Friday, March 6 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पोलीस क्राइम

शनिनगरातील 23 वर्षीय युवकाकडून पिस्टल व जीवंत काडतुस जप्त,

शनिनगरातील 23 वर्षीय युवकाकडून पिस्टल व जीवंत काडतुस जप्त,

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील जांभुळवाडी रोड, शनिनगर येथील एक 23 वर्षीय युवक एक गावठी पिस्टल व एक जीवंत काडतूसासह स्वामी नारायण मंदिरासमोर, ओंकार लॉज जवळील सर्व्हीस रोडवरील मोकळ्या मैदानात थांबला असतांना, क्राईम युनिट 3 च्या पथकाने शिताफीने जप्त करून त्याला आंबेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, गुन्हे शाखा, युनिट 3 चे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व पोलीस अंगलदार असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता नऱ्हे पोलीस स्टेशन, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, नादेंड सिटी पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत नवले ब्रिज येथे आले असताना, पोलीस अमंलदार किशोर शिंदे व पुरुषोत्तम गुन्ला, तुषार किंद्रे यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम रोहित अनिल संगम, वय 23 वर्ष, रा. जांभुळवाडी रोड, शनिन...
पुणे महापालिका निवडणूकः चंदननगर भागात 25 लाखाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त

पुणे महापालिका निवडणूकः चंदननगर भागात 25 लाखाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक दोन हे पुणे महानगरपालिका निवडणुक 2026 च्या अनुषंगाने पुणे शहर आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने प्रतिबंधक कार्यवाही करीता पेट्रोलिंग करत असताना सुमारे 25 लाख रुपयांचा मॅफेड्रोन जप्त केला आहे. दरम्यान मागील काही काळात याच पुणे शहरात सुमारे 8 हजार कोटी रुपयांचा एमडी जप्त केला होता. आता देखील जागोजाग अंमली पदार्थांवर कारवाई केली जात असली तरी, पुणे शहरात मेफेड्रॉन (एम.डी), गांजा, चर्रस, अफीम सारखे अंमली पदार्थ सहज मिळतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले होते की, ज्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळुन येतील, त्या पोलीसांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान पुण्यात बहुतांश ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होत असतांना, आता का कारवाई केली जात ना...
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत हातभट्टी दारूचा महापुर

सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत हातभट्टी दारूचा महापुर

पोलीस क्राइम
निवडणूक- पुणे महापालिकेची,हातभट्टी - सहकारनगर पोलीसांचीचंगळ आहे, कार्यकर्त्यांची… नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या निवडणूका अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. पुणे शहरात निवडणूकीचा ज्वर पसरला असुन सर्वत्र लोकशाहीचा महाउत्सव सुरू आहे. गल्लीबोळातील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते अंग झटकुन प्रचारात सहभागी झाले आहेत. दरम्यान यात सहकारनगर पोलीसांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बहुतांश झोपडपट्टयांमध्ये हातभट्टी दारूची खुलेआम विक्री आणि जागेवर बसुन पिण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. कार्यकर्ते कुठून फिरून आले की, एक मग्गा उचलायचा आणि थेट तोंडाला लावायचा… सोबतीला वजडी-पाव आणि तिखट मिठ लावलेला हरभरा… पुणे महापालिकेची निवडणूक तब्बल 9 वर्षानंतर होत आहे. मध्यंतरी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका झाल्या, परंतु पुणे ...
गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुसासह बालगुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलीसांनी केले जेरबंद

गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुसासह बालगुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात दिवसेंदिवस कमरेला बंदुक लावण्याची हौस अनेकांना होत आहे. त्यातल्या त्यात नवशिक्या गुन्हेगारांना तर कट्टा बाळगण्याची हौस तर अधिकच वाढली असल्याचे पोलीस अटक सत्रावरून दिसून येत आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अनेक पोलीस स्टेशन हद्दीत एक/दोन सराईत गुन्हेगारांकडून, हौशी आणि त्यातल्या त्यात नवशिक्या गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत राऊंड पकल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत देखील एका सराईत विधीसंघर्षित बालकाकडून अवैध गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत राऊंड हस्तगत करून त्याला अटक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे हद्दीत पेट्रोलींग करीत अ...
पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 मधील रेकॉर्डवरील 18 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षासाठी केले तडीपार, अबतक… 150 गुन्हेगारांवर धडक कारवाई

पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 मधील रेकॉर्डवरील 18 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षासाठी केले तडीपार, अबतक… 150 गुन्हेगारांवर धडक कारवाई

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील गुन्हेगारीवृत्तीस आळा घालणेकामी तसेच आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने परिमंडळ 5 हद्दीतील पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणे आवश्यक होते, म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 56 प्रमाणे 18 सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीतुन 02 वर्षे कालावधीकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.आरोपीचे नावे खालील प्रमाणे आहेत. यात पोलीस स्टेशनचे नाव, गुन्हेगाराचे नाव, केलेले गुन्हे अनुक्रमे नमुद आहेत. 1) काळेपडळ पोलीस स्टेशन- कानिफनाथ शंकर घुले, वय 49 वर्षे, रा. भैरोबा मंदीरजवळ, महंमदवाडी, पुणे (बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे एकुण 05 गुन्हे दाखल आहेत.) 2) काळेपडळ पोलीस स्टेशन -प्रमिला सर्विन काळकर, वय 41 वर्षे, रा. कृषीनगर, गल्ली नं. 13. महंमदवाडी, ...
डावा हात मनगटापासून तोडणाऱ्या विधीसंघर्षित फरार बालकास गुन्हे युनिट 1 ने केले शिताफीने जेरबंद,

डावा हात मनगटापासून तोडणाऱ्या विधीसंघर्षित फरार बालकास गुन्हे युनिट 1 ने केले शिताफीने जेरबंद,

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 22जुलै 2024 रोजी मोदी पेट्रोलपंप जवळ, मंगळवार पेठ, पुणे येथून फिर्यादी हे रोडने जात असताना पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून 08 ते 09 इसमांनी मिळून धारधार हत्याराने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये फिर्यादी यांचा डावा हात मनगटापासून वेगळा झाला होता. ह्या गुन्ह्याची नोंद फरासखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.149/2024. भा. न्या.सं. कलम 109, 189(2), 189 (4), 191 (2). 191 (3). 190. 126 (2), 352.351 (3),115(2), आर्म ॲक्ट कलम 3(25) 4(25) महा पो कायदा कलम 37 (1) (3) सह 135 क्रिमीनल लॉ ॲमेंडमेंट ॲक्ट कलम 7 महा संघटीत गुन्हेगारी अधिनियम सन 1999 चे कलम 3 (1) 3 (2), 3 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान यापुर्वी सदर गुन्ह्यात एकुण 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. विधीसंघर्षित बालक एक वर्षापासून फरार होता. दरम्य...
मोबाईल न विचारता घेतल्याने 25 वर्षिय तरुणाची हत्या

मोबाईल न विचारता घेतल्याने 25 वर्षिय तरुणाची हत्या

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/देवा उर्फ देविदास पालते वय 25 वर्ष मूळ राहणार नांदेड जिल्हा सध्या रा. धायरी याने दुसऱ्याचा मोबाईल फोन त्याला न विचारता घेतल्याने, या तरुणास जबरी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील धायरी येथे घडली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, पोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, स.नं. 30/13, साई धाम, त्रिनेश इंजिनिअरींग कंपनीचे वर पहीला मजला प्रभात प्रेस रोड, धायरी पुणे येथे एक इसम हा जखमी अवस्थेत पडलेला आहे. पोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर यांनी लागलीच घटनास्थळी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी इसम नामे देवा उर्फ देविदास पालते (वय 25 वर्षे ) रा.मु.पो.तागयाल पो. कलबर देवाची ता. मुखेड जि. नांदेड (सध्या स.नं. 30/13, साई धाम, जिनेश इंजिनिअरींग कं...
तडीपार आरोपींचा सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वावर, गुन्हे युनिट 3 ने कारवाई करीत तडीपारास केले जेरबंद

