Sunday, January 5 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

रखवालदारी करणारा चौकीदारच निघाला चोर, राजस्थानमधील सभेत राहूल गांधीची मोदींवर सडकून टीका

राजकीय
डुंगरपुर - पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य करत राहुल गांधींनी गुरुवारी राजस्थानमधील सभेत नवीन घोषणा दिली. ’गली गली मै शोर है हिंदुस्तान का चौकीदार चोर है’ असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. राजस्थानमधील डुंगरपुर येथील सभेत त्यांनी ही घोषणा दिली. विशेष म्हणजे राहुल यांचे वडिल राजीव गांधीच्या विरोधात बोफोर्स घोटाळ्याप्रकरणी ’गली गली मै शोर है राजीव गांधी चोर है’ हीच घोषणा ८०च्या दशकात विरोधकांनी गाजवली होती.                 सभेत बोलताना राहुल यांनी निवडणूकांमध्ये स्त्रीयांनी सक्रीय  सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. भारतात जर बदल घडवायचा असेल तर स्त्रीयांचा सहभाग अनिवार्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे...
राष्ट्रवादीला डिवचणार्या आंबेडकरांची विखे पाटलांनी घेतली भेट, आघाडीत येण्याचे दिले निमंत्रण

राष्ट्रवादीला डिवचणार्या आंबेडकरांची विखे पाटलांनी घेतली भेट, आघाडीत येण्याचे दिले निमंत्रण

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/                 राष्ट्रवादी कॉंग्रेसला डिवचणारे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट घेतली. यावेळी त्यांनी आंबेडकरांना भाजपविरोधी आघाडीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.                 विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव ठाकरे यांनी आंबेडकर यांची त्यांच्या पक्ष कार्यालयात भेट घेतली. विशेष म्हणजे आंबेडकर यांनी एमआयएमशी युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही भेट झाली आहे.                 प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या...

मनुस्मृती आणि चाणक्य निती नुसार देश-राज्याचा कारभार

राजकीय
कुटील आर्य चाणक्यच्या सुत्रानुसार, एखादा देश किंवा प्रदेशावर कब्जा करायचा असेल, तो कायमस्वरूपी आपल्या ताब्यात ठेवायचा असेल, तर तिथली अर्थव्यवस्था दुबळी करा, लोक अर्थाविना जर्रजर्र झाले पाहिजेत. त्या राज्याच्या चलनाची किंमत शून्य झाली पाहिजे. अर्थाविना, कुणाचाच कुणावर विश्‍वास राहणार नाही. अशी जर्रजर्र अवस्था झाल्यानंतर, तिथली जनता पशुपेक्षाही हीन दर्जापर्यंत पोहोचेल. त्यात युद्ध, अंतर्गत बंडाळी निर्माण करून, तिथल्या राज्यावर आक्रमण करून देश कायम स्वरूपी ताब्यात ठेवता येतो असे आर्य चाणक्याच्या चाणक्यनिती मध्ये नमूद आहे. अगदी तशीच अवस्था आज देश व राज्याची झाली आहे. प्रथम नोटाबंदी करून, देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्याच दोन हजार रुपयांसाठी भिकार्‍यासारखे रस्त्यावर थांबविले. नवीन चलन बाजारात आणले परंतु जागतिक पातळीवर भारतीय रुपयांची किंमत कवडी इतकी देखील राहिली नाही.    ...

जनधन खात्यांतील आकडेवारी जाहीर करा

राजकीय
नवी दिल्ली/दि/  नोटाबंदीच्या काळात नेमकी किती रक्कम जनधन खात्यांमध्ये जमा झाली, याची आकडेवारी जाहीर करण्याचे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) रिझर्व्ह बँकेला दिले आहेत. आर्थिक सर्वसमावेशकतेचा एक भाग म्हणून सर्वसामान्यांना बँकिंगच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे ऑगस्ट २०१४ मध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेची घोषणा करण्यात आली. या माध्यमातून गरिबांना तसेच हातावर पोट असणार्या वर्गाला बँकेचे खाते प्रदान करण्यात आले.                 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रात्री आठ वाजता नोटाबंदीची ऐतिहासिक घोषणा केली. याच दरम्यान जनधन योजनेतील खात्यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. या निर्णयाचा परिणा...
पोरगी पळवून आणू, तुझ्या काय बापाची ठेव आहे का? कशाची मस्ती आलीय? अजित पवारांचा घणाघात

पोरगी पळवून आणू, तुझ्या काय बापाची ठेव आहे का? कशाची मस्ती आलीय? अजित पवारांचा घणाघात

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/                 सरकार म्हणतंय बेटी बचाव आणि बेटी पढाव आणि यांचा एक निर्लज्ज आमदार म्हणतोय पोरगी पळवून आणू. तुझ्या काय बापाची ठेव आहे का? कशाची मस्ती आली? आणि हे भाजपचे प्रवक्ते म्हणून मिरवतात. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे, असा घणाघात अजित पवार यांनी केला.                 पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित बाबुरावजी घोलप पुरस्कार प्रदान समारंभात अजित पवारांनी राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली.                 ते म्हणाले की पक्षाचा एक आमदार महिलांबाबत असे बोलतो. मात्र, पक्षाचे प्रमुख लोक काही बोलू शकत नाहीत हे घातक आ...

देशाच्या प्रमुखाने खोटे बोलू नये – ऍड. आंबेडकर

राजकीय
गडचिरोली :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कोणतेही आकडेवारी फुगवून सांगतात. जीएसटीमुळे शासनाच्या तिजोरीत किती पैसा आला, याचे उत्तर मोदींकडे नाही. मोदी आपली शैक्षणिक कागदपत्रे दाखवायला तयार नाहीत. खोटे बोलण्याची प्रवृत्ती देशाच्या सर्वोच्चपदी बसलेल्या माणसात नसावी.                 देशाचा  प्रमुखच खोटे बोलत असेल तर इतरांचे काय, अशा शब्दात भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना टोला लगावला. येथील कात्रटवार भवनातआयोजित संवाद यात्रेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला गेले होते. त्यावेळी त्यांच्या विमानात कोण बसले होते, याचा खुलासा त्यांनी करावा.               &...

भाजप श्रीमंत पक्ष कसा बनला?

राजकीय
नवी दिल्ली/दि/ कुठल्याही उद्योजकांची कॉंग्रेसने ‘चोर-लुटेरे’ अशी हेटाळणी केलेली नाही. उलट भाजपनेच कुडमुडया भांडवलदारांना हाताशी धरलेले आहे. याच भांडवलदारांकडून उभारलेल्या ट्रस्टचा बहुतांश पैसा भाजपकडे गेला आहे. चार वर्षांत भाजप सर्वात श्रीमंत पक्ष कसा बनला, असा सवाल कॉंग्रेस नेता आनंद शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परषिदेत केला.                 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखनौमधील सभेत कॉंग्रेसच्या दुटप्पीपणावर टीका केली होती. ‘उद्योजक म्हणजे कोणी चोर-लुटेरे नाहीत. त्यांच्याशेजारी उभे राहण्याची भीती कशाला बाळगायची?’ अशी टिप्पणी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना आनंद शर्मा म्हणाले की, उद्योगांना प्रोत्साहन देण्याचीच कॉंग्रेसची भूमिका राहिलेली आहे.           ...