पोलीसवाल्या, सायकलवाल्या, बिरेक लाऊन थांब्ब , टोपी तुझी तर हातात माझ्या, व्हईल कस्सं रं काम …? जाऊया डबलशिट रं लांब लांब…लॉंब…वसुली करूया लांब लांब… लॉंब…
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/दरवर्षी डिसेंबर महिना उजडला की, पुणे शहर पोलीसांना बदलीचे वेध लागु लागतात. अमुकच एक पोलीस स्टेशन पाहिजे म्हणून पुण्यापासून मुंबईपर्यंत अनेकांच्या वार्या सुरू होतात. मंत्री आणि पुढार्यांच्या पायर्या झिजवु लागतात. थोडक्यात क्रिम पोलीस स्टेशन मिळावे म्हणून अनेकजन धडपड करीत असतात. आज तीच धडपड पुणे शहरातील बहुतांश सगळ्या पोलीस स्टेशनसहित गुन्हे युनिट व आयुक्तालयातील वेगवेगळ्या सेल मध्ये सुरू आहे. चौकातील कट्टयावर थांबुन माझे पोलीस स्टेशन फिक्स झाले, आता बघा फरासखान्याला आलोच म्हणून समजा… येरवड्यात आलोच म्हणून समजा… अशा गप्पा आता सुरू झाल्या आहेत. खरंच, पुण्या मुंबईच्या वार्या करून मनासारखे पोलीस स्टेशन मिळते काय, हा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांप्रमाणेच मलाही पडला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच आता या प्रश्नांची उत्तरे देणे संयुक्तिक ठरेल.
बरीचे महिन...