तडीपार आरोपींचा सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वावर, गुन्हे युनिट 3 ने कारवाई करीत तडीपारास केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात तडीपार आरोपींचा वावर असल्याचे पुन्हा समोर आले आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार आरोपी त्याच्या पत्नीस सिंहगड रोड येथे कामावर सोडण्यासाठी येत असतो अशी माहिती मिळाल्याने गुन्हे युनिट 3 कडील पथकाने त्याचा अचुक शोध घेवून त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. पो स्टे हददीमध्ये गंभीर गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणून अभिलेखावरील तडीपार, मोक्का, पाहीजे आरोपी यांचा शोध घेवून कारवाई करणेबाबत वरिष्ठांनी मुफजल आदेश दिल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेणेकामी गुन्हे शाखा युनिट 3 मधील सपोफौ शिंदे, पो हवा कैलास लिम्हण, पो हवा अमोल काटकर, पो हवा किशोर शिंदे, पो.शि योगेश झेंडे, पो.शि तुषार किंद्रे असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पो हवा कैलास लिम्हण व पो शि किंद्रे यांना सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील तडीपार आरोपी नामे गणेश दिल...
बाई… बाई… बाईऽऽऽ… डेक्कन पोलीसांना (अनाठाई) भलतीच घाईऽऽ, नको तिथं कारवाई… पाहिजे तिथं भलतीच आवई

बाई… बाई… बाईऽऽऽ… डेक्कन पोलीसांना (अनाठाई) भलतीच घाईऽऽ, नको तिथं कारवाई… पाहिजे तिथं भलतीच आवई

पोलीस क्राइम
डेक्कन…गुडलक चौक.. संभाजी पुतळा…एफसी रोड… भांडारकर आणि पोलीस स्टे ३६० डिग्रीरशियन, उज्बेकीस्तान, कजाकिस्तान, थायलंड, जम्मु, पंजाब, हरियाणा, युपी-एमपी आणि पुणंसगळा रगडापॅटीस आणि कोल्हापुरी मिळस झालीय बघ्घाऽऽऽ पुणे/दि/ प्रतिनिधी/पोलीस ऍक्टीव्ह कधी होतात, रिऍक्ट कधी होतात. पोलीसांचे वर्तन पॉझिटीव्ह आणि निगेटिव्ह होेते तरी कधी हा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. पोलीसांचे काम कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे एवढेच आहे. समरी पॉवर असली तरी न्यायदानाचे काम हे न्यायालयामार्फतच होत असते. कायदा सुव्यवस्था सांभाळत असतांना, कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली स्वतःची वैयक्तिक दुकानदारी सुरू करण्याचा प्रकार गेल्या काही वर्षापासून खात्यात सुरू आहे. जिथं अर्थपुर्ण व्यवहार होतात, तिथं पोलीस एकाएकी ऍक्टीव्ह होत आहेत. परंतु न्यायासाठी जे पोलीस चौकीची पायरी चढतात त्यांना मात्र पोलीस रिऍक्ट होताना दिसत नाहीत. ...
हवाला प्रकरणांत १ कोटी २९ लाख जप्त, पंचनामा मात्र ९१ लाखांचा… बाकीची रक्कम गेली कुठे… पोलिस उपायुक्त परिमंडळ क्र. १ कार्यालयाचा असाही कारभार

हवाला प्रकरणांत १ कोटी २९ लाख जप्त, पंचनामा मात्र ९१ लाखांचा… बाकीची रक्कम गेली कुठे… पोलिस उपायुक्त परिमंडळ क्र. १ कार्यालयाचा असाही कारभार

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. १ यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत दगडुशेठ गणपती जवळील तिरंगा बिल्डींग येथे आंगडीया अर्थात हवाला प्रकरणांतील कारवाई करण्यात आली. यामध्ये १ कोटी २९ लाख रुपये जप्त करण्यात आले परंतु प्रत्यक्षात ९१ लाख रुपयांचा पंचनामा केला असून, बाकीची रक्कम नेमकी गेली कुठे अशी चर्चा सध्या पोलीस उपायुक्त परिमंडळात सुरू आहे. याबाबतची तक्रार पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत गेली असल्याची माहिती मिळाली आहे. अगदी याच प्रकारची दुसरी कारवाई शनिवारवाडा फुटका बुरूजासमोर झाली आहे. परदेशी नामक व्यक्तीच्या जुगार क्लब वर पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. १ यांनी कारवाई केली. या ठिकाणी क्लबमध्ये येणार्‍या गिर्‍हाईकाच्या गाडीतून सुमारे अडीच लाखापेक्षा मोठी रक्कम जप्त करण्यात आली. परंतु त्याचा पंचनामा करण्यात आलेला नसून तेही प्रकरण अतिशय गंभिर स्वरूपाचे झाले आहे.दरम्यान पोलीस उपायुक्त पर...