार्यालयासह दोन ते तीन कार्यालयांचा अतिरिक्त पदभार सांभाळण्याचे कौशल्य असलेल्या अधिकार्यांनी आरोप होताच, तसेच चौकशीचा अहवाल सादर करण्याची वेळ येताच, स्वतः धारण केलेल्या पदांवरून दोन अडीज वर्षातच पदभार सोडून गाशा गुंडाळलयाला सुरूवात केली आहे. पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन १ चे विलास फड व झोन चारचे श्रीधरपंत येवलेकर यांनी मुदतपूर्व बदली करवुन घेतली आहे. आता श्री. विलास फड झोन एक मधुन झोन चार तर श्रीधरपंत झोन चार मधुन झोन सहाचा पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्र बदल्यांचा अधिनियम २००५ अन्वये अशा प्रकारची बदली अमान्य असली तरी पुणे महापालिकेत कधीही व काहीही होवू शकते हे त्यांनी स्वतःच दाखवुन दिले आहे.
राजविलास...