आंबेडकर नगराला गुन्हेगार बनविण्याचा मा. यार्ड पोलीसांचा संकल्प न्यायालयाने निर्दोष केलेल्यांना माघाहून १४९ व आता तर १०७ करण्याचा प्रयत्नपूर्वक महासंकल्प –
पुणे/दि/ प्रतिनिधी/
महाराष्ट्र पोलीस दलाकडून आलेल्या सूचनेनुसार, पुणे शहर पोलीसांचे ध्येय आहे की, पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकविणे, सज्जनांना सुरक्षा व दुर्जनांना कायद्याव्दारे स्थापित नियमानुसार दंडीत करणे, महिला व मुलींची सुरक्षा करणे, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन अशा प्रकारचे ध्येय ठेवण्यात आले आहे. परंतु पुणे शहर पोलीस दलातील काही पोलीस स्टेशन ही स्वतःला पोलीस महासंचालक दर्जाची समजु लागली आहे. नशिबाच्या थैलीने पोलीस स्टेशन मिळालेल्यांना, आभाळ देखील एक बोट ठेंगणं वाटू लागलं आहे. जे मिळालं आहे, ते टिकवुन ठेवण्यासाठी पोलीस दलाचे ध्येय साकारणे आवश्यक आहे की, गुन्हेगारांना गोंजारून, त्यांचे लांगुन चालन करून, यांची खुर्ची टिकतेय की अशी आजची मार्केटयार्ड पोलीस स्टेशनची परिस्थिती निर्माण झाली आहे. हद्दीतील अवैध कृत्य करणारे उजळ माथ्याने फिरत आहेत, तर सर्वसामान्य नागरीक व महिला, प...







