पुण्यातील पर्यावरणाचा विनाश करणार्या बांधकाम व्यावसायिकाची मुजोरी, १ कोटी ५८ लाख रुपये + २०१६ पासूनचे व्याज भरण्यात टाळाटाळ
न्यायालयाने ठोठावला होता २०० कोटीचा दंड महापालिकेलाही यांच्यामुळे बसला होता ५ लाखाचा दंड पुणे/दि/ प्रतिनिधी/ पुणे शहरातील नवीन बांधकाम प्रकल्पातुन पुणे महापालिकेला बांधकामाचे डेव्हलपमेंट चार्जेस प्राप्त होत असतात. या विकास शुल्कातूनच पुणे शहरातील नागरी सुविधा निर्माण व पुरविल्या जातात. तथापी वडगाव बु॥ येथील स.नं. ३५ ते ४० येथील बांधकाम व्यावसायिकाने पुणे महापालिकेचे एकुण १ कोटी ५८ लाख ३७ हजार ७७५ रुपयांचे विकास शुल्क व त्यावरील व्याज थकविले असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान याच बांधकाम व्यावसायिकाने पुण्यातील पर्यावरणाचा विनाश केल्या कारणाने न्यायालयाने सुमारे २०० कोटीचा दंड ठोठावला आहे व या प्रकरणाकडे गांभिर्याने लक्ष न दिल्याबद्दल पुणे महापालिकेला देखील सुमारे ५ लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. पुणे महापालिकेतील बांधकाम विभागाने वडगाव बु. येथील बांधकाम प्रकल्पाचे नियमानु...