
भारती पोलीस स्टेशन हद्दीतील रस्त्यावरची लुटमार- गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेईना….
पुणे/दि/नॅशनल फोरम/भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीने कळस गाठला आहे. भर दिवसा बंदूकीच्या नळकांड्या फुटत आहेत. डोक्यात गोळ्या घुसत आहेत. रस्त्यावरून चालत असतांना, टोळक्यांचा धुडगुस सुरूच आहे. आता तर रस्त्यावरून चालत असतांना एका टोळक्याने नागरीकास जबरी मारहाण करून त्याच्याकडील १६ हजार रुपयांचा ऐजव लुटून नेला आहे. भारतीच्या गुन्हेगारीचा चढता आलेख डोळे दिपवुन टाकणारा आहे.आंबेगाव बुद्रक येथील शिवालय आंगण येथील हनुमंत गद्रे वय ४८ हे सार्वजनिक रस्त्यावर थांबलेले असतांना, तीन अनोळखी इसमांनी त्यांना रस्त्यावर थांबवुन कोयत्याचा धाक दाखविला. तसेच हाताने व दगडाने जबरी मारहाण करून श्री. गद्रे यांच्या खिशातील एक हजार रुपये व मोबाईल असा सुमारे १६ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला आहे.कोयत्याचा धाक दाखविल्यामुळे व रस्त्यावर मारहाण दहशत निर्माण केल्यामुळेे तेथे जमलेल्या बघ्याच्या गर्द...