संभाजी महाराजांनंतर आता संत तुकाराम महाराजांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण
मुंबई/दि/प्रतिनिधी/
छत्रपती
संभाजी महाराज यांच्यानंतर आता संत तुकाराम महाराज यांच्या पत्नीबद्दल एका पुस्तकात
आक्षेपार्ह लिखाण केल्याचे आढळले आहे. आता तर हद्द झाली, सर्व शिक्षा अभियानातली ही
पुस्तकं अभ्यासक्रमातून काढून घ्या. संबंधितांवर कारवाई कराच, पण शिक्षणमंत्री विनोद
तावडे यांनी जबाबदारी पेलवत नसेल तर राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल अजितदादा पवार यांनी केला.
सर्व
शिक्षा अभियानाच्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल
वादग्रस्त लिखाण केल्याचा वाद शमत नाही तोच, या अभियानातील आणखी एका पुस्तकात संत तुकाराम
महाराज व त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण असल्याची माहि...