फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांना धमक्या, कर्ज वसुलीसाठी घरी येऊन वसूली करणार असल्याचे दुरध्वनी, कर्जवसुलीचे काम स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांकडे?
पुणे/दि/ श्री नाथ/कोरोना महामारीमुळे मार्च पासून लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू आहे. सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत. केंद्र व राज्य शासनाने टप्प्या-टप्याने अनलॉकडाऊनची प्रक्रिया सुरू केली असली तरी, कोरोना महामारीमुळे लाखो नागरीकांचे रोजगार गेले आहेत. त्यातच ऑटोरिक्षा सह घरगुती उपकरणे, पर्सनल लोन घेतलेल्या नागरीकांना खाजगी फायनान्स कंपन्यांकडून धमक्यांचे सत्र आजही सुरू आहे.
कोरोना महामारीमुळे अनेकांचेरोजगार गेले असल्यामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे जिकीरीचे झाले आहे. नागरीक आपआपल्या परीने कुटूंबाची गुजराण करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातच ज्यांनी ऑटो रिक्षा, दुचाकी वाहने, तसेच खाजगी माल वाहतुकीसाठी टेम्पो सारखी वाहने फायनान्स कंपनीव्दारे खरेदी केली आहेत. तसेच ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० हजार, लाखभर रुपयांचे कर्ज पर्सनल लोन केले आहे, त्यांना कर्जाचे हप्ते भरणे शक्य नाहीये.राज्य शास...









